Showing posts with label पर्व 6 वे. Show all posts
Showing posts with label पर्व 6 वे. Show all posts

Monday, April 20, 2020

यशवंत च्या निमित्ताने 2

यशवंत च्या निमित्ताने 2

खरंतर आज सकाळीच यशवंत च्या निमित्ताने लिहून वाचक,प्रसारक, आणि प्रतिसादक यांचे विषयी ऋण व्यक्त केले आहे. अजूनही प्रतिक्रियांचा अजूनही प्रतिक्रियांचा ओघ काही अटला नाही. 

माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा अंगापूर नं. 1ता.जि.सातारा च्या सर्वच सहकाऱ्यांनी वेळोवेळी प्रेरक प्रतिक्रिया देवून माझा उत्साह वाढविला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

तसेच दुधगाव,पाटण,सातारा व मनोर जि.पालघर  व डी.एड च्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढविला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

शिवाय अनेक मार्गदर्शकांनी फोन करून शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने श्री.आर.के.जाधवसर, श्री.सदाशिव कणसे सर, श्री. जयवंत कणसे सर, सौ. रुक्मिणी कणसे मॅडम, सौ सुनिता गरुड मॅडम व सौ राजश्री थोरात, सौ. रत्नप्रभा किणी यांचा समावेश आहे.

संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये म्हणतात, 
 "जब गुण को गाहक मिले, तब गुण लाख बिकाई।
जब गुण को गाहक नहीं, तब कौड़ी बदले जाई।"  अर्थात जेव्हा तुमच्यातील गुण शोधणाऱ्या व्यक्ती असतात. तेंव्हाच गुणांची खरी पारख व किंमत होते. असेच रत्नपारखी सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते श्री. सागर पवार सर क्षेत्रमाऊली ता.जि.सातारा यांनीही फोन करून, बहुमोल असे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. 

आपल्या लेखनाची शैली अतिशय सुरेख आहे. आपले लेखन अतिशय प्रेरणादायी आहे. आपले लेखन असेच सुरू राहावे. लवकरच एक पुस्तक प्रकाशित करावे. अशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेक वाचक मित्रांनी दिल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. 

आपले हे प्रेम आपण "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत " वर कायम  राहावं हीच विनंती.

धन्यवाद,
श्री. संदिप पाटील,
दुधगाव.
9096320023

_&_&_&_&_&_&_&_&_&_&_&_

उत्तम कवी,लेखक,ज्योतिषी आणि प्रसिद्ध युट्यूबर व माझे वर्गमित्र श्री. रमेश रावळ यांनी दिलेली प्रतिक्रिया...

काय म्हणू.. प्रिय मित्र संदिप कि माननीय सर... जरी अजून आपले लहान पणीचे दिवस आठवत असतील तरी स्वतःच्या कर्माने, धाडसाने, कष्टाने आज तू एक आदर्श शिक्षक झाला आहेस.. म्हणून माननीय शिक्षक महोदय असे संबोधनेच योग्य..

माननीय शिक्षक महोदय,

  आपल यशवंत ही लेख मालिका चालू करून खरेच एक अनमोल काम केले आहे.. तुमच्या या कामाचे तुम्हाला जितके कौतूक नसेल  त्याहून जास्त आम्हाला कौतूक व अभिमान आहे कारण आपल्या गावातील एक व्यक्ती जेंव्हा एवढ्या यशाच्या शिखरावर पोहचते तेंव्हा अभिमान हा वाटतोच आणि त्यातही तो आपला वर्गमित्र आहे म्हणून सांगताना अंगी मूठभर मांस चढत.. आपल्या यशवंत मालिकेतून आम्ही हे शिकलो कि यश हे पैसा, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून, रंग-रूप पाहून मिळत नाही तर ते फक्त आणि फक्त जिद्द, कष्ट, ध्यास आणि दिर्घोदयोगीपणा या जोरावर मिळत असते.. तुम्ही समाजातील प्रत्येक स्थरावरील, वेगवेगळ्या भौगोलिक पातळीवरील व वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आम्हांपर्यंत पोहचवण्यात तुम्ही यशस्वी झाले आहात म्हणून तुम्ही सुध्दा एक यशवंत झाला आहात.. आणि त्यावरूनच आम्हाला हि यशाचे महत्त्व व त्याची किंमत कळू लागली आहे व जर हे आपल्या सारखे सामान्य लोक इतके यशस्वी होऊ शकतात तर आम्ही सुध्दा निश्चितच होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.. आणि अजून एक मोलाची गोष्ट ही आम्हाला समजली कि यश म्हणजे पैसा मिळवणे नव्हे.. तुम्हच्या लेखमालेत सर्व प्रकारच्या यशस्वी लोकांची माहिती तुम्ही दिलीत.. ते सर्व जण यशस्वी झाले असे तुम्ही मानले ते त्यांनी जे ठरवले ते मिळवले म्हणून.. अनेक नाऊमेद झालेल्या मनाला तुम्हच्या या लेखामुळे नवीन उमेद मिळाली आहे व ते परत एकदा यशस्वी होण्याकडे वाटचाल करीत आहेत याचे श्रेय नक्कीच तुम्हाला जाते... असेच लिहित रहा व नवनवे यशवंत, त्यांचे लढे, त्यांचा संघर्ष व त्यांचे यश आम्हां पर्यंत पोहोचवत रहा.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐







Sunday, April 19, 2020

यशवंत च्या निमित्ताने

यशवंत च्या निमित्ताने 


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/blog-post.html

25 मार्च 2019 रोजी गुढीपाडव्याला सुरू झालेला, "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" च्या सहाव्या पर्वाचा प्रवास 150 व्या भागाशी काल येऊन थांबला. "यशवंत कधी सुरु करताय ?" एका वाचक मित्राच्या केवळ या चार शब्दांच्या आलेल्या मेसेजने, खरंतर सहाव्या परवाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. मिळालेला प्रतिसाद तर उदंडच. भारतासह 12 देशातील एकूण 20 हजार वाचकांच्या भेटी आणि 100 फॉलोअर्स मिळाले. हा त्याचाच एक भाग.

समोर असलेल्या अनेक संकटांना, अडचणींना भीक न घालता, आपल्या ध्येयाप्रत पोहोचलेल्या आणि " सामान्यातील असामान्य " ठरलेल्या, पद्मश्री ने सन्मानित असलेल्या, व्यक्तींच्या कार्याचा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा मागोवा या पर्वात घेण्यात आला. जो वाचकांना खूपच भावला.

माझे लेखन सर्वदूर पोहविण्याचे खूप मोठे काम काही मित्रांनी केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने  श्री. अविनाश कर्पे, शिक्षक मंच सातारा,श्री.माणिक नागरगोजे सर, श्री लक्ष्मीकांत सोरटे, श्री.रमेश काशीदसर ,श्री. तारिश अत्तार सर सांगली, श्री जयवंत चव्हाण सर कोरेगाव, श्री.राहुल कोळी व श्री एम पी पाटील तासगाव, श्री विनोद पाटील सर सांगली, वैष्णव वाढेकर आपले आभार. या सोबतच अनेक अज्ञात समूह प्रशासकांनी माझे लेखन आपल्या ग्रुपवर प्रसारित केले. त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

अनेक वाचकांनी लेखन कौशल्याचे कौतुक केले.  भरभरून प्रतिसाद दिला.आपल्या प्रतिक्रिया कळविल्या. त्यामुळे मला लेखनासाठी ऊर्जा मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने श्री.राजेंद्र वाकडे सर तारळे, प्राचार्य वाळुंजकर,नगर श्री मुसद्दिक संदे सर,श्री. राजेंद्र बोबडे सर, श्री.रवींद्र जंगम सर,श्री विलास भांदिर्गे, श्री दीपक मगर सर,श्री विष्णू ढेबे सर, सौ शुभांगी कुंभार, श्रीमती सुनिता गोरवे, श्री बिपिन कणसे अंगापूर आणि वर्गमित्र आदिनाथ पाटील यांनी प्रदीर्घ प्रतिक्रिया लिहून पाठविली.

सातारा येथील सुप्रसिध्द पत्रकार व लेखक श्री. सुनिल शेडगे सर यांनी प्रदीर्घ प्रतिक्रिया लिहून ती आपल्याकडील हजारो वाचक मित्रांपर्यंत पोहचविली. त्यामुळेच "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली. शिवाय अनेक प्रतिक्रिया,अभिप्रायतून माझ्यासारख्या नवोदित लेखकाला अनेक मान्यवरांकडून शाबासकीची थाप मिळवून दिली. या सोबतच बालभारती मध्ये हिंदी विषय विभाग प्रमुख असलेल्या सौ. छाया पाटील मॅडम, श्री. अशोक कणसे साहेब, श्री बावकर सर, श्री. अरविंद अवसरे सर यांनी फोन करून अभिनंदन केले, शिवाय प्रेरणा दिली. त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे. पुन्हा भेटू लवकरच.

श्री. संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.
_____________________________________

*सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा* यांची जशीच्या तशी प्रतिक्रिया.

सातारा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मित्रवर्य संदीप पाटील यांच्या 'व्हाॅटस अप'वर लिहित असलेल्या अन् अलीकडं विशेष प्रसिध्दी पावलेल्या 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' या दैनंदिन लेखमालेचा आजचा हा सलग दीडशेवा भाग. त्यानिमित्त!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  *यशवंत*

*सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*मित्रवर्य संदीप सर,*

आज आपल्या 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' या लेखमालेचं दीड शतक पूर्ण होतं आहे. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक, ह्दयपूर्वक अभिनंदन!

*एकच विषय नजरेसमोर ठेवून सलग दीडशे दिवस लिहिणं, हे शिवधनुष्य* *पेलण्यासारखं आहे. इतकं मोठं आव्हान आपण अगदी लीलया पेलता आहात, याचं मोठं कोैतुक वाटतं.* *आपली ही कामगिरी निश्चितच* *अनन्यसाधारण ठरावी.* 

संदीप सर, 
आपल्या या आजच्या ठळक कामगिरीनं माझं मन गतकाळात पोहोचलं. तुम्ही तेव्हा पाटण तालुक्यात कार्यरत होता. कुठल्याशा एका 'व्हाॅटस ग्रुप'वर आपण दोघं एकत्र होतो. आपला परिचय तिथला. माझ्या लेखांवर तुम्ही अगत्यानं प्रतिक्रिया नोंदवायचा. लेखन आवडल्याचं सांगायचा. मग मध्ये तीनेक वर्षे लोटली. निवडणूक प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपली पहिली भेट दहिवडीत घडली.
गडबडीतही आपण बोलत राहिलो.
जाता जाता तुम्ही आठवण म्हणून दोघांचा 'सेल्फी' घेतला.

दरम्यानच्या काळात तुम्ही लेखनाचा श्रीगणेशा केला. 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' ही लेखमाला आपण सुरु केली. अगदी सुरवातीलाच मी फोन करुन तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तुम्ही खूपच आनंदी झाला होता.

*आपण तेव्हा सुरु केलेल्या पायवाटेचं आज हमरस्त्यात* *रूपांतर होतं आहे.* 
*हे करताना आपला* *प्रवास कसा झाला असेल, याची कल्पना नक्कीच आहे. वाचक पटकन वाचतो अन्* *कदाचित बाजूला होतो. लिहिणाऱ्याला मात्र तसं करता येत नाही. त्याला सतत लेखनाशी* *स्वतःला बांधून घ्यावं लागतं. स्वतःत लेखन मुरवून, जिरवून घ्यावं लागतं. लेखन हा* *लिहिणाऱ्याचा श्वास ठरावा लागतो. ध्यास बनावा लागतो. हे सारे गुण आपण आत्मसात करत गेला आहात.* *आजचं हे यश म्हणजे त्याचीच फलश्रृती.*

लेखनाच्या रुपानं आता आपली मोठी घोडदौड सुरु आहे. राज्यातल्या कित्येक ग्रुपवर आपलं लेखन पोहोचतं आहे. आपण तयार केलेल्या, 'ब्लाॅग'लाही वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. हे यश नक्कीच  सुखावणारं आहे.

*प्रेरणा, जिद्द, संघर्ष हा आपल्या लेखनाचा गाभा आहे. तेच* *लिहिण्याचं सूत्र आहे. अर्थात हे शब्द केवळ लिहिण्यासाठी तुम्ही वापरलेले नाहीत. तुम्ही स्वतः तसे जगला* *आहात.*
*दहावीनंतर मार्केट* *यार्डात दिवानजीचे काम करणारा, दहा* *रुपयांसाठी दोन तास पेपर टाकणारा* *एकेकाळचा एक मुलगा आज अंगापूरसारख्या एका आंतरराष्ट्रीय शाळेचा कुशल शिक्षक बनला आहे. लेखनाच्या रुपानं यशवंत बनला आहे.*

संदीप सर, 
तुमचा अभिमान वाटतो.
असेच लिहित राहा. यशाची शिखरं पादाक्रांत करत राहा.

संदीप पाटील यांचे लेख वाचण्यासाठी
click on

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/150.html

*शनिवार। 18 एप्रिल 2020*
*सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा*
*sunilshedage123@gmail.com*
*Mob : 98224 54630*

*माझे मागील सर्व लेख वाचण्यासाठी click on*
https://sunnyspecialblog.wordpress.com
_____________________________________



Saturday, April 18, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 150

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 150.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/150.html


कोणी 'भिकारी' म्हणायचे, तर कोणी 'वेडा'. कोणी 'जादूटोणा करतोय' असं म्हणायचे तर कोणी त्याच्या 'पुरुष असण्यावरच' शंका घ्यायचे. यावर कहर तर बायकोने केला. 'तो बाहेरख्याली आहे. असे समजून ती त्याला सोडूनच गेली. इतकं सारं घडूनही,तो आज "पद्मश्री" पुरस्कार सन्मानित आहे.  कोण आहे तो यशवंत ? जाणून घेऊ आजच्या "यशवंत - एक प्रेरणास्रोत" च्या सहाव्या पर्वाच्या शेवटच्या भागात. चला तर मग... 

तामिळनाडूतील कोईमतूर येथील एका गरीब कुटुंबात 1965 साली अरुणचा झाला जन्म झाला. तो लहान असतानाच एका अपघातात त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंतरच दुःख आणि संकटांची मोठी मालिकाच सुरू झाली. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आईने कंबर कसली. पण, तिच्या एकटीच्या कष्टाने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. म्हणूनच अरुणला वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी, दहावीतूनच शाळा सोडून द्यावी लागली. कुटुंबासाठी अरुणची धडपड सुरू झाली. मिळेल ते काम करून, कुटुंब चालवू लागला.

1998 साल उजाडलं. परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाल्याने अरुण चे लग्न झाले. सुखाचा संसार सुरू झाला. एक दिवस बायको आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचे त्याच्या निदर्शनात आले. खोदून खोदून विचारल्यावर समजले की, तिची मासिक पाळी सुरू आहे. या कालावधीत ती खराब कापड, वर्तमान पत्राचा कागद वापरते आहे, त्याचा दुर्गंध येत असल्याचे, शिवाय सॅनिटरी पॅड खूप महाग आहे. यासारख्या अनेक बाबी त्याच्या निदर्शनास आल्या. त्याची मती गुंग झाली.

या एका प्रसंगाने अरुणच्या जीवनाला कलाटणी मिळाली. जीवनाला नवी दिशा मिळाली. केवळ आपल्या बायकोला, बहिणीलाच नव्हे तर प्रत्येक स्त्रीला स्वस्तात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा विडा त्याने उचलला. अनेक संकटं झेलत, अनेक आव्हानं स्वीकारत, साडेआठ वर्षाच्या अथक परिश्रमातून त्याने एक असे यंत्र विकसित केले की,  ज्याच्या माध्यमातून केवळ 2 रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध झाले. त्याच्या या कामामुळेच तो पॅडमॅन म्हणून प्रसिद्ध झाला. तो पॅडमॅन म्हणजेच "अरुणाचलम मुरुगनाथम" होय.

सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी अरुणाचलम अनेक कष्ट सोसले आहेत. कचऱ्याच्या ढिगात पडलेले पॅड उचलताना पाहून लोकांनी त्यांना वेडा, भिकारी, भूत ठरवलं. प्रयोगासाठी बकऱ्याचं रक्त वापरलं, तर जादूटोणा करतोय.असं म्हणाले. पॅडचा फीडबॅक घेण्यासाठी सतत मुलींच्या जवळ जातो. म्हणून बायको संशय घेवून सोडून गेली. तर स्वतःचं सॅनिटरी पॅड वापरतोय, केस वाढलेत म्हणून पुरुष असण्यावर शंका घेऊ लागले. शिवाय आर्थिक अडचणीं, उपासमारी यासारख्या अनेक संकटांना तोंड देत. ते सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिले. तब्बल साडेआठ वर्षाच्या अथक परिश्रमातून ते यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन विराजमान झाले आहेत. 

टाइम्स मॅक्झिनने 2014 साली जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित "पॅडमॅन" नामक  चित्रपट बनविण्यात आला आहे. यात अक्षयकुमार ने प्रमुख भूमिका साकारली आहे.

ध्येयप्राप्तीचा प्रवास अतिशय खडतर आहे. या वाटेवर अनेक अडचणी तुमची परीक्षा घेण्यासाठी उभ्या असतात. या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे, त्यांच्यावर मात केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अरुणाचलम यांनी नेमकं हेच केलं. म्हणूनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.


🎯 *"गेनाभाई"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/149.html

Friday, April 17, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 149

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 149

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/149.html

एक सामान्य "शेतकरी ते पद्मश्री" असा प्रवास असणाऱ्या एका अपंग शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग..

गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील सरकारी गोलिया गावात एका गरीब अडाणी शेतकरी कुटुंबात गेनाचा जन्म झाला. सर्व भावंडात सर्वात लहान असलेला गेना जन्मतः पोलिओसारख्या असाध्य व्याधीने ग्रासला होता. त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. त्यामुळे त्याला तीनचाकी सायकलीचा आधार घ्यावा लागला. घरची परिस्थिती बेताची, शिवाय वडील अशिक्षित असल्याने,त्यांनी गेना व्यतिरिक्त इतर मुलांना शिकवण्याऐवजी शेतीतच मदतीला घेतले. गेनाची शेतीच्या कामी कोणतीच मदत होणार नसल्यामुळे, त्याला एका हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी पाठवले. परंतु, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी न पाठविता, गावी परत आणले.

आपण शेतात कोणतीही मदत करू शकणार नाही. याची जाणीव होती. तरीही गेना कुटुंबियांसोबत दररोज शेतात जायचा व थोडीफार मदत करायचा. काही दिवसानंतर आपण ट्रॅक्टर चालवण्याचे काम करू शकतो. असा विश्‍वास त्यांच्या मनी निर्माण झाला. तो ट्रॅक्टर शिकला. क्लच आणि ब्रेक हाताने नियंत्रित करण्याचे तंत्र तो शिकला. कालांतराने शेतातील काही त्रुटी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करतात. वर्षभर शेतात राबतात. पण, तुटपुंजे उत्पन्न मिळते. याची त्यांना जाणीव झाली. "आपण अपंग आहोत. त्यामुळे एकदा लावले की, दीर्घकाळ त्याचे उत्पादन घेता येईल. असे पीक शोधले पाहिजे." याची त्याला जाणीव झाली. त्याची शोधा-शोध सुरू झाली. अभ्यास सुरू झाला. दौरे सुरू झाले. शेवटी तो महाराष्ट्रात आला. दोन्हींकडील हवामानाची सांगड घातली आणि डाळिंब पिकाची निवड केली.

हे सारे करत असताना कित्येक लोकांनी त्याला वेड्यात काढले. या जिल्ह्यात आजवर असे धाडस कोणी केले नाही. असेही कित्येकांनी सुनावले. पण, स्वतःवर विश्वास असणारी माणसं कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. गेना त्यांपैकीच एक होता. त्याने मनाचेच करायचे ठरविले. त्याने डाळिंब लागवड केली. बाग फुलविली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. जी लोकं त्याच्यावर हसत होती,त्याला वेडा ठरवीत होती, तिचं लोकं डाळिंब लागवड करण्याबाबत त्याचे मार्गदर्शन मागू लागले. त्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे उत्पन्न वाढविले. त्यामुळेच तो परिसरात "अनार दादा" म्हणून प्रसिद्ध झाला. तो "अनार दादा" म्हणजेच "गेनाभाई दर्गाभाई पटेल होय."

स्वतः अपंग असून शेतीत सुधारणा करण्यावर गेनाभाई यांनी भर दिला. अशा वेळी खूप त्रास झाला, लोकांकडून खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. पण, तरीही त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. अत्यंत धाडसाने, जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी आपले स्वप्नं सत्यात आणले. 
"मंजिलें उन्ही को मिलती है, 
जिनके सपनों में जान होती है,|
पंखो से कुछ नहीं होता 
हौसलों से उडान होती है |"
या ओळी गेनाभाई यांच्या आजवरच्या प्रवासाला चपखल बसणाऱ्या आहेत. 

गेनाभाई यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"ॲम्बुलन्स दादा"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/148.html

Thursday, April 16, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 148

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 148.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/148.html


दुःख,समस्या,अडचणी प्रत्येकाच्याच वाट्याला येत असतात. काहीजण त्याला शरण जातात आणि काहीच त्याच्यावर मात करून पुढे जातात, तर काहीजण अशा प्रकारचे दुःख,समस्या,अडचणी इतरांच्या वाट्याला येऊच नयेत. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करतात आणि हेच लोक खऱ्या अर्थाने यशवंत असतात. जे आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणारा आणि आपलं सर्वस्व खर्ची करणार्‍या एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास, आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

दादा. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धालाबाडी या दळणवळणाची साधनं आणि वैद्यकीय सोयीसुविधांची उपलब्धता नसलेल्या दुर्गम खेड्यात राहणारा एक सर्वसामान्य इसम. तो चहाच्या मळ्यात मजुरी करून आपले पाच जणांचे कुटुंब चालवायचा.

मिळणाऱ्या उत्पन्नातून आनंदी जीवन जगणाऱ्या दादाचे आयुष्य 1995 साली घडलेल्या एका घटनेने पारच बदलून गेले. एके दिवशी मध्यरात्री दादाच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गावात कुठल्याच प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. गावापासून 50 किमी दूर अंतरावर दवाखाना होता. आईला दवाखान्यात नेण्यासाठी, तिला वाचविण्यासाठी तो धावाधाव करू लागला. दारोदार हिंडून मदतीची याचना करू लागला. ज्यांच्याकडे वाहन होते, त्यांना विनवणी करू लागला. पण, त्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. शेवटी नको तेच झालं. आईचे निधन झाले. घडलेल्या घटनेने दादा खूपच दुःखी व कष्टी झाला. त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. 'जे आपल्या आईच्या बाबतीत घडले, ते इतरांच्या बाबतीत घडू नये. यासाठी आपण काहीतरी करायचे.' असे त्याने मनोमन ठरविले.

काही वर्षं सरली. 1998 सालं उजाडलं. एकेदिवशी शेतात दादाच्या एका सहकारी मजुराचा अपघात झाला. त्याला ताबोडतोब दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. जवळ कोणतेही चारचाकी वाहन अथवा ॲम्बुलन्स नव्हती. त्यामुळे त्याला दवाखान्यात कसे घेवून जायचे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मळ्याच्या मॅनेजरकडे असलेल्या दुचाकीवर, पाठीमागे सहकारी मजुराला बसवून त्याला स्वतःच्या पाठीला एका कापडाच्या साहाय्याने बांधून दवाखान्यात घेऊन गेला. सहकाऱ्यावर वेळेवर उपचार झाले. तो बचावला आणि लवकर बरा झाला.

घडल्या प्रकाराने एक गोष्ट दादाच्या लक्षात आली. ती म्हणजे दुचाकीने ॲम्बुलन्सचे काम केले आहे. आपण दुचाकीचा वापर ॲम्बुलन्स म्हणून करू शकतो. याची त्याला जाणीव झाल्याने, कर्ज काढून त्याने एक दुचाकी खरेदी केली आणि त्या दुचाकीचा वापर ॲम्बुलन्स म्हणून करू लागला. परिसरातील वीस गावातील लोकांना थंडी असो, ऊन असो वा पाऊसात 24 तास कधीही रुग्णांना निशुल्क दवाखान्यात पोहोचवण्याचे काम दादा आपल्या ॲम्बुलन्स दुचाकीवरून करू लागला. त्याच्या या कामामुळे तो परिसरात "ॲम्बुलन्स दादा" म्हणून प्रसिद्ध झाला. तो "ॲम्बुलन्स दादा" म्हणजेच "करिमुल हक" होय.

ॲम्बुलन्स दादा यांचा प्रवास वाचून झालाचं असेल. तर पुढील प्रश्न वाचा. 
तुमच्या जीवनात दुःख आहे का ? 
समस्या आहेत का ? 
अडचणी आहेत का ?  सगळ्यांची उत्तरे हो अशीच  असतील. आता पुढचे प्रश्न. 
तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे का ?
तुमचे ध्येय साध्य करायचे आहे का ? 
मग दुःख, समस्या, अडचणी यांचं काय करणार ?
त्याला शरण जाणार ? की मात करणार ? की आणखी काय ?? तुम्ही कोणता मार्ग निवडणार? यावर तुमचं यश अवलंबून आहे. याची आपणांस जाणीव असावी. 

गेली दोन दशकं, 5000 हून अधिक रुग्णांना, स्वतः अत्यंत गरिबीत असताना, परिसरातील रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याचे काम ॲम्बुलन्स दादा अगदी मोफत करत आहेत. ''जे दुःख, समस्या, अडचणी आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये." यासाठी पर्यायी व्यवस्था ॲम्बुलन्स दादा यांनी  उभी केली आहे. त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"मरियप्पन थंगवेलू"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/147.html

Wednesday, April 15, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 147.

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 147.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/147.html


जन्म देऊन सोडून गेलेला बाप, अन् वयाच्या पाचव्या वर्षी आलेलं अपंगत्व यावर मात करून, यशच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षीच भारताच्या चौथ्या सर्वोच्च  मानाच्या पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या एका तरुण खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात जाणून घेणार आहोत.चला तर मग....

28 जुलै 1995 रोजी तामिळनाडूतील सालेम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरिअवाडागमपत्ती या गावात एका गरीब कुटुंबात मरियप्पनचा जन्म झाला. आई, बहीण आणि चार भावंडं असा त्याचा परिवार. वडिल घरदार, बायकापोरं वाऱ्यावर सोडून गेलेले. ना शेत,ना दार. अशा खडतर परिस्थितीत आईने वीटभट्टीवर काम करून मुलांचा सांभाळ केला.

इतक्या हलाखीच्या परिस्थितीत देखील संकटं पाठ सोडायला तयार नव्हती. मरियप्पन 5 वर्षांचा असतानाचा एक प्रसंग. तो रस्त्याने जात असताना, नशेत असलेल्या एका बस चालकाने त्याच्या अंगावर बस घातली. या अपघातात त्याला आपला पाय गमवावा लागला. तो कायमचा अधू झाला. आईने त्याला वाचविण्यासाठी, परिस्थिती नसताना कर्ज काढून बराच खर्च केला. तब्बल सतरा वर्षे तिने नुकसानभरपाई मिळविण्यासाठी न्यायालयात लढा दिला.

अपघातातून सावरून मरियप्पन शाळेत जाऊ लागला. वर्गात हुशार असलेला मरियप्पन, मैदानातही तितक्याच चपळ होता. तो हॉलीबॉल उत्तम प्रकारे खेळायचा. त्याच्या उंचपुऱ्या शरीरयष्टीकडे पाहून, पीटी च्या शिक्षकांनी त्याला उंच उडीत सहभाग घेण्याविषयी सल्ला दिला. त्याने तो सल्ला मानला.त्याने उंच उडीचा अधिकाधिक सराव केला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने आपल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला वगळता अन्य स्पर्धक शारीरिकदृष्ट्या सक्षम होते. तरीही त्याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या यशाने त्याचा आत्मविश्वास वाढला.तो जोमाने तयारी करू लागला. त्याची निवड राष्ट्रीय पॅराअथलेटिक्स साठी झाली. याही स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली. येथेच त्याच्यावर एका गुणी प्रशिक्षकांची नजर पडली. त्याला उत्तम मार्गदर्शन मिळाले. मिळालेले मार्गदर्शन आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर, वयाच्या 21 व्या वर्षी 2016 साली रिओ येथे भरलेल्या पॅरालिंपिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक पटकावून स्वतःचा आणि देशाचा मान उंचावला. अशी सुवर्ण कामगिरी करणारा तो खेळाडू म्हणजेच "मरियप्पन थंगवेलू" होय. 

मरियप्पन चा प्रवास वाचून झाला. आता स्वतःला काही प्रश्न विचारा. 
मी अपंग आहे का ? 
माझे आई/वडील मला सोडून गेले आहेत का ?
माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे का ? 

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर "होय" असतील तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात मरियप्पनसारखी देदीप्यमान कामगिरी करणे. बिलकूल अशक्य नाही आणि जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे "नाही" असतील तर आपण सुज्ञ असल्याने मला जादा काही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. "जी माणसं कारणं सांगतात, ती कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत आणि यशस्वी झालेली माणसं कधीच कारणं सांगत नाहीत."

अपघाताने आलेले अपंगत्व, बापाचा नसलेला आधार आणि आत्यंतिक दारिद्र्य या सर्वावर आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या बळावर मात करून मरियप्पन यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला वयाच्या तेविसाव्या वर्षीच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

सध्या आपण "यशवंत - एक प्रेरणास्रोत" च्या सहाव्या पर्वाच्या अंतिम टप्प्यात येवून पोहोचलो आहोत. याची कदाचित आपणांस जाणीव असेलच. या निमित्ताने आपणांस एक विनंती आहे की,गेली तीन आठवडे आपण या लेखनमालेचे अत्यंत मन:पुर्वक वाचन करताहात. याची आपल्या असंख्य प्रतिक्रिया मधून वेळोवेळी प्रचिती येत आहे. आपल्याला हा संपूर्ण प्रवास कसा वाटला ? याबद्दल आपली दीर्घ प्रतिक्रिया लिहून पाठवावी. जेणेकरून त्या ब्लॉगवर प्रसारित करता येतील. तसेच आपण ही लेखमाला ज्या ग्रुपवर फॉरवर्ड करत आहात किंवा इतर कोणत्या ग्रुपवरून वाचायला मिळत असेल. त्याचा एक screenshot अवश्य पाठवावा. जेणेकरून त्याचा उल्लेख अंतिम भागातही करता येईल. शक्य झाल्यास ब्लॉग ला  भेट द्या आणि फॉलो करा.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"दरिपल्ली रमैया"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/146.html

Tuesday, April 14, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 146

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 146.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/146.html

ध्येयाने झपाटलेल्या,त्यासाठी तीन एकर जमीन विकणाऱ्या, लोकांनी वेडा संबोधलेल्या एका ध्येयवेड्या इसमाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

तेलंगणातील खमाम जिल्ह्यातील रेड्डीपल्‍ली या गावात रमैया चा जन्म झाला. लहान मुलं अनुकरणशील असतात. आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक चांगल्या वाईट सवयींचे अनुकरण करत असतात. लहानपणापासूनच रमैया आपल्या आईच्या प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करायचा.

त्याची आई झाडं लावायची.बीज संग्रह करायची. रोपं तयार करून ती लावायची आणि त्याचे संवर्धन करायची. बऱ्याचवेळा झाडे लावण्यासाठी, बीज शोधण्यासाठी रमैयास ती सोबत घेवून जायची. त्यामुळे रमैयाला देखील झाडे लावण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे प्रचंड वेड लागले. त्याला ती सवयच लागली. शाळेत जात असलेल्या रमैयाला आईसोबत बीज गोळा करणे, झाडे लावणे हे त्याचे आवडीचे छंद जोपासता येत नव्हते. त्यामुळे तो बेचैन व्हायचा. शिवाय, शाळेत शिक्षकांनी झाडांचे महत्त्व समजून सांगितल्यानंतर झाडे लावण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. त्याने मनोमन आयुष्यभर झाडे लावण्याचा संकल्प केला.आपला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी दहावीतून त्याने शाळाच सोडली.

रोपं शोधणं,ती लावणं,त्याचं संवर्धन करणं,बीज संग्रह करणं. हा त्याचा नित्याचा दिनक्रम बनला. सायकलवर विविध प्रकारची रोपे घेवून, गावाबाहेर जायचा, मोकळी जागा दिसली की, त्याठिकाणी रोपं लावायचा. त्याचा हा दिनक्रम पाहून लोकं त्यांच्यावर हसायची. त्याला वेडा म्हणून हिणवायची. पण, या सर्वांकडे दुर्लक्ष करून, तो गतीने पुढे जायचा. तो आज इतका पुढे गेला की, त्याने आजवर एक करोडहून अधिक झाडे लावली आहेत. म्हणूनच त्याचा गौरव "The Tree Man Of India" असा केला जातो. तो ट्री मॅन म्हणजेच "दरिपल्ली रमैया'' होय. 

आपल्या ध्येयपूर्तीसाठी ध्येयवेड्या रमैया यांनी तीन एकर जमीन विकली आहे. रमैया यांच्या कार्याची दखल घेऊन "एकेडमी ऑफ यूनिवर्सल ग्‍लोबल पीस" ने "डॉक्‍टरेट" ही मानाची पदवी दिली आहे. शिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे.

असं म्हणतात, 'वेडी माणसं इतिहास घडवितात आणि शहाणी माणसं ती वाचतात,तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात.' पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं. तो शहाण्याचा घास नव्हे. कारण इतिहास घडवायला लागणारं शौर्य, धाडस, धोका पत्करण्याची क्षमता ही फक्त वेड्या माणसातच असू शकते. रमैया यांच्याकडे ते शौर्य, ते धाडस आणि धोका पत्करण्याची क्षमता होती. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"डॉ. उद्धब भराली"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/145.html

Sunday, April 12, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 145

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯 भाग - 145.

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/145.html

सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिलेल्या एका हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला, कुटुंबाच्या अचानक बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावे लागले. त्याच तरुणाच्या नावावर आज 100 हून अधिक पेटंट आहेत. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

7 एप्रिल 1962 रोजी आसाम राज्यातील लखीमपुर येथे एका व्यापार्‍याच्या घरी उद्धबचा जन्म झाला. तो इतका हुशार आणि बुद्धिमान की, त्याला सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिला गेला.  आठवीत असतानाच अकरावी आणि बारावीचे अवघड प्रश्न सहज सोडवायचा. त्याच्या जिज्ञासू वृत्तीने त्याला अनेकदा वर्गाच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा मिळाली.

शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण वडिलांच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे, त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला. बँकेने त्यांना तात्काळ घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवली. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे, निव्वळ अशक्य झाले होते. त्यामुळेच, त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याचा मोठा आघात सहन करून त्याने नोकरीला सुरुवात केली.

"माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी, त्यातून बाहेर पडण्याची एक संधी त्याच्या समोर येतेच. फक्त ती संधी शोधण्याची नजर पाहिजे." एक पॉलिथिन बनवणारे,पाच लाख रुपये किंमतीचे विदेशी यंत्र, कमी पैशात बनविण्याचे आव्हान उद्धबच्या समोर ठेवण्यात आले. "प्रत्येक संकटात एक आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी असते." नेमकं हेच त्यांना हेरलं. आपल्या बुद्धीचा अन् कौशल्याचा वापर करून मिळालेल्या आव्हानाचा सामना करून, त्या विदेशी यंत्राची, अगदी जशीच्या तशी भारतीय कॉपी बनवली.तेही केवळ 67 हजार रुपयांमध्ये. या आव्हानामुळे उद्धबला आपल्यातील क्षमतेचा नव्याने शोध लागला. अनेक लोकांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला, पण, तरीही त्याला भीक न घालता त्याने आपले संपूर्ण लक्ष संशोधनावर केंद्रित केले. 2012 साली त्याने बनवलेल्या एका यंत्रासाठी नासाने एक्सेप्शनल टेक्नॉलॉजी अॅचिवमेंट अॅवार्ड ने त्याला सन्मानित केले. तो जगप्रसिद्ध भारतीय संशोधक म्हणजेच डॉ. उद्धब भराली होय.

डॉ. उद्धब भराली यांच्यासमोर परिस्थितीने मोठे संकट मोठे आव्हान उभे केले. पण, आलेल्या आव्हानात सुद्धा त्यांनी संधी शोधली. यामुळेच त्यांना आपल्यातील क्षमतेचा शोध लागला. म्हणूनच त्यांच्याकडे 100 हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेवून भारत सरकारने त्यांना " पद्मश्री '' मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

आज संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपल्या घरात लॉकडाऊन आहे. या आव्हानाच्या काळात आपण आपल्यातील क्षमतेचा शोध घेतला पाहिजे. धावपळीच्या युगात अशी वेळ,अशी संधी परत कधी मिळेल ? हे सांगता येत नाही. म्हणूनच या आव्हानात संधी शोधण्याचा प्रयत्न करा.


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"चिन्ना पिल्लई"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/144.html

Saturday, April 11, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 144

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯   भाग- 144

*( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/144.html


2001 सालची घटना. दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान मा.श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. तामिळनाडूतील एका अशिक्षित महिलेला तो पुरस्कार मिळाला. ज्यावेळी ती महिला व्यासपीठावर आली. तेव्हा मा. पंतप्रधानांनी त्या महिलेचे चरणस्पर्श केले. असे का घडले असावे ? कोण होती ती महिला ? काय आहे तिचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात.चला तर मग...

तामिळनाडूतील मधुराई पासून 15 कि.मी. अंतरावर असलेले, दाट जंगलात वसलेला एक गाव म्हणजेच पुलूचेरी. चिन्ना नामक 12 वर्षीय मुलगी पेरुमलशी विवाह करून आली. लग्नानंतर काही दिवसातच अशिक्षित चिन्ना आपल्या पतीसोबत शेजारच्या गावातील शेतावर मजुरीसाठी जाऊ लागली. सोबतीला शेजारच्या गावातील अनेक महिला देखील असायच्या. चिन्ना ला दोन मुले आणि तीन मुली झाल्या.

शेतात काम करून मिळणारी मजुरी अतिशय अल्प असल्यामुळे, चिन्ना ने आवाज उठविला. पण, कामाला जाणाऱ्या अनेक महिलांमध्ये एकी नसल्यामुळे पगारात वाढ होऊ शकली नाही. सर्वच लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. तो यासाठी तीनशे पटीने व्याज आकारणी करायचा. त्यामुळे कितीही कष्ट केले तरी कर्ज फेडणे अशक्य होते. चिन्नाची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. सर्वांचीच पिळवणूक व्हायची. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.असे चिन्नाला मनोमन वाटायचे आणि यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला.

1990 साली आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चिन्नाने महिला बचत गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महिलांनी नंतर पुरुषांनी तिच्या या कल्पनेस विश्वास ठेवला नाही. 15 महिला आणि 20 रू प्रती महिना असा प्रवास सुरू झाला. अतिशय अल्प दरात गटातील महिलांना कलंजियन (छोटे कर्ज) मिळू लागले. कर्ज घेवून नवे व्यवसाय सुरू होऊ लागले. यातून महिला, समाज सक्षम होऊ लागले. आज अनेक राज्यात ही कल्पना पोहोचली आहे. चिन्ना आणि तिची कल्पना खूप प्रसिद्ध झाली. तिच्या वरील माहितीपट पाहून तत्कालीन पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी इतके प्रभावित झाले की, चिन्ना ला स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करताना, त्यांनी तिचे चरण स्पर्श केले. ती चिन्ना म्हणजेच चिन्ना पिल्लई होय. 

ज्या समस्या इतरांच्या समोर होत्या, त्याच चिन्ना पिल्लई यांच्याही समोर होत्या. इतरांनी समस्यांपासून पळवाटा शोधल्या. पण, चिन्ना पिल्लई यांनी त्यावर वाट शोधली. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा पद्मश्री हा किताब देऊन सन्मान केला आहे. 

संकटं माणसाची परीक्षा घेत असतात. म्हणून संकटात माणसाने डगमगू नये. प्रत्येक संकटात एक संधी असते आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करता आले पाहिजे. आपण सुशिक्षित आहोत. पण, गरीब, अशिक्षित, अडाणी असून देखील चिन्ना पिल्लई यांनी आपल्या समस्यांवर उपाय शोधला. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 *"बीजमाता राहीबाई पोपरे"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/09/113.html

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 143

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 143

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/143.html

एक उत्तम विद्यार्थी, उत्कृष्ट फुटबॉलपटू आणि डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या एका मुलाला शालेय शिक्षण अर्ध्यातून सोडून लागले. जी वेळ आपल्यावर आली, ती इतरांवर येऊ नये. या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचा पद्मश्री पुरस्कार मिळविण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चला तर मग..

11 नोव्हेंबर 1958 रोजी ओडिसा राज्यातील कटक या शहरात एका गरीब चहावाल्याच्या घरी प्रकाशचा जन्म झाला. प्रकाशच्या वडिलांनी दुसर्‍या महायुद्धात सहभाग घेतला होता. युद्धातून परतल्यानंतर, अथक प्रयत्नानंतरही नोकरी मिळाली नाही. सरतेशेवटी घर चालवण्यासाठी त्यांनी बक्सी बाजार येथील झोपडपट्टी जवळ चहाचे दुकान सुरू केले.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच प्रकाश दुकानावर काम करू लागला. शाळेत उत्तम विद्यार्थी,उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून तो नावाजला जायचा. डॉक्टर बनण्याचे तो स्वप्नं पाहू लागला. परंतु तो अकरावीत असतानाच त्याचे वडील गंभीररित्या आजारी पडले. घरची जबाबदारी प्रकाशवर पडली. कुटुंब जगविण्यासाठी नाईलाजास्तव शिक्षण अर्धवट सोडून, तो चहाच्या दुकानावर काम करून जबाबदारी पार पाडू लागला. डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्नं अपूर्णच राहिले. पण, अर्धवट सोडल्याची खंत त्याच्या मनात कायम राहिली.

चहाच्या दुकानाभवतीचा परिसर झोपडपट्टीचा. येथील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामाला पाठवायचे. येणाऱ्या पैशातून दारू प्यायचे. ही बाब प्रकाशच्या निदर्शनास आली. अर्धवट शिक्षण सोडल्याची खंत अजूनही प्रकाशच्या मनात होती. उनाडक्या करणाऱ्या या मुलांनी शिकायला हवे. असे विचार त्याच्या मनात डोकावू लागले. "जे आपल्या बाबतीत घडले, ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये." परिसरात शाळा नसल्याने आपणच काहीतरी करावे. या विचाराने झपाटला. सन 2000 साली त्याने झोपडपट्टीतल्या या मुलांसाठी स्वतः च्या घरातच शाळा सुरू केली. पहाटे चार ते सकाळी दहा पर्यंत चहाच्या दुकानावर काम करून, शाळेत अध्यापन करून, अनेक अडचणीवर मात करून, प्रकाशने शाळा नावारूपास आणली. शाळेसोबतच प्रकाशदेखील इतका नावारूपास आला की, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" कार्यक्रमात प्रकाशच्या कामाचा गौरव केला. हा प्रकाश म्हणजेच " देवारपल्ली प्रकाश राव " होय. 

या जगात अशी कोणतीच समस्या नाही की, ज्यावर उपाय नाही. ज्या व्यक्ती स्वतःपासून सुरुवात करतात. केवळ त्यांनांच समस्येवर उपाय सापडतो. "उनाडक्या करत फिरणारी झोपडपट्टीतली मुलं'' ही समस्या,ना मुलांची होती ना त्यांच्या पालकांची होती. ती समस्या प्रकाश राव यांची होती. 'कोणत्याही समस्येवर / गोष्टीवर रडत बसणं.' हा उपाय कधीच असू शकत नाही. राव यांनी त्यांच्या समस्यांवर स्वतः च उपाय शोधला. 

पालकांचा विरोध, आर्थिक अडचण, कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारी या सर्वांवर मार्ग काढत, प्रकाश राव यांनी झोपडपट्टीतल्या मुलांच्या अंधःकारमय जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे. त्यांच्या या दीपस्तंभासम कार्याची दखल घेऊन भारत सरकारने 2019 साली त्यांना " पद्मश्री " हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव
9096320023.



🎯 *"हरेकला हजब्बा"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/128.html



Friday, April 10, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 142

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 142

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/142.html

एकेकाळी आपल्या मुलाशी संघर्ष कराव्या लागलेल्या एका अडाणी महिला शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...


ओडिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यातील एका आदिवासीबहुल गावात अडाणी कमलाचा जन्म. तिचा विवाह पात्रपूट या गावात झाला. शेती हा गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय. विशेषतः भात हेच आदिवासींचे मुख्य पीक.

पात्रपूट या गावात लग्न करून आल्यानंतर तिला एक गोष्ट जाणवली की, या गावातील लोक दोन ते तीन प्रकारच्या वेगवेगळ्या देशी वाणांचे उत्पादन घेत आहेत. पिकाच्या कापणीनंतर ते आपसात बियाण्यांची देवाणघेवाण करायचे. त्यामुळे, या गावात मोठ्या प्रमाणावर देशी वाणांची उपलब्धता असायची. पण, काही वर्षानंतर ही परिस्थिती बदलली. गावातील शेतकरी नव्या कमी दर्जाच्या पण, अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे देशी वाणांचे प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे तिच्या लक्षात आले. शिवाय देशी वाणांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे तिच्या लक्षात आले.

देशी वाणांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे, तिने मनाशी पक्के ठरवले आणि तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. पात्रपूट गावाच्या 20 किलोमीटर परिसरात असणाऱ्या वाड्यावस्त्यांवर जाऊन कमलाने वेगवेगळ्या जातीच्या देशी वाणांचे संकलन करायला सुरुवात केली. खराब रस्ते, डोंगरदऱ्या, जंगल आदी पायी प्रवास करून तिने वाणांचे संकलन केले. या कामात तिच्या मुलाच्या विरोधाला तिला तोंड द्यावे लागले. पण, तरीही आपले काम नेटाने पुढे नेत, कमलाने 100 हून अधिक देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण केले आहे. सोबत पारंपरिक शेती चा प्रसारही केला आहे. कमलाच्या या कामाची दखल घेत ओडिसा सरकारने तिला "सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी" या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ती "सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी" म्हणजेच "कमला पुजारी" होय. 

कमला पुजारी यांचे काम हे एक दोन वर्षांचे नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची चार दशकं खर्ची घातली आहेत. शेकडो मैलांचा पायी प्रवास करून, अनेक वड्यावस्त्या पालथ्या घालून त्यांनी शेकडो देशी वाणांचे संकलन केले आहे. त्याचे संवर्धन केले आहे. हे काम करताना त्यांना आपल्या मुलाच्या विरोधाला देखील तोंड द्यावे लागले आहे. परंतु, त्याही परिस्थितीत त्यांनी आपले काम थांबविले नाही. आपण फक्त काम करत राहायचं. ते काम चं इतकं मोठं होतं की, विरोध आपोआप गळून पडतो. कमला पुजारी यांनी देखील हेच केलं. त्यामुळं मुलाचा विरोध गळून पडला.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ 
गीतेतील या श्लोकानुरुप कमला पुजारी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता काम करत राहिल्या. त्यांच्या कामाचे फळ म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार दिला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 *"बीजमाता राहीबाई पोपरे"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/09/113.html

Thursday, April 9, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 141

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 141

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/141.html


सहवास माणसाचं जीवन बदलतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योध्दा झाला. त्याच प्रमाणे आचार्य विनोबा भावे यांच्या सहवासात काही काळासाठी आलेल्या एक सोळा वर्षाच्या अशिक्षित, आदिवासी मुलीची दशा कशी बदलली. तिचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

आत्यंतिक दारिद्र्य, अशिक्षितपणा, नशापान आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आदिवासी समाजात, 15 जुलै 1947 रोजी ओडिसा राज्यातील सेरेना या गावात, एका गरीब कुटुंबात आपाचा जन्म झाला. या समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचं बालपण खाणीवर काम करण्यात जायचं. त्यामुळे इच्छा असून देखील तिला शिक्षण घेता आले नाही.

1963 साली विनोबा भावे यांची भूदान चळवळ ओडिसा राज्यात पोहोचली. 16 वर्षाच्या आपाची भेट विनोबांशी झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आयुष्यभर त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा तिने संकल्प केला. नुसता संकल्प केला नाही तर तो तडीस नेला. आपल्या समाजाची दशा बदलायची असेल, समाजाला दिशा द्यायची असेल, तर समाजातील मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. हा विचार त्या अशिक्षित आपाच्या मनात आला. आणि मग 1964 साली सेरेंदा या गावात एका झाडाखाली, एका अनौपचारिक शाळेची स्थापना केली. सुरुवातीला पालकांनी विरोध केला. पण, त्यांची मनधरणी करण्यात तिला यश आले.

आपाची शिक्षणाविषयी आस्था बघून, समाजसेवा करणाऱ्या काही महिलांनी तिला शिक्षण दिले. स्वतः शिक्षण घेत-घेत,तिने मुलांना शिक्षण दिले. शाळा चालवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. मोठ्या प्रमाणात निधी कमी पडू लागला. म्हणून ती थांबली नाही. भाजी विकून खर्च भागवू लागली. एव्हाना तिची धडपड पालकांच्या लक्षात आली. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढल्याने, जागा अपुरी पडू लागल्याचे लक्षात येताच, पालकांनी शाळेची इमारत बांधून दिली. आज या शाळेची दोन मजली इमारत आहे.शिवाय सहा दशकांच्या मेहनतीमुळे खाण परिसरात तब्बल वीस शाळांची उभारणी आपाने केली आहे. आपाच्या या कार्यामुळे परिसरात तिला "तुलसीआपा" या नावाने ओळखले जाते. ही "तुलसीआपा' म्हणजेच "तुलसी मुंडा" होय.

सहवास माणसाचं जीवन बदलतो. आपण ज्यांच्या सोबत रहातो, त्यांच्या विचारांचा, रहाणीचा, बोलण्याचा आणि वागण्याचा अंमल आपल्यावर होत असतो. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढलं तर, बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून  जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले, तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. बाभळीच्या सहवासात जायचं कि चंदनाच्या ? हे आपण ठरवायचं. तुलसी मुंडा यांना विनोबांचा सहवास लाभला. म्हणूनच, त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलली.

तुलसी मुंडा याच्या कार्याची दखल घेऊन 2001 साली भारत सरकारने ' पद्मश्री ' हा किताब देऊन,तर 2011 साली ओडिसा सरकारने 'ओडिसा लिविंग लिजेंड' हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केलेला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.





🎯 "तुलसी गौडा" यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/129.html

Wednesday, April 8, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 140

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 140

*( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/140.html

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्रतिभासंपन्न असतो. पण, त्या प्रतिभेचा, आपल्यातल्या बेस्टचा जोपर्यंत त्याला शोध लागत नाही. तोपर्यंत तो यशवंत होत नाही. आजच्या भागात अशाच एका व्यक्तीचा जीवन प्रवास आपणासमोर मांडणार आहे की, ज्याला आपल्या प्रतिभेचा शोध वयाच्या 40 व्या वर्षी लागला आणि तो अल्पावधीतच यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला. कोण आहे ती व्यक्ती ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..


31 मार्च 1950 रोजी ओरिसातील बारगढ येथे, एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो दहा वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी तो तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. इतर भावंडांची लग्न झालेली होती. ती आपल्या संसारात मग्न होती. त्यामुळे त्याचा सांभाळ करायला कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळेच स्वतःला जगवण्यासाठी, संघर्ष करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

आपल्या उपजीविकेचेसाठी तिसरीतूनच शाळा सोडली. गावातील एका मिठाईच्या दुकानात भांडी घासण्याचे काम सुरू केले.तब्बल दोन वर्ष त्यांने  मिठाईच्या दुकानात काम केले. त्याच्या संघर्षाकडे बघूनच, गावच्या सरपंचांनी त्याला हायस्कूलच्या हॉस्टेमध्ये नेले. शिकण्यासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याचे काम करण्यासाठी. तब्बल सोळा वर्ष आचार्याचे काम केल्यानंतर, स्वतःचे स्टेशनरी दुकान सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. एका शाळेसमोर त्याने स्टेशनरीचे दुकान सुरू केले.

लहानपणापासून तो देशी लोकगीतं खूप आवडीने ऐकायचा. लोकगीतांचे शब्द त्याच्या मनावर परिणाम करायचे. तो विचारी झाला. वयाच्या 40 व्या वर्षी त्याच्या मनातील वेगवेगळे विचार कागदावर उतरू लागले. कागदावरील विचारांनी रूप घेतले कवितांचे, कवितांनी काव्यसंग्रहाचे आणि काव्यसंग्रहांनी महाकव्यांचे. 1997 साली त्याला लोककवी रत्न म्हणून सन्मानित केले गेले. आणि 2016 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. हा कौशली या भाषेचे संवर्धन करून काव्य रचना करणारा कवी म्हणजेच हलधर नाग होय.

त्यांच्या साहित्याचा समावेश संबलपूर विद्यापीठात केला जाणार आहे. तिसरीतून शाळा सोडावी लागलेल्या हलधर यांच्या साहित्यावर आत्तापर्यंत पाच जणांनी पीएचडी प्रबंध सादर केले आहेत. 

आपल्या प्रत्येकामध्ये काहीनाकाही बेस्ट असतेच. त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. तो जितका लवकर लागेल. तितक्या लवकर आपण यशवंत होतो. वयाच्या 40 व्या वर्षी हलधर यांना आपल्यातील प्रतिभेचा, आपल्यातील बेस्टचा शोध लागला. त्यांनी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धीस दिली.त्यावेळी त्यांच्यावर टीका झाल्या. हे आपले काम नाही. म्हणून, मागे खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य डळमळीत करण्याचे, प्रयत्न केले गेले. आपल्या बाबतीत बऱ्याचदा असेच घडते. आपण लक्ष देतो. परंतु, या सर्वाकडे हलधर यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच एका कवितेपासून सुरू झालेला प्रवास 100 काव्यसंग्रह आणि 20 महाकाव्यांपर्यंत आलेला आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

Monday, April 6, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 139


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 139

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)



जेंव्हा आपल्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडून येतात. तेव्हा, आपल्यातील बहुतेक लोक आपल्या दुःखांमध्ये बुडून जातात. परंतु, अशीही काही लोक आहेत, जे अशा दुःखात देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या अपार धैर्याचे आणि प्रतिभेचे प्रदर्शन करतात. आजच्या भागात अशाच एका शूर सेनानीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग....

1 नोव्हेंबर 1947 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळील पेठ या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात मुरलीचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुरलीला कुस्तीचा शौक होता. पण,गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुढे पूर्ण करता आला नाही. पण, याच कुस्तीच्या जोरावर मिळविलेल्या शरीरयष्टीमुळे तो वयाच्या 17 व्या वर्षीच सैन्यात भरती झाला.

भरती झाल्यावर लगेचच खेळातील प्राविण्य पाहून 1964 साली टोकियो जपान याठिकाणी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मुरलीला मिळाली. सैन्यात राहून खेळात नाव लौकिक मिळवण्याची त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली होती. पण, त्यातच 1965 साली  भारत - पाक युद्ध सुरू झाले. या युद्धात मुरलीचा प्रत्यक्ष सहभाग होता. देशासाठी लढताना त्याने आपल्या शरीरावर 9 गोळ्या झेलल्या. मुरलीवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्याचा जीवन मरणाची संघर्ष सुरू झाला. तब्बल दोन वर्षाच्या संघर्षानंतर त्याला शुद्ध आली. परंतु, कमरेखालचे शरीर लुळे पडल्याने पुढील आयुष्य त्याला चाकच्या खुर्चीवरच बसून काढावे लागणार होते.

प्रसंग बाका होता. जीव वाचला होता पण, कमरेखाली जीवच नव्हता. याही परिस्थितीत खिलाडूवृत्तीच्या मुरलीने हा मोठा आघात पचवलाच. परिस्थितीवर मात करून व्हीलचेअरवर बसून फिरू लागला.व्यायाम करू लागला. पायातील गेलेला जीव त्याने परत आणला आणि स्वतःला अपंगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांसाठी तयार करू लागला.  वेट लिफ्टिंग, गोळाफेक, भालाफेक, नेमबाजी आदी विविध स्पर्धांत सहभागी होऊन यश मिळवू लागला. 1969 साली अपंगाच्या पोहण्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविल्याने इंग्लंडच्या राणीकडून त्याचा सन्मान झाला. 1972 साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक पटकावून दिलं. अशी कामगिरी करणारा मुरली म्हणजेच "मुरलीकांत पेटकर" होय.

आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 127 सुवर्णपदकं तर 154 रौप्यपदकं त्यांनी पटकावली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2018 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

धाडसी लोकांच्या गोष्टी आपणांस प्रेरणा देतात. खरंतर त्या गोष्टी जीवन किती सुलभ आहे ? याचाच प्रत्यय देत असतात. सोपा मार्ग निवडलेल्या व्यक्ती विस्मृतीत जातात. पण, अवघड मार्ग निवडलेल्या व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने चिरकाल जिवंत राहतात. व्हीलचेअरवर बसून, जीवन व्यतीत करण्याचा "अवघड" मार्ग उपलब्ध असताना देखील मुरलीकांत पेटकर यांनी परिस्थितीवर मात करून, परिस्थिती बदलण्याचा आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा "सोपा" मार्ग निवडला. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.
धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 138

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 138

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/138.html


बऱ्याच जणांना "आजीबाईचा बटवा" म्हणजे काय ? हे माहीतच असेल. 'आयुर्वेदिक’ पदार्थाचा खजिना म्हणजे "आजीबाईचा बटवा". घरात कुणी आजारी पडले तर तातडीने उपचार म्हणून बटव्यातील अनेक पदार्थ कामी यायचे. पण काळाच्या ओघात हा आजीबाईचा बटवा दुरापास्त झाला. असे असले तरीही केरळ येथील एक आजी आपल्या याच बटव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या आजीचा प्रेरणादायी प्रवास. आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग...

केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जवळील कोलार या छोट्याशा खेड्यात 1943 साली आजीबाईचा जन्म झाला. आजी काणी जमातीच्या आदिवासी कुटुंबातील. त्यामुळं जंगलाशी त्यांचं अतूट नातं. 1950 साली आजीबाई शाळेत दाखल झाल्या. शाळेत दाखल होणाऱ्या त्यांच्या भागातील हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्यांपैकी एक.

आजीची आई पारंपरिक वैद्य चिकित्सक होती. शिवाय ती उत्तम दाई होती. आजीला वेगवेगळ्या वनस्पतींपासून औषधे बनविण्याचे तंत्र आईनेच शिकविले. वयाच्या 28 व्या वर्षांपासून जंगलात अनेक किलोमीटर चा प्रवास करून वनौषधी शोधणे,त्या वनौषधी चे संवर्धन करणे, जोपासणे, त्यापासून औषधे बनविणे आणि ते गरजूंना देणे. हे काम अतिशय आवडीने आणि ना थकता करू लागली. हळूहळू आजीचा बटवा समृद्ध होऊ लागला आणि तिच्या बटव्यात पाचशेहून अधिक औषधी जमा झाल्या.पण,

एक दिवस आजीच्या आयुष्यातील सर्वाधिक वेदना देणारा ठरला. तिच्या मुलाला सर्पदंश झाला. तिच्या कडे सर्पदंशावर वनौषधी उपलब्ध नसल्यामुळे, मुलांला दवाखान्यात न्यायची वेळ आली.पण, जंगलात खूप आत राहत असल्याने आणि पक्का रस्ता नसल्याने तिच्या मुलाचा दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. याचा तिच्यावर प्रचंड मोठा आघात झाला आणि तिने सर्पदंशावर वनौषधी शोधण्याचा निश्चय केला.

खूप मेहनत करून, प्रचंड शोधाशोध करून शेवटी तिने सर्पदंशावर वनौषधी शोधलीच. तिच्या या वनौषधीचा परिसरातील लोकांना निश्चितच फायदा होऊ लागला. यामुळे लोकांचे प्राण वाचवले. म्हणूनच परिसरात ती "विष उतरवणारी"(Poison Healer) म्हणून प्रसिद्ध झाली. ती "विष उतरवणारी" आजी म्हणजेच "लक्ष्मीकुट्टी" होय.

गेली पाच दशकं लक्ष्मीकुट्टी वनौषधी शोधणे, जतन करणे,संवर्धन करणे, प्रसार करणे, लोकांना देणे यासारखी कामे प्रामाणिकपणे करत आहे. म्हणूनच केरळ सरकारने 1995 साली नट्टू वैद्य रत्न पुरस्कार देवून तर भारत सरकारने 2018 सालचा पद्मश्री मानाचा किताब देऊन लक्ष्मीकुट्टी यांचा सन्मान केला आहे. 

माणसासमोर समस्या उभी राहिली तर त्याच्यासमोर तीन मार्ग असतात. पहिला शरण जाणे, दुसरा मात करणे आणि तिसरा जे आपल्या वाट्याला आले,ते  इतरांच्या वाट्याला येऊ नये. यासाठी पर्याय निर्माण करणे. लक्ष्मीकुट्टी यांनी तिसरा मार्ग निवडला म्हणूनच सर्पदंशावर रामबाण उपाय त्या शोधू शकल्या. "मन की बात" या कार्यक्रमात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत, लक्ष्मीकुट्टी उल्लेख करून गौरव केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 डॉ. तात्याराव लहाने यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/4.html

Sunday, April 5, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 137

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 137

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/137.html



अनेकांना आपण कशासाठी जगत आहोत? आपण अस्तित्वात का आहोत ? हे माहीत नसते.आपण येथे का आहोत ? यावर आपण कधी गंभीरपणे विचार केला आहे का? ज्यांनी याचा गंभीरपणे विचार केला, केवळ त्याच व्यक्ती ध्येयाचा पाठलाग करण्यात यशस्वी होतात. गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या एका डॉक्टरचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग...

ही कथा आहे, पश्चिम बंगाल मधील बिरटी येथील रहिवासी असलेल्या एका सुजन ची. सुजन डॉक्टर असल्याने एका हॉस्पिटलमध्ये  नोकरी करायचे.

काही वर्षे हॉस्पिटलमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरू करण्याचा निश्चय केला आणि 1980 साली तो प्रत्यक्षात आणला. तब्बल 20 वर्षे त्यांनी स्वतःचा दवाखाना उत्तम रीतीने चालविला. वैद्यकीय व्यवसायातील कमाईने सर्व सुखसोयी पायाशी लोळण घेत होत्या. कशाचीही कमतरता नव्हती. अशातच आपण कशासाठी जगत आहोत? आपण अस्तित्वात का आहोत ? असे गंभीर विचार त्यांच्या मनात येवू लागले आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

भारत - बांगलादेश च्या सीमेजवळ असलेले सुंदरबन. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे वाघांचे अस्तित्व आहे. सन 2000 साली, सुंदरबन जवळील हिंगलगंज या अतिशय दुर्गम खेड्यात, एका चॅरिटेबल या ट्रस्ट च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यास सुजन यांनी प्रारंभ केला.

सुजन कोलकाता येथून दर शनिवारी 6 तासांचा आणि 90 किमीचा प्रवास करून हिंगलगंज या गावी जायचे आणि रविवारी दिवसभर त्या गावातील 250 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देवून संध्याकाळी घरी यायचे. वर्षभरात साधारणपणे 12000 रुग्णांना ट्रस्ट च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देतात.तेही मोफत. ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ही वैद्यकीय सेवा देण्याचे ते काम करत आहेत,त्या ट्रस्ट चे नाव आहे "सुजन". यामुळेच सुंदरबन परिसरात "सुंदरबन चे सुजन" म्हणून ते परिचित आहेत.  ते "सुंदरबन चे सुजन" म्हणजेच डॉ.अरुणोदय मंडल होय.

डॉ. मंडल यांनी गेली 20 वर्षे दुर्गम भागात निस्वार्थीपणे, अथक आणि मोफत वैदयकीय सेवा देण्याचे व्रत तडीस नेले आहे. या समाजोपयोगी कार्याचा सन्मान 2020 साली भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देवून केला आहे.

पैसा आणि पैशाने विकत घेता येतात त्या वस्तू मिळवणे, हाच अनेकांच्या जीवनाचा मुख्य उद्देश असतो. काहींचे जगात नाव कमावण्याचे ध्येय असते तर, काहींचे आपली कलाकौशल्ये पूर्णत्वास नेण्याचा उद्देश असतो.असेही काही लोक असतात ज्यांचा उद्देश आहे इतरांना मदत करणे. सर्व सुखसोयी उपलब्ध असताना, आपल्या जन्माचे साध्य काय आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न डॉ. मंडल यांनी केला. सरतेशेवटी त्यांना त्याचे ध्येय सापडले आणि साध्य करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांच्या याच धडपडीने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या याच धडपडीने त्यांना पद्मश्री बनविले म्हणूनच आज ते एक यशवंत आहेत.


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.


🎯 डॉ. तात्याराव लहाने यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/4.html

Saturday, April 4, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत वभाग - 136

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 136

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/136.html

वयाच्या 23 व्या वर्षी वैधव्य आलेल्या एका महिलेने   एक मोठं स्वप्नं पाहिलं. आपलं स्वप्नं सत्यात. उतरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महिलेचा प्रेरणादायी प्रवास आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.... चला तर मग...

भारत पारतंत्र्यात असतानाचा काळ. सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना 1943 साली,पश्चिम बंगाल मधील एका गरीब शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे तिचे कोणतंही औपचारिक शिक्षण झालं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला आणि काही वर्षातच चार मुलांची आई झाली.

घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. नवरा कष्ट करून आणायचा, तेंव्हाच घरात काहीतरी शिजायचं. अशा परिस्थितीत एके दिवशी तिचा नवरा आजारी पडला. आजरी नवऱ्याला घेऊन ती दवाखान्यात गेली. ' आधी पैसे, मग इलाज ' अशी भूमिका डॉक्टरनी घेतली. या परिस्थितीत पैसे उभे करणे, म्हणजे उभा डोंगर फोडून सपाट करण्याइतकं ते कठीण. बिचारी आपल्या नवऱ्याच्या उपचारासाठी पैसा उभा करु शकली नाही. तिचा नवरा हे जग सोडून गेला. ती विधवा झाली, त्यावेळी ती केवळ 23 वर्षांची होती. नवऱ्याच्या मृत्यूने ती केवळ दुःखी, कष्टीच झाली नाही, तर ती हडबडून गेली. घडल्या प्रसंगाने  तिच्या मनावर मोठा आघात झाला.

घडलेला प्रसंग अतिशय विदारक होता. ती विचारात पडली आणि तिने मोठा संकल्प केला, " ज्या मातीत आपल्या नवऱ्याचा शेवट झाला,त्याच मातीत एक हॉस्पिटल उभं करण्याचा."  

ज्यावेळी तिने हा "पण" केला, त्यावेळी खांद्यावर चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आणि हाती केवळ शून्य होते. तिने मोलमजुरी करायला सुरुवात केली. चार पैकी हुशार असलेल्या एका मुलाला अनाथालयात सोडलं आणि बाकीच्यांचा सांभाळ करू लागली. धुणीभांडी करणे,भाजीपाला विकणे,मजुरी करणे यासारखी कामे करून पै - पै जमा केली. थोरला मुलगा हुशार, त्याला डॉक्टर बनवायचं स्वप्नं पाहू लागली.

तब्बल 20 वर्षं आपल्या स्वप्नांसाठी खपली. 1992 साली गावात जागा खरेदी केली. 1993 साली एका ट्रस्ट ची स्थापना केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पत्र्याच्या शेडमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं. आज या हॉस्पिटलची स्वतःची तीन एकर जागा, तीन मजली इमारत आहे. शिवाय या हॉस्पिटल तिचा डॉक्टर मुलगा रुग्णाची मोफत सेवा करतो आहे. आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी ती महिला म्हणजेच सुभाषिनी मिस्त्री होय.

" केवळ पैशाअभावी आपल्या नवऱ्यावर उपचार होऊ शकले नाहीत. जे दुःख आपल्या वाट्याला आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये." याच उदात्त हेतूने प्रेरित होऊन हॉस्पिटल उभारणीचं स्वप्नं सुभाषिनी मिस्त्री यांनी पाहिलं आणि अनंत अडचणींवर मात करून ते उभं केलं. त्यांच्या या कार्याचा सन्मान भारत सरकारने 2018 सालचा पद्मश्री हा मानाचा किताब देऊन केला आहे. 

माणसाची इच्छा जर ज्वलंत असेल, तर त्या माणसाचं ठरवलेल्या ध्येयावर पोहोचणं निश्चित असतं. मग रस्त्यात कितीही अडथळे येवोत,  असंबंधित गोष्ट आहे. कुठल्याही इच्छेला ज्वलंत करण्यापूर्वी, कुठल्याही गोष्टीसाठी वेडे होण्यापूर्वी ती गोष्ट तुम्हाला खरोखरच पाहिजे आहे का ? याचा विचार करून घ्या. एकदा नाही शंभरदा. कारण, माणूस एकदा कशासाठी वेडा झाला, तर ती गोष्ट त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं सुभाषिनी मिस्त्री बाबतीत हेच घडलं. त्यांची इच्छा ज्वलंत होती. त्यामुळे त्यांचे स्वप्नं सत्यात उतरवू शकल्या. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 आपल्या पतीसाठी, पतीच्या स्वप्नासाठी खडतर संघर्ष करणाऱ्या प्रेरणादायी महिलांचा प्रवास वाचण्यासाठी फोटो वर येथे क्लिक करा.






Thursday, April 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 135

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 135

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/135.html

अंगावर बसलेला साधा मच्छर उठवण्यासाठी, ज्याला आपला हात उचलता येत नाही. त्या व्यक्तीने पद्मश्री सारखा चौथा सर्वोच्च पुरस्कार मिळविला. त्याला हे कसे शक्य झाले ? कोण आहे हा यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

6 मे 1954 रोजी तामिळनातीतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील अयिकुडी यागावी, एका सामान्य कुटुंबात राम चा जन्म झाला. जात्याच हुशार असलेल्या रामने आपल्या बुदधिमत्तेच्या जोरावर 1970 साली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. चौथ्या वर्षाला असतानाच नौदलात भरती होण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि लगेचच अर्ज भरून तयारी देखील सुरू केली.

मुळातच जिद्दी स्वभावाचा राम, नौदल पात्रता परीक्षेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम चाचणीत झाडावरून Zig-Zag प्रकारची उडी मारत असताना राम खाली कोसळला. पाठीच्या कण्याला जबरदस्त मार बसला. मानेपासून खालचे संपूर्ण शरीर निर्जीव झाले. आपले पुढील संपूर्ण जीवन चाकाच्या खुर्चीवर बसून व्यतित करावे लागणार आहे. याची कल्पना त्याला वयाच्या 21 व्या वर्षी आली होती.

निराशा, भिती आणि चिंतेने ग्रासलेल्या रामवर पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. येथे त्याची ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. अमरजितसिंह चहल यांच्याशी भेट झाली. डॉ.चहल यांनी राम च्या जखमेवर फुंकर घातले. त्याची समजूत काढली आणि जगण्याची नवी चेतना निर्माण केली.

रामने जगण्याचा नवा मार्ग शोधला. 1981 साली अमर सेवा संगम (डॉ.चहल यांच्या सन्मानार्थ) ही सामाजिक संस्था सुरू करून, त्याच्या माध्यमातून अपंग मुलांसाठी शाळा सुरू केली. संस्थेचा विस्तार आणि लौकिक वाढला. मोठा जनाधार मिळाला. गेली 4 दशकं अमर सेवा संस्था तिरूनवेली जिल्ह्यातील 300 हून अधिक गावातील 300 अपंग मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम करते आहे आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम, चाकाच्या खुर्चीवर बसलेला राम करतो आहे. भारत सरकारने 2020 साली पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने रामला सन्मानित करून त्याच्या या अतुलनीय कार्याचा गौरव केला आहे.तो राम म्हणजेच "एस. रामकृष्णन" होय. 

अपंगत्व हा शरीराला झालेला आजार आहे, मनाला नाही. ज्यावेळी मनाला अपंगत्व येते,त्यावेळी व्यक्ती जीवनातून हद्दपार झालेली असते. नेमका हाच विचार डॉ. चहल यांनी रामकृष्णन यांच्या मध्ये पेरला आणि त्याच्या जीवनाची दशाच बदलली. नैराश्य आल्यावर प्रेरणा देणाऱ्या शेकडो गोष्टी आपल्या अवतीभवती उपलब्ध असतात.गरज आहे तो फक्त डोळसपणे पाहण्याची आणि कृती करण्याची. डॉ. चहल यांनी दिलेली प्रेरणा रामकृष्णन यांनी डोळसपणे स्वीकारली आणि कृती केली. प्रेरणेची एक ठिणगी व्यक्तीचे जीवन बदलू शकते. हेच यावरून सिद्ध होते.

4 दशकं चाकाच्या खुर्चीवर बसून केवळ मन आणि मेंदू चा वापर करून रामकृष्णन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

अंगावर बसलेला साधा मच्छर उठवण्यासाठी, ज्याला आपला हात उचलता येत नाही. ती व्यक्ती पद्मश्री सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळवू शकते. आपण तर धडधाकट आहोत... विचार करा.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/134.html

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 134


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 134

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/134.html

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक 21 वर्षांचा तरुणाला अपंगत्व आले. आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी तो शिक्षक बनला. त्या दिव्यांग शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

धरतीचा स्वर्ग म्हणताच ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे काश्मीर. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या राज्याला दहशतवादी कारवायांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा स्वर्ग, नर्क होतोय की काय ? अशी शंका वाटते आहे. कित्येक कुटुंबं या दहशतवादी कारवायांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. अशाच एका दहशतवादी हल्ल्याला अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहाडा या दुर्गम खेड्यातील एका तरुणाला सामोरे जावे लागले.

21 मार्च 1996 चा तो दुर्दैवी दिवस. त्याच्या काकांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. झालेल्या गोळीबारात काकांचा मृत्यू झाला आणि पाठीत गोळी लागल्याने तो कायमचाच अपंग झाला. स्वतः ला ना उठता यायचं. ना बसता. चालणं तर दूरच. हे सारं घडलं, त्यावेळी तो केवळ 21 वर्षांचा होता. या परिस्थितीत तो वर्षभर अंथरुणावरच पडून होता.

सगळं काही गमावून बसलेला तो, एकेदिवशी आपल्या पुढील जीवनाचा विचार करत बसला होता. बाहेर लहान मुलांचा दंगा ऐकु येवू लागला. त्याच्या डोक्यात एक विचार आला. तसे त्याने त्या मुलांना घरात बोलावून घेतलं आणि सुरू झाला एक नवा अध्याय. त्याने मुलांची शिकवणी सुरु केली. तो शिक्षक बनला. त्याच्या जगण्याला आधार मिळाला. जीवन जगण्याचा नवा मार्ग मिळाला. चार वर्ष तो अंथरुणावर बसूनच मुलांची मोफत शिकवणी घेऊ लागला. यामुळेच त्याचा आत्मविश्वास वृध्दींगत झाला.

आता तो पुढील शिक्षणासाठी बाहेर पडला. यामुळेच तर त्याला दिव्यांगांच्या समस्यांची जाणीव झाली. त्याला त्याच्या जीवनाचे नवे ध्येय गवसले. आपले संपूर्ण जीवन दिव्यांगांसाठी अर्पण करण्याचा त्याने निर्धार केला. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कामाला सुरुवात केली. 2007 साली आपल्या आजीच्या नावाने दिव्यांग मुलांसाठी शाळेची स्थापना करून अध्यापनाला सुरुवात केली. आजवर या शाळेच्या माध्यामातून शेकडो मुलांना शिक्षण दिले आहे,तेही मोफत. यासाठी गेली दोन दशकं तो झटतो आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने "पदमश्री" हा मानाचा किताब देवून त्याचा गौरव केला आहे. तो दिव्यांग शिक्षक म्हणजेच जावेद अहमद टाक होय.

अपंगत्व असणं किंवा अपंगत्व येणं हा काही आपला दोष नाही. पण, अपंग राहणं हा मात्र आपला दोष आहे. जावेद यांना जीवनात बदल घडविण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच त्यांच्या समोर मार्ग खुले झाले. आपल्या वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करत जावेद यांनी नवा इतिहास रचला आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

"स्वप्नं पाहणं" हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. "स्वप्नं वास्तवात आणणं" हे आपलं कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. हाच धडा घेवून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.



🎯 जेसिका कॉक्स, विल्मा रूडाल्फ, अरूनिमा सिन्हा, दीपा मलिक, प्रांजल पाटील, निकोलस विजिसिक या सारख्या अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या यशवंतांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.



















Tuesday, March 31, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 133


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 भाग - 133

( STAY HOME, STAY SAFE...GO CORONA...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/133.html


मुंबईमध्ये आयकर विभागात चांगल्या पदावर असलेल्या अंकल नी, एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, नोकरी सोडून दिली. या अंकल चे पुढे काय झाले असावे ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

अंकल यांचा जन्म केरळमधला. ते मुंबई येथे आयकर विभागात एका उच्च पदावर कार्यरत होते. नोकरी सोडण्याचा अन् वेगळं काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. या विचाराला बळकटी दिली, ती भारत भ्रमणाने. या प्रवासात वेगवेगळ्या भागात जाऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या.

जीवन जगण्यासाठी, केवळ पैसे मिळविण्यापेक्षा एक उत्तम मार्ग त्यांना सापडला. जीवनाचे नवे ध्येय त्यांना गवसले आणि 1979 साली नोकरी सोडून ईशान्य भारतातील, अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील, वंचित मुलांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन, लोहित या जिल्ह्यात काम करायला सुरुवात केली. 1996 पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून एका संस्थेत काम केले.

मुलांच्या विकासात पुस्तकांचे, ग्रंथांचे स्थान मोठे आहे. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते. असे त्यांचे मत होते. ग्रंथालयांचे महत्व ओळखून, 2007 मध्ये लोहित युवा ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून, बांबोसा ग्रंथालयांची उभारणी सुरू केली. आज संपूर्ण अरुणाचल प्रदेशात 13 बांबोसा ग्रंथालय आहेत आणि यामध्ये लोकसहभागातून जमा केलेली, तब्बल 10000 पुस्तके आहेत. त्यांनी ग्रंथालये सर्वसामान्यांच्या जवळ नेण्याचे काम केले. मुलांसाठी ते स्तंभ लेखन करतात. यामुळेच ते परिसरात "अंकल मूसा" या नावाने ओळखले जातात. हे "अंकल मूसा" म्हणजेच "सत्यनारायण मुंदयुर" होय. 

शिक्षण आणि वाचन संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी गेली चार दशकं ते अरुणाचल प्रदेशात काम करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना 2020 सालाचा पद्मश्री हा मानाचा किताब देऊन केला आहे. 

विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली माणसं ध्येय पूर्ण होई पर्यंत झटतच राहतात. मग काळाचं आणि वेळेचं भानंच राहत नाही. ध्येपूर्तीसाठी त्याग महत्त्वाचा असतो. नोकरीचा,पैशाचा आणि ऐन उमेदीच्या चार दशकांचा त्याग अंकल मूसा यांनी केला आहे. यामुळेच ते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकले आणि म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
*श्री संदीप पाटील, दुधगाव.*
*9096320023.*




🎯 अॅपल कंपनीतून हकालपट्टी केल्यानंतर नाराज न होता, निराश न होता धैर्याने काम करून पुन्हा अॅपल कंपनीत मानाचे स्थान मिळविणाऱ्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/08/106.html