Wednesday, March 19, 2025

"मी परत येणारच!" - कहाणी एका धैर्याची

"मी परत येणारच!" - कहाणी एका धैर्याची



काळोख्या अवकाशात ते यान तरंगत होतं… बाहेर शांतता आणि आत तणाव. ती मॉनिटर्सकडे पाहत होती. पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर दूर ती आणि तिचे सहकारी संशोधनात मग्न होते. पण अचानक… एक लाल दिवा चमकू लागला.


"सिस्टम फेल्युअर!"


ते शब्द ऐकताच अंतराळयानातील प्रत्येक जण सावध झाला. नियंत्रण केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण, सिग्नल कमकुवत होत चालला. ती मात्र स्वतःला स्थिर ठेवत होती. पण, मनात शंका निर्माण झाली "आपण सुखरूप परत जाऊ शकतो का?"


कित्येक महिने ती अवकाशात होती. भारहीन वातावरण, अनिश्चितता आणि पृथ्वीवरील कुटुंबाची आठवण. हे सगळं तिच्यासाठी एक परीक्षा ठरत होतं. पण, ती हार मानणारी नव्हती. रोज स्वतःला आठवण करून देत होती – "मी परत येणारच!"


अवकाशयानातल्या बिघाडामुळे परतीचा मार्ग कठीण झाला होता. तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. नियंत्रण केंद्रातून दररोज मार्गदर्शन मिळत होतं. पण, संकट अजूनही टळलेलं नव्हतं.


एका रात्री, पृथ्वीच्या दिशेने पाहताना तिच्या मनात विचार आला – "मी घाबरून काहीही साध्य करू शकत नाही. मला हे पार पाडायचं आहे!" तिने तिच्या टीमला प्रेरित केलं. प्रत्येकाला धीर दिला. दिवसेंदिवस प्रयत्न सुरू राहिले.


आणि अखेर… तो क्षण आला!


अवकाशयानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. प्रचंड दडपण, गरम झालेल्या धातूंची किंकाळी आणि हृदयाचे वेगाने धडधडणे अखेर एक मोठा हादरा बसला आणि काही क्षणांनंतर शांतता.


"मी परत आले...!"


तिच्यासह सहकाऱ्यांनी सुखरूप पृथ्वीवर पाऊल ठेवलं. सर्वांनी जल्लोष केला. तिच्या संयमाचा, जिद्दीचा आणि धैर्याचा हा विजय झाला.


त्या क्षणी तिने स्वतःला आणि जगाला शिकवलं "संकट कितीही मोठं असो, आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर, आपण अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो."


अशक्य गोष्ट शक्य करून दाखविणाऱ्या सुनीता विल्यम्स यांच्या धैर्याला, जिद्दीला आणि संयमा

ला सलाम !


धन्यवाद...!