Showing posts with label पर्व सातवे भाग 151 ते 175. Show all posts
Showing posts with label पर्व सातवे भाग 151 ते 175. Show all posts

Thursday, June 11, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 175

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 175
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/175.html

एका गरीब परंतु कर्तबगार पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या आणि पित्यासारखीच स्वतःची कर्तबगारी दाखवून, स्वतःला सिद्ध करणाऱ्या आणि केवळ भारतातील नव्हेच तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या एका यशस्वी व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग...

रोजगाराच्या निमित्ताने येमेन या देशात गेलेल्या एका गरीब पित्याच्या पोटी 19 एप्रिल 1957 रोजी मुकूचा जन्म झाला. चार भावंडात तो सर्वात थोरला. त्याच्या वडिलांचे विचार अतिशय उच्च होते. त्यांची स्वप्नं मोठी होती आणि त्यासाठी ते वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवायचे. काही दिवसांनी वडील भारतात परतले आणि मुंबईत आपला नवा व्यवसाय थाटला.

वडिलांचे कष्ट, त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी पाहत मुकू मोठा होत होता. न कळत बालवयातच त्याने व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली. वडिलांनी व्यवसायात जम बसविला होता. त्यामुळेच आपले महाविद्यालयीन शिक्षण संपवून तो अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. इकडे वडिलांनी व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी मुकुला मदतीसाठी बोलावून घेतले. तो आपले शिक्षण अर्ध्यातच सोडून परतला. त्याने वडिलांच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. त्यावेळी तो केवळ 18 वर्षांचा होता. आता व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी मुकु सांभाळू लागला. वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि मुकु च्या मेहनतीमुळे त्यांची कंपनी यशाचे शिखर पादाक्रांत करू लागली. पण, या यशाला ग्रहण लागले. 2002 साली त्याच्या वडिलांचे निधन झाले. भावासोबत मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी वाटणी करण्याचे ठरले. एकत्र बांधलेली मोळी झटक्यात सुटली.

वडिलांचे निधन आणि भावाबरोबर बिघडलेले संबंध यामुळे काही काळ मुकु नाराज झाला. पण, याहीप्रसंगातून तो लवकरच बाहेर पडला. त्याने आपले संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले. अनेक प्रकारच्या व्यवसायात स्वतःच्या कंपनीचा दबदबा निर्माण केला आणि 2007 साली आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या आणि अथक मेहनतीच्या बळावर तो भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाला. सलग 13 वर्षे तो या स्थानावर विराजमान आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुकु म्हणजेच मुकेश अंबानी होय. 

जगात अशी काही उदाहरणे आहेत की, वडिलांच्या कर्तबगारीपुढे मुलाची कर्तबगारी ठेंगणी किंवा नगण्य वाटते. परंतु, मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्तिमत्त्व असं आहे की, ज्यांनी आपल्या वडिलांच्या कर्तबगार इतकीच स्वतःची कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. धीरूभाई अंबानी यांनी पाचशे रुपयेपासून सुरुवात करून सरतेशेवटी कंपनी पंच्याहत्तर हजार कोटींवर नेऊन ठेवली. तीच कंपनी  मुकेश अंबानी यांनी आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर कंपनीला लाखो कोटींच्या घरात नेऊन ठेवली. ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 13 व्या स्थानी विराजमान आहेत. म्हणूनच ते यशवंत आहेत.


मित्रहो, "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या प्रेरणादायी लेखमालेच्या, सातव्या पर्वाचा आजचा अंतिम भाग. हा प्रवास आपणास कसा वाटला ? ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत नमस्कार...

धन्यवाद..



🎯 यापूर्वीचे सर्व लेखन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *भाग - 174* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/174.html

Wednesday, June 10, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 174

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 174
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

झालेल्या अपमानाचा बदला, बोलून घेण्यापेक्षा कृतीतून घेणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेण्यासाठी हॉटेल मध्ये भांडी घासणार्‍या, कारकुनी करणाऱ्या, भारतातील एका मोठ्या उद्योजक घराण्यातील व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग..

28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथील एका पारशी  आणि मोठ्या व्यावसायिक कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यामुळेच अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर व्यवसायाचे संस्कार झाले. जरी तो श्रीमंत घरात जन्माला आला असला, तरी त्याचं बालपण अतिशय खडतर होतं. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. तो एकटा पडला. त्याचा संपूर्ण सांभाळ त्यांच्या आजीनेच केला.

त्याचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले आणि पदवीच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. तो स्वाभिमानी होता. त्याच्या आजोबांच्या नावाचा साऱ्या जगात दबदबा होता. पण, तरीही त्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते. त्याला स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण करायचे होते. यासाठी त्याने कारकुनाची नोकरी केली, तर कधी हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम केले. येथेच तो एका तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला. त्या तरुणीने लग्नासाठी अमेरिकेतच राहण्याची अट ठेवली होती. परंतु, लहानाचं मोठं करणाऱ्या आजीची तब्येत बिघडल्याने तो भारतात परत आला. तो पुन्हा गेलाच नाही. पर्यायाने त्याचा प्रेमभंग झाला. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतरचा हा दुसरा मोठा आघात त्याने सहन केला आणि आपल्‍या कुटुंबाच्‍या व्यवसायात स्वतःला झोकून दिले.

येथे त्याने सर्वसामान्य कामगाराप्रमाणे अनेक छोटी मोठी कामे केली. कारखान्यातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याला मोठी आव्हानं दिली गेली. त्याच्या ताब्यात एक नुकसानीत असलेली कंपनी सोपवण्यात आली. आपल्या परिसस्पर्शाने, परिश्रमाने आणि व्यावसायिक कौशल्यांने तीन वर्षांतच कंपनी नफ्यात आणली. परंतु, आणीबाणीने आणि कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे, ती कंपनी बंद करावे लागली. हे पहिले मोठं अपयश त्याच्या नावावर जमा झालं. अशीच दुसरी कंपनी ताब्यात दिली गेली. पण, तिही संचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बंद करावी लागली. याचेही खापर त्याच्यावरच फोडण्यात आले. यामुळेच तो जबरदस्त दुखावला असला तरी, त्याची जिद्द, चिकाटी जरा देखील कमी झाली नव्हती. अनुभवाच्या शाळेत त्याने उत्तम शिक्षण घेतले होते. यामुळेच 1991 साली त्या संपूर्ण समूहाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येवून पडली.


अनेकांनी त्याच्यावर टीका केली. अविश्वास दाखवला. पण, त्याच्या अधिपत्याखाली कंपनीची यशस्वी घोडदौड सुरूच राहिली. 'चांगल्या रस्त्याला गतिरोधक फार असतात.' असाच अनुभव त्याच्या वाट्याला आला. 1998 साली त्याची एक कंपनी तोट्यात जाऊ लागली. सबब ती फोर्ड कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या व्यवस्थापकाने त्याचा मोठा अपमान केला. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने तो व्यवहार रद्द केला आणि नव्या जोमाने, नव्या जोशाने कामाला लागला. काही वर्षातच आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तोट्यात चाललेल्या कंपनीला नावारूपास आणले. काही वर्षानंतरही फोर्ड कंपनी च्या दोन कंपन्या विकत घेऊन आपल्या अपमानाचा बदला घेतला. त्याने 'बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतींने उत्तर दिले.' आपल्या कृतीने उत्तर देणारा तो 'उद्योग जगतातला संत' म्हणजेच 'मा. रतन टाटा' होय.

1991 साली रतन टाटा यांनी टाटा सन्सची धुरा सांभाळली. तेव्हापासून या उद्योगसमूहाने मागे वळून पाहिलेले नाही. उद्योगविस्ताराबरोबर नैतिकता जपण्याला टाटा समूह पहिले प्राधान्य देतो.

तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्या लोकांनाही मोठ्या संघर्षातून जावे लागते. रतन टाटां यांना देखील अनेक संकट आणि अपयश यांना सामोरे जावे लागले आहे. आपल्याकडे धैर्य, चिकाटी, ध्येयासाठी लागेल तितके कष्ट करण्याची तयारी असेल तर संकटं देखील पायाची दासी होईल आणि यश डोक्यावर मुकुट घालेल. टाटा कदाचित पैशाने सर्वाधिक श्रीमंत नसतील, परंतु , त्यांच्या विचारांनी ते भारत देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 यापूर्वीचे सर्व लेखन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *भाग - 173* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/173.html

Tuesday, June 9, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 173

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 173
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


एकेकाळी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गाव सोडावे लागलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या आणि याच जाचक परिस्थितीमुळे अर्धपोटी राहावे लागलेल्या एका व्यक्तीने जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. त्याला हे यश कसे मिळाले ? काय आहे त्याचा संघर्ष ? कोणी ही व्यक्ती ? जाणून घेऊन आजच्या भागात.. चला तर मग...


15 जून 1950 रोजी राजस्थान मधील सादुलपुर या खेड्यात एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर केवळ दोनच वर्षात बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या वडिलांनी गाव सोडले आणि ते कोलकाता शहरात स्थायिक झाले. सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याच्या वडिलांनी एका कारखान्यात नोकरी स्वीकारली. अथक परिश्रमाच्या जोरावर त्याच्या वडिलांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली आणि स्वतःचा एक कारखाना सुरु केला.

वडिलांचे कष्ट, मेहनत, जिद्द, समर्पण इत्यादी तो डोळ्याने पाहत मोठा झाला. व्यवसायाचा संस्कार बालवयातच त्याच्यावर होत गेला. त्याचे संपूर्ण शिक्षण कोलकाता येथेच झाले. त्याने वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. वडिलांचा व्यवसाय जोमात सुरू होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तो आपल्या वडिलांना त्याच्या व्यवसायात मदत करायचा. व्यवसायातील बारकावे त्याने आत्मसात केले.

एक दिवस वडिलांनी त्याला इंडोनेशिया देशात व्यवसायाच्या निमित्ताने खरेदी केलेली जमीन विकण्यासाठी पाठविले. तो गेला आणि त्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. या देशात आपण व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो. असे त्याच्या लक्षात आले आणि त्याने वडिलांना स्टील कंपनी उभी करण्याचे सुचवले. 1976 साली म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आपला पहिला कारखाना उभा केला. अथक परिश्रम करून त्याने ही कंपनी नफ्यात आणली. आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.  कंपनी उभी करताना त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे, 'एखादी कंपनी उभी करण्यासाठी एक आयुष्य कमी पडतं. कंपनी उभी करण्यापेक्षा कारखाना किंवा कंपनी विकत घेणंच अधिक फायदेशीर ठरतं.' त्याने याच पद्धतीचा अवलंब केला. जगभरातील नुकसानीत असलेल्या स्टील कंपन्या ताब्यात घेऊ लागला. आपल्या, बुद्धीच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर तो नफ्यात आणू लागला. 30 वर्षे झटून जगातील एकूण स्टील उत्पादना मधील आपला वाटा 10 टक्के इतका केला आणि यामुळेच जगभरात त्याची ओळख 'स्टील किंग' म्हणून निर्माण झाली. तो 'स्टील किंग' म्हणजेच 'लक्ष्मीनिवास मित्तल' होय.

"जी माणसे पायाने चालतात, ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात, ती निश्चितच ध्येय गाठतात." हे विधान मित्तल यांना अगदी तंतोतंत लागू पडतं. 

एकेकाळी अत्यंतिक दरिद्र्याला सामोरे गेलेल्या, कुटुंबात जन्माला आलेले लक्ष्मीनिवास मित्तल यांनी आपल्या वडिलांकडून व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली. आपल्या बुद्धीच्या आणि व्यावसायिक कौशल्यांचा वापर करून, वडिलांनी निर्माण केलेल्या साम्राज्याचा मोठा विस्तार करून जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच ते 2005 साली जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 172* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/172.html

Monday, June 8, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 172

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 172
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.


वडिलोपार्जित व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे डोक्यावर लाखों रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसायात उतरलेल्या एका तरुणाने अब्जावधी डॉलर्स चा व्यवसाय उभा केला. त्याला हे कसे जमले ? काय आहे त्याच्या यशाचं रहस्य ? कोण ही व्यक्ती ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

हरियाणा मधील हिसार शहरामध्ये बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या मारवाडी व्यावसायिक कुटुंबात, 30 नोव्हेंबर 1950 रोजी त्याचा जन्म झाला. पिठाची गिरण आणि कापसाची दलाली हा त्यांचा व्यवसाय. व्यवसायाचे बाळकडू त्याला अगदी बालपणापासूनच मिळाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

1962 साली भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाले आणि याचा परिणाम त्याच्या वडिलांच्या व्यवसायावर झाला. वडिलांचे अतोनात नुकसान झाले. क्षणार्धात होत्याचे, नव्हते झाले. एकेकाळचे श्रीमंत कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि तो व्यवसायात उतरला. त्यावेळी तो एकोणीस वर्षांचा होता आणि त्याच्या डोक्यावर लाखों रुपयांचे कर्ज होते. अशा परिस्थितीत एखाद्याने पळ काढला असता. पण, त्याने लढण्याचा निर्णय घेतला. चिकाटीने व्यवसाय केला. कर्ज फेडले. त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढीस लागला. त्याने मोठं पाऊल टाकायचे ठरवले. तो थेट दिल्लीत आला. धान्याच्या व्यवसायात जम बसविला. पुढे एका पॉलिथीन बनविणाऱ्या कंपनीची स्थापना केली. याचा कंपनीतून देशातील पहिली प्लॅस्टिक लॅमिनेटेड ट्यूब बनविली. आयात निर्यातीतही बक्कळ पैसा मिळविला.

त्याने मुंबईत एस्सेल वर्ल्ड ची निर्मिती केली. पण, म्हणावा तितका नफा त्याला मिळत नव्हता. त्याने कारण शोधले. भारतीयांना मनोरंजन घराबाहेर नव्हे तर, घरातच हवे असते. त्याने घरातच मनोरंजन द्यायचा निर्णय घेतला आणि 1991 साली भारतातील पहिल्या खाजगी टी.व्ही. चॅनेल ची निर्मिती केली. अल्पावधीतच चॅनल लोकप्रिय झाले.. भारतातील ते पहिले खाजगी टी. व्ही. चॅनेल म्हणजे झी आणि त्याचा जनक म्हणजेच डॉ. सुभाष चंद्रा होय. 

डॉ. सुभाष चंद्रा यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथानकासारखा वाटत असला तरी, तो सत्य आहे. धाडस, चिकाटी, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावरच त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकदा तरी नुकसान आणि कर्ज यासारखी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असतेच. अशा परिस्थितीला अनेक लोकं शरण जातात. पण, अशा परिस्थितीशी दोन हात करणारी लोकंच यशाच्या शिखरावर पोहोचतात. डॉ. चंद्रा यांच्या जीवनात देखील कित्येकदा कर्जाची, नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली. त्यासोबत त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानी विराजमान आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 171* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/171.html

Sunday, June 7, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 171

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 171
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

एक तरुण जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होता. मोठे व्यापारी असलेल्या  वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्याला व्यवसाय सांभाळण्यासाठी,शिक्षण अर्धवट सोडून परतावे लागले. त्यावेळी तो केवळ एकवीस वर्षाचा होता. गुंतवणूकदारांच्या मते तो अपरिपक्व, अनुभवशून्य होता. त्याला हा डोलारा पेलणे अवघड होते. त्याला हे आव्हान पेलता आले का ? कोण असेल हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ??   जाणून घेऊ भागात... चला तर मग...

25 जुलै 1945 रोजी मुंबई येथे एका गुजराती शिया मुस्लिम कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा एक मोठे व्यापारी होते. 'राईस किंग ऑफ बर्मा' त्यांची ओळख होती. त्याच्या जन्माच्या वेळी आजोबांनी नुकतीच वनस्पती तुपाचे उत्पादन करणारी एक कंपनी स्थापना केली होती. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासूनच त्याला मिळाले होते. आजोबांच्या मृत्यूनंतर या कंपनीचा कारभार वडील पाहायचे.

1966 मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यामुळे व्यवसाय सांभाळण्यासाठी त्याला भारतात परत यावे लागले. त्याने व्यवसायाची सूत्रे हातात घेतली. पण, अनेकांनी तो अपरिपक्व, अनुभवशून्य असल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवला. बैठकीत अनेक शेअरधारक त्याच्या विरोधात उभे राहिले. चारही बाजूंनी त्याला नकारच नकार ऐकू येत होता. संघर्षाच्या काळात माणूस एकटाच असतो. असंच काहीसं झालं होतं. पण, याही परिस्थितीत तो डगमगला नाही. या परिस्थितीचा त्याने धैर्याने सामना केला. शेअरधारकांना आपल्यावर विश्वास ठेवण्याची त्याने विनंती केली. शिवाय शेअरधारकांचा मोठा नफाही करून देण्याची त्याने खात्री दिली. त्यामुळेच शेअरधारकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

तेल, तूप, वनस्पती तूप, साबण या सारख्या गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला नवे रूप, वळण आणि वलय निर्माण करून देण्यास सुरुवात केली. अनेक नव्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले. कंपनी नावारूपास येवू लागली. 1977 साली एक नवं आव्हान आणि एक नवी संधी त्याच्या समोर उभी राहिली. यावर्षी आयबीएम सारख्या कंपनीला भारत सोडावा लागला. येणाऱ्या काळाची पाऊले त्याने ओळखली. त्याने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. केवळ चारच वर्षात आपल्या कंपनीचा संगणक बाजारात आणला. येथूनच त्याने आपल्या कंपनीचे लक्ष साबनाकडून सॉफ्टवेअर कडे वळविले. आपल्या बुद्धी कौशल्याच्या, कष्टाच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्याने कंपनीला भारतातील सर्वात यशस्वी कंपनी बनविले आणि तो आयटी तंत्रज्ञानातील 'जार अर्थात सम्राट' म्हणून ओळखला जाऊ लागला. ती कंपनी म्हणजेच विप्रो आणि तो आयटी तंत्रज्ञानातील 'जार अर्थात सम्राट' म्हणजेच अजीम प्रेमजी होय.

अजीम प्रेमजी यांचा प्रवास अनेक समस्यांनी आणि संकटांनी व्यापला असल्याचे आपल्या लक्षात येते.
मी अजाण आहे. मी अल्पशिक्षित आहे. मला अनुभव नाही. नुकतेच माझे वडील वारले आहे. या पूर्वी मी अशी जबाबदारी पार पाडली नाही. इतकी मोठी जबाबदारी मला पेलणार नाही. या सारखी अनेक कारणे प्रेमजी यांना सांगता आली असती. विरोधकांचे ऐकून मैदानातून माघार घेता आली असती. संकटांपासून पळ काढता आला असता. पण, त्यांनी यापैकी काहीच केले नाही. ते या प्रत्येक संकटाला सामोरे गेले. कारण,त्यांचा स्वतःवर विश्वास होता.

आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर आपण काहीही करून दाखवू शकतो. याचा त्यांना विश्वास होता. म्हणूनच 2000 साली ‘एशिया विक’ने त्यांची जगातील 20 सर्वाधिक सामर्थ्यवान पुरुषांच्या यादीत निवड केली. ‘टाइम’ने 2004 मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 170* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/170.html

Saturday, June 6, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 170

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 170
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

एका तरुणाने व्यवसाय सुरू करायचा ठरवला. परंतु, त्याची कल्पना तब्बल 25 गुंतवणूकदारांनी नाकारली. मग त्याने काय केले ? तो आपला व्यवसाय उभारण्यात यशस्वी झाला का ? कोण हा तरुण ? जाणून घेऊन आजच्या भागात.चला तर मग..

गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर मध्ये, एका मध्यमवर्गीय कुटुंबात,1973 साली त्याचा  जन्म झाला. त्याचे वडील एक सरकारी कर्मचारी, तर आई गृहिणी होती. त्याला आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण, केंद्रीय विद्यालयात विज्ञान विषयाचे शिक्षकच नव्हते. तरीही, त्याने अतिशय जिद्दीने अभ्यास करून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयआयटी दिल्ली येथे प्रवेश मिळविला. येथे त्याने केमिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आणि पुढे कोलकाता येथील आयआयएममधून एमबीए चे शिक्षण पूर्ण केले.

त्याला नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यात अधिक रस होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने दोन तीन कंपन्यांमध्ये नोकरी केली. परंतु त्याच्या व्यवसाय करण्याच्या विचारांना खतपाणी मिळाले ते अमेरिकेत. येथे तो एका कंपनीत गेमिंग प्रोजेक्टवर काम करत होता. त्यासाठी त्यांना काही लोकांची गरज होती. यासाठी त्याने अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटचा आधार घेतला आणि त्याला अपेक्षित कर्मचारी मिळाले. ही वेबसाईट पहिल्या नंतर, त्याच्या मनात विचार चमकला की, " अशा प्रकारची वेबसाईट आपण भारतात सुरू केली तर ?"

तो भारतात परतला. त्याचा हा विचार त्याने अनेकांना बोलून दाखवला. तब्बल पंचवीस गुंतवणूकदारांनी त्याच्या या कल्पनेवर गुंतवणूक करण्यास नकार दिला. तरीही तो निराश झाला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता. मोठ्या धैर्याने प्रत्येक संकटाला तो सामोरा गेला. त्याने कंपनीची स्थापना केली.आपल्या बुद्धीच्या, कष्टाच्या जोरावर, आलेल्या संकटांवर मात करत काही वर्षातच त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. ती कंपनी म्हणजेच Quikr.com आणि त्याचा संस्थापक म्हणजेच प्रणय चुलेट होय.

Quikr.com या साइटवर विविध प्रकारच्या  मोबाइल, टीव्ही, स्कूटर, घर कोणतीही वस्तू खरेदी अथवा विक्री करण्याची, तसेच नोकरीची जाहिरात मोफत देता येते. दररोज कोट्यवधी लोक या वेबसाइटचा आधार घेत असतात.

व्यवसाय आणि नकार यांचं एक समीकरण आहे. आजपर्यंत जितके व्यवसाय सुरू झालेत, त्या प्रत्येक व्यवसायाला सुरुवातीला अनेक नकार पचवावे लागले आहेत. असे नकार घरच्यांचे, मित्रांचे अथवा गुंतवणूकदारांचे असतात. या नकारावर मात करून अनेक व्यवसाय यशस्वी झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आजवरच्या जीवनात आपल्याला अनेक नकार मिळाले असतील. हे नकार अडगळीच्या स्वरुपात आपल्या मनामध्ये साठलेले असतील. तर ही नकारात्मक विचारांची अडगळ विकून टाकण्यासाठी (दूर करण्यासाठी) Quikr.com ची मदत घ्या. 

प्रणय चुलेट यांनी मिळालेल्या नकारावर मात करत, Quikr.com ला भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन क्लासिफाइड कंपनी बनवले. म्हणूनच ते एक यशवंत आहे.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 169* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/169.html

Friday, June 5, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 169

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 169
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

आजच्या भागात अशाच एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत, ज्याला एक समस्या दैनंदिन जीवनात सतत भेडसावत होती. त्याने त्या समस्येवर इलाज शोधला आणि आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे.. कोण आहे तो काय ? त्याला कोणती समस्या भेडसावत होती ? त्यावर त्याने कोणता मार्ग काढला ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग..

पंजाब मधील मुक्तसर याठिकाणी शिक्षित आणि मध्यमवर्गीय परिवारात त्याचा जन्म झाला. आई वडील दोघेही शिक्षक,त्यामुळे त्याच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले गेले. आपले शालेय शिक्षण पूर्ण करून, आयआयटी दिल्ली मध्ये प्रवेश मिळवून त्याने आपली बुध्दिमत्ता सिद्ध केली. आयआयटी दिल्ली मध्ये MBA ची डिग्री प्राप्त केली आणि एका कॉन्स्टलिंग फर्म मध्ये नोकरी स्वीकारली.

नोकरीच्या काळात देखील त्याचे विचार त्याला गप्प बसू देत नव्हते. वेगळं काहीतरी करून दाखवण्याचे विचार सतत त्याच्या मनात यायचे. 'यशाचा मार्ग पोटातून जातो.' असं म्हणतात. त्याच्या बाबतीत नेमकं असंच घडलं. तो दररोज दुपारी ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये जेवायला जायचा. तेथे मेनू कार्ड पाहण्यासाठी बरीच मोठी गर्दी असायची. मेनू पाहून ऑर्डर देण्यात बराच वेळ जायचा. या समस्येला तो सतत सामोरा जायचा. जो प्रकार ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये घडायचा,तो शहरातील हॉटेल्स मध्येही. बरं ही त्याच्या एकट्याची समस्या नव्हतीच. ती सर्वांना सतत भेडसावयाची. यावर मार्ग काढण्याचा विचार सतत त्याच्या मनात यायचा. त्याने या समस्येवर उपाय शोधला आणि ताबडतोब त्यावर काम करायला सुरुवात देखील केली.

2008 मध्ये आपल्या एका मित्राच्या मदतीने एक वेबसाईट बनविली. ही वेबसाईट शहरातील विविध हॉटेल्स, त्यातील पदार्थ, त्याची गुणवत्ता,दर याबाबत माहिती द्यायची. ही साईट लोकांच्या अतिशय पसंतीस उतरली. त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आणखी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली. घर बसल्या अन्न पुरविणाऱ्या कंपनीची स्थापना केली आणि सारे लक्ष आपल्या कामावर केंद्रित केले. आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर त्याने त्या कंपनीला भारतातील क्रमांक एकची कंपनी बनविली. ती कंपनी म्हणजेच झोमॅटो आणि त्या कंपनीचा सह संस्थापक म्हणजेच दीपेंद्र गोयल होय.

दैनंदिन जीवनात आपण अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जात असतो. या सर्वमान्य समस्या असतात. ज्या आपल्या सोबत इतरांना देखील भेडसावत असतात. सामान्य व्यक्ती या समस्यांसोबत जगत असतात. पण, काही सामान्यांतील असामान्य व्यक्ती या समस्यांवर मार्ग काढतात आणि हा मार्ग त्या लोकांना यशाच्या शिखरावर घेऊन जातो. दीपेंद्र गोयल त्यापैकीच एक.

एक खूपच मामुली वाटणारी समस्या, त्यावर काढलेल्या मार्गाने दीपेंद्र यांना कोठे नेवून ठेवलं ? याची आपणा सर्वांना कल्पना असेलच. आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यावर आपण विचार करतो. पण, ती कल्पना प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी जाणवतात. म्हणून, मागे फिरणे अयोग्य आहे. आपण मागे फिरलो, तरी तो विचार, ती कल्पना इतरांच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतेच. मग, पश्र्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते. 

"यशाची चव चाखायची असेल तर ,आपल्या कल्पनांना कष्टांची फोडणी ताबडतोब द्यायला हवी." दीपेंद्र गोयल यांनी आपल्या कल्पनेवर ताबडतोब काम केले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 168* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/168.html

Thursday, June 4, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 168

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 168
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

'कायद्याचे शिक्षण घ्यावे.' असा घरच्यांचा दबाव एका तरुणावर होता. पण,त्याला सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. कायद्याची प्रॅक्टिस करायची ? का उद्योग उभारायचा ? असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने कशाची निवड केली असेल ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

1925 साली गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील महुआ नावाच्या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातच घेवून पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला. 'कायद्याचे शिक्षण घ्यावे.' असा घरच्यांचा दबाव त्याच्यावर होता. परंतु, त्याला सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. त्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पण, त्याने 'वकिली करायचीच नाही.' असा ठाम निर्धार केला. त्याच्या या निर्णयाला घरच्यांनी विरोधच केला. पण, त्याने तो जुमनला नाही.

मुंबईमध्ये एका डाईंग व प्रिंटिंग प्रेस मध्ये त्याने कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. कालांतराने एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे शिपाई म्हणूनही काम केले. सततच्या तंगीमुळे त्याच व्यापाऱ्याच्या गोदामात आपल्या पत्नीबरोबर राहण्याची वेळ आली. अनेक समस्या या कालावधीत त्याच्या समोर ठाकल्या. पण, तो त्याला निर्धाराने सामोरा गेला. तो व्यवसायात प्रचंड हुशार. त्याच्या डोक्यात व्यवसायाच्या अनेक कल्पना असायच्या. याच हुषारीवर एका गुंतवणूकदाराने पैसे लावले. आयात निर्यात व्यवसायात चांगला जम बसला.

सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना, लाकूड जोडताना, प्राण्यांच्या चरबी चा ‘गोंद’ वापरताना, बरेच कष्ट घ्यावे लागायचे. या जोडकामासाठी घट्ट स्वरूपातील गोंद पातळ करण्यासाठी उकळावं लागे. त्याच्या घाणेरड्या वासाचा त्रास व्हायचा. हे सारं तो पाहत असे. या समस्येत त्याला संधी दिसली. सिंथेटिक रसायने वापरून, सहजासहजी वापरता येणारा गोंद तयार करता येईल का ? यावर त्याने संशोधन सुरू केले. आणि त्याला या समस्येवर उपाय सापडला. हा उपाय सुतारांना तर आवडलाच. शिवाय, भारतातही तो लोकप्रिय ठरला. तो लोकप्रिय उपाय म्हणजेच फेविकॉल आणि त्याचा निर्माता म्हणजेच 'फेविकॉल मॅन बळवंत पारेख' होय. 

बळवंतजी यांनी कोण काय म्हणतंय ? यापेक्षा आपल्याला काय वाटतंय ? आपल्याला काय करायचं आहे ? यावर अधिक लक्ष दिलं. ते आपल्या ध्येयाबद्दल अधिक सजग होते. त्यांचा निर्धार पक्का होता. त्यामुळेच ते ठामपणे निर्णय घेवू शकले. शिवाय, त्यांच्या व्यवसाय करण्याच्या निर्णयामुळेच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वकिलीचा पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. ते मागे फिरले नाहीत. समस्येत संधी शोधण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. या वृत्तीनेच त्यांना यशाचा मार्ग मिळाला. 

फेविस्टीक, फेविक्विक, डॉकटर फ़िक्सिट, एम् -सील अशा अनेक ब्रँडची मालकीही ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’कडे आहे. 2012 च्या फोर्ब्सच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 45 व्या स्थानी विराजमान होते. यशाला 'चुटकी में' चिकटण्यासाठी आपल्याकडे प्रयत्नांचा, कष्टाचा 'फेविक्विक' असणे, आवश्यक आहे. जो बळवंतजी यांच्या कडे होता. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 167* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/167.html

Tuesday, June 2, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 167

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 167
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

फाळणीनंतर भारतात मोकळ्या हाताने आलेल्या एका व्यक्तीने शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात निर्माण केली आणि भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले. इतकं मोठं यश त्याने कसं मिळविले ? कोण ती व्यक्ती ? जाणून घेऊ आजच्या भागात ? चला तर मग...

1 जुलै 1923 रोजी तत्कालीन भारतातील आणि सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या कमलिया (kamalia) या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्याचे कुटुंबीय सायकल चे विविध भाग विकण्याचे काम करत होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने शाळेत प्रवेश घेतला.

त्यावेळी भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. देश स्वतंत्र झाला खरा. पण, देशाची फाळणी झाली. तो व त्याचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले. त्यांचे सर्वस्व हिसकावून घेण्यात आले होते. त्यामुळे ते रिकाम्या हातानेच अमृतसर येथे आले. त्यावेळी तो 24 वर्षांचा होता. आपल्या कुटुंबाला घेवून नव्याने सुरुवात करण्यास तो सज्ज झाला. आपला जुना व्यवसाय सुरू केला. प्रचंड कष्ट, मेहनत घेवून त्याने व्यवसाय वाढविला. चार पैसे गोळा केले. त्यामुळे मोठं काहीतरी करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला. अशातच पंजाब सरकारने सायकल बनविण्याबाबत एक निविदा प्रसिद्ध केली.  त्याने ही संधी साधायची ठरविली. त्याने टेंडर भरला आणि त्याला तो मिळाला देखील. पंजाब सरकार च्या आर्थिक मदतीच्या जोरावर त्याने आपली नवी कंपनी सुरू केली. या कंपनीत तो सायकलींचे उत्पादन करू लागला. त्याच्या कष्टाच्या, जोरावरच अल्पावधीच सायकल कंपनी नावारूपास आली.

1984 सालं त्याच्यासाठी एक संधी घेवून आले. एका परदेशी कंपनीने दुचाकी वाहन तयार करण्याचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला. त्याने ही मोठी संधी साधली आणि तो प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने काही वर्षातच ही कंपनी लोकप्रिय बनविली आणि त्या कंपनीला जगातील सर्वाधिक मोटारसायकल विकणारी कंपनी बनविली. पण, 2011 साली या दोन्ही कंपन्यांत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी 2013 साली भागीदारी संपुष्टात आणली. हे संकटं मोठं होतं. यामुळे मोठा आघात झाला होता. पण, याही परिस्थितीत त्याने संयम सोडला नाही. कारण, त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता. त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि पहिल्या आठवड्यातच 50 मिलियन मोटारसायकली चे उत्पादन करून नवा इतिहास घडवायला. आपल्या मेहनतीच्या, कष्टाच्या, विश्वासाच्या जोरावर त्याने पुन्हा आपल्या कंपनीला जगातील सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी बनवलं आणि जगभर आपल्या दुचाकी पोहचविल्या. ती कंपनी म्हणजेच हीरो मोटोक्रॉप होय आणि त्याचा संस्थापक म्हणजेच ब्रिजमोहन लाल मुंजाल होय.

मोकळ्या हाताने आलेले, ब्रिजमोहन भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले. त्यांचा हा प्रवास आपल्याला थक्क करणारा आहे. पण, हा प्रवास एका रात्रीत झाला नसून, त्यासाठी रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलं आहे. मिळालेली संधी हेरली आणि त्याचे सोनं केलं आहे. 

व्यक्तीची यशस्वी होण्याची इच्छा तीव्र असेल आणि त्याची कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची जबरदस्त तयारी असेल, तर ती व्यक्ती कितीही गरीब असो, अशिक्षित असो, अडाणी असो, त्याच्या समोर कितीही मोठे संकटं आली, तरी तो या सर्वावर मात करून पुढे जातो आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतो. ब्रिजमोहन यांच्यासमोर देखील फाळणीचं मोठं संकट होतं, तरही या संकटात ते धैर्याने उभे राहिले आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. म्हणूनच ते यशवंत आहेत.

कृपया ब्लॉग फॉलो करा....

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 166* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/166.html

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 166

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 166
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

चीनकडून सातत्याने होणारी घुसखोरी,त्यामुळे सीमेवर निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण, याचबरोबर भारताच्या सार्वभौमत्वाला छेद देण्याचा चीनकडून होणारा प्रयत्न या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी, काही दिवसापूर्वी सोनम वांगचुक यांनी देशाला एक व्हिडीओ संदेश दिला. यामध्ये त्यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याबाबत जनतेला आवाहन केले आणि बघता - बघता एक जनआंदोलन उभे राहिले. बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये असलेले चिनी ॲप इन्स्टॉल करून त्याची सुरुवात केली. खऱ्या अर्थाने आज चिनी वस्तूंना पर्यायसुद्धा शोधण्याची गरज निर्माण झाली. पण, भारतातातील एका व्यावसायिकाने चिनी वस्तूंना एक मोठा पर्याय 2005 सालीच भारतात निर्माण करून दिला आहे. आपण फक्त त्याच्याकडे बघत नाही इतकेच. आजच्या भागात काही चिनी वस्तूंना भारतात पर्याय निर्माण करून देणाऱ्या या यशवंताचा प्रेरणादायी प्रवास आपणासमोर मांडणार आहे. चला तर मग...


1963 साली राजस्थान मधील एका खेड्यात त्याचा जन्म झाला. वडील एक छोटे धान्य व्यावसायिक होते. गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर, व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे संपूर्ण कुटुंब नेपाळला गेले. तिथे त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याच वर्षी त्याचे संपूर्ण कुटुंब पुन्हा भारतात परतले. आता ते दिल्लीत स्थायिक झाले आणि येथे त्याचे पुढील शिक्षण संपन्न झाले.

त्याला नोकरीत फारसा रस नव्हता. त्याला एक व्यावसायिक बनायचे होते. परंतु,वडील जो व्यवसाय करायचे,ते त्याला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळेच वेगळं काहीतरी करण्याचा विचार सातत्याने त्यांच्या मनात डोकावयाचा. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच आपल्या खर्चासाठी त्याने आपल्या मित्रांच्या सोबतीने एक कॅमेरा खरेदी केला आणि बिर्ला मंदिराच्या बाहेर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचे, पर्यटकांचे फोटो काढून द्यायचा.  "आपल्याला या व्यवसायातले फारसे कौशल्य प्राप्त नाही. शिवाय ते लवकर प्राप्त होणार नाही आणि या व्यवसायातून आपल्याला भरपूर पैसा कमावता येणार नाही." याची त्याला जाणीव झाली. मग त्याने हा व्यवसाय बंद करून, ऑडिओ, व्हिडिओ कैसेट विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्याला बक्कळ पैसाही मिळू लागला होता. आता त्याची नजर मोठ्या वस्तूंवर पडू लागली. बाजारपेठेचा अभ्यास केल्यावर त्याला एक गोष्ट लक्षात आली की, भारतात येणाऱ्या बऱ्याचशा वस्तू चीन मधून येतात. त्याने चीनचे मार्केट समजून घेण्याचे ठरविले. काही पैसे जमा करून तो हाँगकाँगला गेला. त्याने तेथील लोकल मार्केटचा अभ्यास केला. व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. 

हा तो काळ होता, ज्या काळात भारतात नुकतेच संगणक यायला सुरुवात झाली होती. त्याने चीन मधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून संगणकाशी निगडीत असलेल्या वस्तूंची आयात करायचे ठरविले. यासाठी 1996 साली जवळ असलेला पैसा गुंतवून एका कंपनीची निर्मिती केली. या कंपनीच्या माध्यमातून त्याने संगणकाशी निगडीत चिनी वस्तू आयात करून विकायला सुरुवात केली. नंतर त्याने याच चिनी वस्तू वापरून भारतात स्वतः संगणक तयार करून विकायला देखील सुरुवात केली. आता जवळ अनुभव मोठा होता. शिवाय, चिनी मार्केटचा खूप मोठा अंदाजही त्याला आला होता. त्यामुळे त्याने 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचा कारखाना उभा केला. आता कंपनीची अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनं भारतातच बनवली जाऊ लागली. चिनी वस्तूंना एक उत्तम पर्याय निर्माण झाला.याच काळात मोबाईल युगाची सुरुवात झाली. लगेच त्याने मोबाईल निर्मितीही सुरू केली. यामुळे अल्पावधीतच कंपनीचा नावलौकिक वाढला आणि ती भारतातील क्रमांक दोनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी बनली. ती कंपनी म्हणजेच इंटेक्स आणि त्या कंपनीचा संस्थापक म्हणजेच नरेंद्र बंसल होय.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की, भारताने चीनमधून येणाऱ्या मालावर बंदी घालायला हवी. आपण भारतीय देखील उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भाषा नेहमीच करत असतो. परंतु, याला फारसे यश येत नाही. कारण, आजअखेर भारतात अनेक चिनी वस्तूंना पर्याय उपलब्ध झालेले नाहीत. परंतु, एक दशकापूर्वी नरेंद्र बन्सल यांनी अनेक चिनी उत्पादनांना भारतात पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फक्त आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत नाही इतकंच.

नरेंद्र बन्सल यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर अनेक गोष्टी लक्षात येईल येतील. व्यावसायिक होण्याचं स्वप्नं खूप आधीच त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे नोकरीचा विचार कधी केलाच नाही. आपल्या ध्येयावर त्यांचं लक्ष सतत केंद्रित होतं. यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची आणि 'नवं ते हवं ' चा स्वीकार करण्याची वृत्ती. याही बाबी त्यांच्या यशासाठी आधारभूत आहेत. याची प्रचिती येते. खरंतर यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी बाजारपेठेची नस ओळखता येणे. फार गरजेचं असतं आणि ही कला बन्सल यांनी मोठ्या कष्टाने साध्य केली. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर विराजमान होऊ शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..


🎯 *भाग - 165* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/06/165.html

Monday, June 1, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 165

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 165
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

1985 साली एक तरुणांजवळ 5000 रुपये होते. आज त्याची मालमत्ता तब्बल 16000 कोटी हून अधिक आहे. त्याला हे कसे जमले? त्याच्या यशाचा गमक काय आहे ? कोण आहे हा यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

5 जुलै 1960 रोजी मुंबई येथे एका मारवाडी कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील इन्कम टॅक्स ऑफिसर होते. सुशिक्षित परिवारात जन्माला आलेला असल्याने त्याच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले गेले.

एक दिवस वडील आपल्या काही मित्रांबरोबर नेहमी प्रमाणे शेयर मार्केट संदर्भात चर्चा करत होते. नेहमीप्रमाणेच ती चर्चा या 15-16  वर्षाच्या मुलाने ऐकली. "शेयर बाजारातील भाव खाली वर का होतात ?" असा प्रश्न त्याने मुलाने आपल्या वडिलांना विचारला. "तू नियमित पेपर वाचत जा. तुझ्या प्रश्नांचे उत्तर तुला मिळत जाईल." असा सल्ला त्याला वडिलांकडून मिळाला. तो त्याच्या जीवनातील शेयर बाजाराचा पहिला पाठ होता. त्याला शेयर बाजाराविषयी आकर्षण निर्माण झाले.

आपल्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तो 1985 साली C.A. झाला आणि नोकरी न स्वीकारता थेट शेयर बाजारात उतरला. शेयर खरेदी करण्यासाठी वडिलांनी त्याला एकही रुपया दिला नाही.शिवाय मित्रांकडून पैसे घेण्यासही मज्जाव केला. स्वतः श्रम करून त्याने पैसे जमविले आणि स्वतःचे 5000 रुपये त्याने बाजारात गुंतविले. 1986 साली त्याला थोडासा नफा झाला. त्याचा आत्मा वाढला. तो अधिकाधिक गुंतवणूक करू लागला. जशी गुंतवणूक तसा नफा त्याला मिळू लागला. त्याने स्वतः च्या बुद्धीने आणि हुशारीने शेअर बाजारात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. आज त्याला 'शेयर बाजाराचा बादशहा', 'भारताचा वारेन बफेट' म्हणून ओळखले जाते. तो 'शेयर बाजाराचा बादशहा', 'भारताचा वारेन बफेट'  म्हणजेच 'राकेश झुनझुनवाला' होय. 

जसे चढउतार शेयर बाजाराचे असतात, तसेच चढउतार जीवनातील यश-अपयशाचे देखील असतात. बाजार कोसळला तर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची एक नामी संधी उपलब्ध होते. जादा नफा कमावण्याची संधी मिळते. तसेच, व्यवसायात आलेल्या उतारामुळे, झालेल्या नुकसानीमुळे नाराज न होता. त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिले तर,यशाच्या चढावर आपण विराजमान होऊ. असा विश्वास वाटतो. 

राकेश झुनझुनवाला यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मिळालेल्या अनुभवातून त्यांनी धडा घेवून, त्या चुका पुन्हा होणारच नाहीत. याची दक्षता घेतली. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. झुनझुनवाला यांना शारीरिक कष्ट करावे लागलेच नाहीत. पण, प्रत्येक गुंतवणूक करताना, प्रत्येक जोखीम उचलताना बौद्धिक श्रम मात्र अपार करावे लागले आहेत. हे मान्यच करावे लागेल. आपल्या बौद्धिक श्रमाच्या जोरावरच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 53 व्या स्थानावर आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 164* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/164.html


Sunday, May 31, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 164

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 164
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

भारतीय शेअर बाजारात दाखल होणारी पहिली इंटरनेट कंपनी कोणती ? हे आपणास माहीत आहे का ? असेल ? तर अभिनंदन !!! आणि नसेल ? तर काळजी करू नका. हा लेख संपता-संपता आपणास त्या कंपनीविषयी नक्कीच माहिती होईल. त्या कंपनीच्या संस्थापकाचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.. चला तर मग....


1963 साली भारताच्या राजधानीत दिल्लीत त्यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर तर आई गृहिणी. एका सुशिक्षित घराण्यात त्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले. अभ्यासात हुशार असल्याने, तो एक उत्तम नोकरी मिळवेल. अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण, त्याच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं.

इकडे आई-वडील त्याला एक डॉक्टर किंवा इंजिनिअर बनविण्याचं स्वप्नं पाहत होते. तर तिकडे त्याने अगदी लहान वयातच एक मोठा व्यावसायिक बनण्याचं मोठं स्वप्नं पाहिलं होतं. कोणता व्यवसाय करायचा ? कुठं करायचा ? कधी करायचा ? यासारख्या अनेक प्रश्नाबाबत तो अनभिज्ञच होता.
शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर तो नोकरी करण्यासाठी बाहेर पडला. तीन वर्षे नोकरी केली. पण, व्यवसाय करायचा आत्मविश्वास त्याच्यात अजूनही आला नव्हता. पण, तरीही नोकरी सोडली. MBA केलं आणि परत नोकरीच केली. लग्न केलं आणि वर्षभरातच नोकरी सोडली. बायको कमावती होती. त्यामुळे घरखर्चाची चिंताच नव्हती.

आपल्या मित्रांच्या सोबतीने दोन कंपन्यांची स्थापना केली आणि काम सुरु केले. परंतु, काही दिवसातच त्यांनी एक कंपनी वाटून घेतली. कंपनी म्हणजे नावालाच. त्या कंपनीत त्यांना कसलाही फायदा झाला नाही. या पडत्या काळात त्याने काही संस्थात  अध्यापनाचे काम केले.तर काही काळ कन्सल्टींग ऑडिटर म्हणून देखील काम केले. स्वतःला एक व्यावसायिक म्हणून उभारण्यासाठी त्याने अनेक कष्ट केलेले होते. परंतु, अजूनही पदरात पडले यशाचे दान पडले नव्हते. म्हणतात ना "कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती." प्रयत्न करणार्‍याला कधीतरी यश मिळतंच. नेमकं त्याच्या बाबतीत असंच घडलं..

1996 सालं उजाडलं होतं. भारतात इंटरनेट जोर धरू लागलं होतं. अशातच दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तो गेला. त्याठिकाणी त्याने एका स्टॉल ला भेट दिली. WWW या तीन अक्षरांनी त्याची उत्सुकता वाढविली. ते काय आहे ? हे त्याने जाणून घेतलं. त्याला येणाऱ्या दिवसांचे भविष्य समजले. आपणही एक इंटरनेट कंपनी स्थापन करण्याचा त्याने निर्णय घेतला. नुसता निर्णयच नाही, तर अथक परिश्रम करून त्याने प्रत्यक्ष इंटरनेट कंपनी देखील स्थापन केली. आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर त्यांने त्या कंपनीचा लौकिक भारतभर पसरविला. ती भारतातील नावाजलेली कंपनी म्हणजेच 'नोकरी डॉट कॉम' होय आणि त्याचा संस्थापक म्हणजेच संजीव बिखचंदानी होय. 

प्रत्येक मोठ्या कंपनीचे सुरुवात अगदी लहानातून होते. तशीच सुरुवात नोकरी डॉट कॉम चीही झाली. त्याकाळी आजच्या सारखे तंत्रज्ञान पुढारलेले नव्हते. त्यामुळे काहीच लोकं यात प्राविण्य मिळविलेली होती. त्यांना कंपनीचे शेयर देवून वेबसाईट तयार केली. प्रत्यक्ष कंपनी उभारताना संजीव यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तरीही संजीव अगदी

धैर्याने त्याला सामोरे गेले. आणि यशस्वी झाले. अगदी लहान वयात पाहिलेले संजीव यांचे स्वप्नं प्रत्यक्षात आले. त्यासाठी त्यांना संघर्ष किती करावा लागला ? हे आपण जाणलेच असेल. 

जीवनसाथी डॉट कॉम, 99एकर डॉट कॉम आणि शिक्षा डॉट कॉम या कंपन्या देखील संजीव चालवितात. संजीव यांच्या अथक परिश्रमातून नोकरी डॉट कॉम ही भारतातील पहिली इंटरनेट कंपनी ठरली आहे. शिवाय शेअर बाजारात दाखल होणारी ती पहिलीच कंपनी आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..





🎯 *भाग - 163* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/163.html

Saturday, May 30, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 163

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 163
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने स्वतःच्या कर्तृत्वावर मायक्रोसोफ्टसारख्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळवली. काही वर्षाच्या नंतर त्याने ती नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज त्याचा व्यवसाय देशभरात यशस्वी व्यवसाय म्हणून ओळखला जातो.हा व्यवसाय उभा करताना त्याला मोठा संघर्ष करावा लागला. त्या व्यक्ती बद्दल आणि त्याच्या संघर्षा बद्दल जाणून घेऊन आजच्या भागात. चला तर मग..

25 ऑगस्ट 1985 रोजी पंजाब मधील लुधियाना या शहरात एका सामान्य परिवारात भाविश चा जन्म झाला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या भाविश ने मुंबई आयआयटी मधून कॉम्पुटर सायन्स मधून बी.टेक. ची पदवी संपादन केली आणि मायक्रोसोफ्टसारख्या नावाजलेल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी मिळवली. नोकरी करत असतानाच तो स्वतः अनेक संशोधने करायचा. परिसरातील समस्यांवर उपाय योजना तयार करायचा. काही संशोधनाचे पेटंट देखील त्याने मिळविले होते. चांगली नोकरी अन् पगार चांगला असून देखील तो 9 ते 5 च्या नोकरीत असमाधानी होता. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्याला नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मालक म्हणून काम करण्याची इच्छा होती. परंतु, या सुरक्षित नोकरीने त्याला बांधून ठेवले होते.

एक दिवस तो प्रवासाला निघाला होता. यासाठी त्याने एक चारचाकी वाहन ठरवून ठेवले होते. या प्रवास त्याला जन्मभर लक्षात राहिल असा अनुभव आला. निम्मा अर्धा प्रवास झाला नाही तोवर गाडीचालकाने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्याचे वर्तन, त्याची बोलण्याची पद्धत अत्यंत वाईट होती. त्या चालकाच्या दूर्व्यवहारणे भाविश हैराण झाला आणि तो अर्ध्या वाटेतच गाडीतून खाली उतरला आणि पुढील प्रवास त्याने बस ने पूर्ण केला. "जे आपल्या वाट्याला आले ते अनेकांच्या वाट्याला येत असेल. ते सर्व उत्तम सुविधेच्या शोधात असतीलच. त्या सर्वांना उत्तम सुविधा आपल्याला मिळवून देता येईल का ?" असे विचार बस प्रवासा दरम्यान त्याच्या मनात घोंगावत होते. या प्रसंगामुळे त्याच्या मनात असलेला व्यवसायाचा विचार अधिकच पक्का झाला. त्याने स्वतःच एक ट्रॅव्हल एजंट बनण्याचा निर्णय पक्का केला. हा विचार त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना बोलून दाखवला. परंतु त्याच्या या विचाराची थट्टा मस्करी केली गेली. घरच्यांनी तर त्याला सपसेल वेडाच ठरविले. कारण, इतकं शिक्षण आणि नोकरी सोडून जर कोणी एजंट बनत असेल तर त्याला कोणीच शहाणा म्हणणार नाही.

स्वतःचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो वेडाच झाला. याच वेडेपणात त्याने नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. आपल्या बुद्धीच्या,जिद्दीच्या,मेहनतीच्या, स्वतः वरच्या विश्वासाच्या जोरावर त्याने ती कंपनी यशस्वी करून दाखविली. केवळ तीनच वर्षात ती कंपनी 100 कोटींची झाली आणि तो करोडपती बनला. ती कंपनी म्हणजेच ओला कॅब (OLA) आणि त्याचा सह संस्थापक म्हणजेच भाविश अग्रवाल होय. 

एका मुलाखतीत भाविश अग्रवाल म्हणतात, " स्वप्नं तर प्रत्येक व्यक्ती पाहतो. पण, काहीच लोकं जोखीम उचलण्यासाठी तयार असतात. जेंव्हा तुम्ही जोखीम उचलता, तेंव्हा तुम्हाला सल्ला देण्यासाठी अनेक सल्लागार भेटतील. पण,लक्षात ठेवा. यशस्वी तोच होतो, जो ऐकतो सर्वांचं पण, करतो मनाचं."

भाविश अग्रवाल आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जोखीम उचलण्यासाठी नोकरी सोडण्यास तयार झाले. अनेकांनी त्यांच्या या विचारांची थट्टा मस्करी केली, त्यांना वेड्यात काढलं. पण, त्यांनी ऐकलं जनाचं पण, केलं मनाचं. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहोचले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 162* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/162.html

Friday, May 29, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 162

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 162
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

2005 आयटी दिल्लीतून कॉम्पुटर सायन्स इंजीनियरिंग पास झालेल्या एका तरुणाने गुगल सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला.परंतु, दोन्ही प्रयत्नात तो अयशस्वी झाला. पण, दहा वर्षातच त्याने इतकी मेहनत घेतली की, भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 2015 साली त्याला पहिल्या शंभर लोकांमध्ये स्थान मिळाले. कोण ही व्यक्ती ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग....

5 ऑगस्ट 1981 रोजी चंदीगड येथील एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील बँक कर्मचारी व आई एक सरकारी कर्मचारी होती. तो एकुलता एक असल्याने आई-वडिलांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. त्यामुळेच तो खूप हुशार आणि बुद्धिमान बनला. आपल्या बुद्धीच्या जोरावरच त्याने आयआयटी दिली येथे कॉम्पुटर सायन्स इंजीनियरिंग साठी प्रवेश मिळविला.

2007 साली तो पास होऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडला. सुरुवातीला त्याने गुगल सारख्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केला.पण, त्याला दोन वेळा अपयश आले. नंतर त्याने अमेझॉन या कंपनीत नोकरी मिळविली. नोकरी करत असतानाच त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार येवू लागला. त्याच्या सारखाच भव्य विचार करणारा एक मित्र त्याच कंपनीत नोकरीला होता. दोघांचेही विचार जुळले आणि त्यांनी अमेझॉन मधील 9 महिन्याच्या नोकरीचा राजीनामा देवून 2007 साली त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली.

ऑनलाईन पुस्तके विक्री करणे. या मुख्य उद्देशाने कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला तो आपल्या मित्राच्या सोबतीने पोस्टाच्या माध्यमातून तर कधी स्कूटरवरून स्वतः पुस्तके पोहोच करू लागला. मोठ्या संकटाना तोंड देत आपली कंपनी त्याने नेटाने पुढे नेली. 2014 साली त्याच्या कंपनीने कात टाकली. आता तो पुस्तकांसोबत अनेक इलेक्ट्रॉनिक, घरगुती वापराच्या, किराणा वस्तूंची ऑनलाईन विक्री करू लागला. 2014 साली त्याने ग्राहकांना खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' आयोजित केला. या दिवसानेच त्याला बिलेनियर बनविले आणि 2015 साली भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत त्याचा समावेश झाला. ज्या कंपनीने तो इतका श्रीमंत झाला ती कंपनी म्हणजेच फ्लिप्कार्ट ऑनलाइन सर्विस प्राइवेट लिमिटेड आणि त्याचा सह - संस्थापक म्हणजेच बिन्नी बंसल होय. 

केवळ नऊ महिन्यांच्या नोकरीतच बिन्नी बंसल यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचार केला आणि या विचारावर लगेच काम सुरू केले. खरंतर इतकं कमी अनुभवात नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय हा खूपच धाडसी आहे. कदाचित हा निर्णय घेताना त्यांना भीतीदेखील वाटली असावी. परंतु, मित्रांनो 'डर के आगे जीत है!' हे विसरून चालणार नाही. 

आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्याला धाडसी बनावं लागेल आणि धाडसी निर्णय देखील घ्यावे लागतील. व्यवसायात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींमध्ये धाडसी निर्णय घेण्याची मोठी क्षमता असते. हेच धाडस बिन्नी बंसल यांच्या मध्ये होतं. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहे..

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 161* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/161.html


Thursday, May 28, 2020

यशवंत- एक प्रेरणास्रोत भाग - 161

🎯   यशवंत- एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 161.
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

'फोर्ब्स'ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एकेकाळी ट्युशन्स घेणार्‍या एका शिक्षकांचाही समावेश केला आहे. 'फोर्ब्स' च्या म्हणण्यानुसार त्याची सध्याची संपत्ती 1.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण, इतकी संपत्ती मिळविण्या मागे संघर्षही मोठाच आहे. कोण हा शिक्षक ? काय आहे त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग....

केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील ​अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी 1980 सालच्या दरम्यान त्याचा जन्म झाला. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले.त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला.

सुट्टी च्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले. त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा सकारात्मक विचार केला. नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशनवर केंद्रित केले. त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉलमध्ये गेला. हॉल मधून ऑडीटोरियम मध्ये आणि तेथून थेट स्टेडियममध्ये गेला. एकाच वेळी तब्बल 25000 विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. इतका तो प्रचंड प्रसिद्ध झाला.

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी Think and Learn Private Ltd. ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले.अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईट ही लोकप्रिय झाली. मग त्याने एक ऍप तयार केले. या ऍप च्या माध्यमातून 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ऍप ने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच शिवाय अनेक गुंतवणूक दारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले. ते ऍप म्हणजेच BYJU's आणि त्याचा संस्थापक म्हणजेच बायजू रविंद्रन होय.

BYJU's ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशन चा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रन चे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत.

प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे. हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता. त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले. आज भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंतांच्या यादीत बायजू रविंद्रन यांचा समावेश आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 160* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/160.html

Wednesday, May 27, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग- 160

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग- 160
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

वय एकवीस म्हणजेच मौजमजा करण्याचा वय. पण,या मौजमजा करण्याच्या वयात एका तरुणाने स्वतःची कंपनी सुरू केली आणि आज त्या कंपनीची किंमत हजारों कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्या तरुणाला हे कसं शक्य झालं काय आहे ? कोण हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग....

16 नोव्हेंबर 1993 रोजी उडीसा राज्यातील कटक जिल्ह्याच्या ठिकाणी एका सधन व्यावसायिक कुटुंबामध्ये रितेश चा जन्म झाला. वडील एक बांधकाम व्यावसायिक आणि गृहिणी. बारावी पर्यंतचे शिक्षण कटक मध्येच झाले. त्याने पुढील शिक्षक IIT मध्येच पूर्ण करावे. ही घरच्यांची इच्छा. म्हणून तो राजस्थान मधील कोटा येथे आला. घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने त्याला कशाची कमी नव्हती.

कोटा येथे आल्यानंतर रितेशने दोनच गोष्टी केल्या. एक अभ्यास आणि दुसरे म्हणजे भरपूर प्रवास. प्रवास त्याचा आवडीचा विषय होता. त्याने प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. एक दिवस तो टिव्ही बघत बसला होता. त्याच्या हातात रिमोर्ट होता. त्या रिमोर्ट मुळे त्याच्या मनात एक विचार आला. " जसे रिमोर्ट च्या आधारे आपण कोणतेही चॅनल लावू शकतो, तसेच आपण असे काही तरी करावे की, भारतभरातील पर्यटकांना एका क्लिकवर हवं ते हॉटेल बुक करता येईल." त्याच्या या विचाराने जोर धरला. तो आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करू लागला.

2012 साली म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी त्याने स्वतः ची एक वेबसाईट सुरू केली. ज्या आधारे भारतातील कोणत्याही पर्यटकाला कोणतेही हॉटेल क्षणात बुक करता येईल. त्याची ही कल्पना पाहून काही गुंतवणूकदारांनी त्याच्या या व्यवसायात गुंतवणूक केली. शिवाय त्याच्या या कल्पनेला एक फेलोशिप देखील मिळाली.खूपच कमी वेळामध्ये आपल्या स्टार्टअपला मिळालेल्या या यशामुळे रितेश खूपच उत्साहीत झाला आणि त्याने आपल्या स्टार्टअपवर अजून बारकाईने काम करण्यास सुरूवात केली. पण, त्याचे हे बिझनेस मॉडेल यशस्वी होऊ शकले नाही. कंपनी तोट्यात जावू लागली आणि सरतेशेवटी त्याला ती बंद करावी लागली.

नुकसान झाले होते. अशाने एखाद्याचे मनोबल खचले असते. पण, या घटनेने तो अधिकच प्रेरित झाला. त्याचा त्याच्या कल्पनेवर आणि स्वतः वर विश्वास होता. त्याने आपल्या अपयशाची कारणे शोधली. आपले प्रवासातील अनुभव आठविले. स्वतःच्या झालेल्या चुका शोधल्या. त्या सुधारून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन त्याने एक नवी कंपनी स्थापन केली. लोकांना कमी किंमतीमध्ये सर्वोत्तम, चांगल्या आणि आरामदायी रूम मिळू लागल्या. अल्पावधीतच त्याचा स्टार्टअप लोकप्रिय झाला आणि तो अब्जाधीश झाला. ती लोकप्रिय कंपनी म्हणजे ओयो रूम्स आणि त्याचा संस्थापक म्हणजेच रितेश अग्रवाल होय.

ऑनलाईन हॉटेल सर्च करून आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या रूम ओयो आपल्याला उपलब्ध करून देते. त्यामुळेच ती अतिशय लोकप्रिय बनली.

आपण सदैव कष्ट करत राहिले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. तरच यश आपल्या पदरात पडेल.
अपयश तर येतच राहणार. पण, त्यातही जिद्दीने पाय रोवून, उभे राहून आपण आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे.

माणसाच्या यशामध्ये विचारांचा वाटा मोठा असतो. एखादा विचार, एखादी कल्पना आपल्या मनात आली की,आपण त्यावर लगेचच काम केलं पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अन्यथा आपले विचार,कल्पना इतरांच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात येतात. त्यावेळी आपणावर पश्चाताप करत बसावे लागेल. रितेश अग्रवाल ने आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले. आणि आपली संपूर्ण ताकद या कल्पनेवर लावली. म्हणूनच तो 2020 च्या ह्यरून ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील दुसर्‍या क्रमांकाचा स्व: निर्मित अब्जाधीश आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे. 

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 159* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/159.html




Tuesday, May 26, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 159

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 159
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


एका लहान खेड्यात जन्माला आलेल्या एका ध्येयवादी व्यक्तीने स्थापन केलेल्या कंपनीने, भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीचा मान पटकावला. ही कामगिरी करताना त्या कंपनीने विप्रोला सारख्या नावाजलेल्या कंपनीलाही मागे टाकले आहे. अशी कामगिरी करणारी ती व्यक्ती कोण ? ती कंपनी कोणती ? त्याचा संघर्ष काय ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

तामिळनाडूच्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोळी या अतिशय लहान गावात 14 जुलै 1945 रोजी त्याचा जन्म झाला. आई वडील शिक्षणाबाबत अतिशय जागरूक असल्याने त्याच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. शिवाय तो जात्याच हुशार असल्याने त्याने शिक्षणात आघाडी घेतली. त्याने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले.

1967 साली म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी पुणे एका कंपनीत त्याने आपल्या नोकरीला सुरुवात केली. परंतु तो नोकरीत असमाधानी होता. त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. ते त्याचं स्वप्नं होतं. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. यासाठी तो योग्य अशा संधीची वाट पाहत होता.
ही संधी त्याला दिल्लीला गेल्यावर मिळाली. हा त्याच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. येथेच त्याला त्याच्यासारखाच आणि मोठा विचार करणारे काही मित्र मिळाले. ते मित्र देखील त्याच्यासारखेच नोकरीतही असमाधानी होते. जीवनात आव्हानात्मक करण्याची संधी शोधत होते.

1975 साल. हा तो काळ होता की, भारतात संगणकाने नुकताच प्रवेश केला होता. येणारे युग हे संगणकाचे युग आहे. हे त्याने अचूक हेरले होते. आपल्या मित्रांना स्वतः संगणक बनवण्याचा आपल्या मनातील विचार त्याने सहकाऱ्यांना बोलून दाखवला. पण, त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता होती. म्हणून ते डगमगले नाहीत. सर्वांनी मोठी जोखीम घेऊन मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आणि उपलब्ध रकमेत त्याच वर्षी कॅलकुलेटर्स विकणारी स्वतःची एक भागीदारी कंपनी सुरू केली. लगेचच 1976 साली एका गॅरेज मध्ये, संगणक बनविणारी स्वतःची कंपनी सुरू केली. 1977 सालं त्यांच्यासाठी एक मोठी संधी घेवून आलं. याचं वर्षी IBM सारख्या नावाजलेल्या कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता. बाजारात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्याची संधी त्याला मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ग्राहकांची मने जिंकली आणि त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 2019 साली त्याची कंपनी भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आणि तो देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर विराजमान झाला. ती कंपनी म्हणजेच हिंदुस्थान कॉम्प्युटर्स लिमिटेड अर्थात HCL आणि त्याचा संस्थापक म्हणजेच शिव नाडर होय.

नाडर यांचा प्रवास पहिला तर लक्षात येतं की, आपण कोठून आलो आहोत ? आपला जन्म कोठे झाला आहे ? या बाबी यशस्वी होण्यात फारच गौण आहेत.
जोखीम उचलणं म्हणजे संधी साधणं. 
जोखीम उचलणं म्हणजे स्वतःची स्वप्नं पूर्ण करणं.
जोखीम उचलणं म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचणं. 
यशस्वी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण होण्यासाठी, जोखीम उचलली तर पाहिजेच.

उत्तम पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची जोखीम शिव नाडर यांनी पत्करली म्हणूनच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानावर विराजमान होऊ शकले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..

🎯 *भाग - 158* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/158.html

Monday, May 25, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 158

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯  भाग - 158.
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._


सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्माला आलेल्या आणि केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या एका तरुणाने हजारो कोटींची, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली कंपनी निर्माण करून, ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. कोण हा तरुण ? काय त्याचा संघर्ष ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

1 नोव्हेंबर 1966 रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी आईवडिलांनी थेट पुणे गाठलं. वडील फिलिप कंपनी हेल्पर, तर आई घरकाम करायची. आपल्या मुलांनी उत्तम असे शिक्षण घ्यावं. ही वडिलांची इच्छा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, त्यांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. पुस्तके,फी यासाठी पैसे लागायचे. त्यासाठी वडील घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्तीचे काम करायचे.

कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून वडिलांना कामात मदत करायला सुरुवात केली. एका कॅल्क्युलेटर दुरुस्त करणाऱ्या कंपनीत त्याने नोकरी मिळवली. याबरोबरच अन्य यंत्र दुरुस्ती करण्याचे तंत्रही, त्याने आत्मसात केले. थोड्याच दिवसात स्वतःचे दुकान देखील सुरू केले. आता तो बऱ्यापैकी पैसे मिळवू लागला होता. एक दिवस एका बँकेमध्ये प्रिंटर दुरुस्ती करण्यासाठी गेला असता, त्याला टीव्ही सारखी एक वस्तू दिसली. त्याचे कुतूहल जागृत झाले. त्याला कोणीतरी सांगितले की, "याला संगणक म्हणतात आणि येणारे युग हे संगणक युग आहे." तो नव्वदच्या दशकाचा काळ होता. त्यावेळी भारतात संगणकाने चंचुप्रवेश केला होता. त्याला भविष्यात होऊ घातलेल्या बदलाची चाहूल लागली.

आपल्या भावाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेऊन दिला आणि स्वतः मोठ्या जिद्दीने संगणक दुरुस्त करण्याचे तंत्र आत्मसात केले. काही दिवसातच पुण्यामध्ये संगणक हार्डवेयर दुरुस्तीच्या क्षेत्रात त्याचा दबदबा निर्माण झाला. भारतात इंटरनेटच्या प्रवेश सोबत, संगणकात व्हायरसने   शिरकाव केला. संगणक नादुरुस्त होऊ लागले. एक नवे आव्हान,एका नव्या संधीच्या रूपाने त्याच्या सामोरं उभे राहिले. व्हायरस ने संगणक नादुरुस्त होऊ नये,यासाठी अँटी व्हायरस चा वापर व्हायचा. या अँटी व्हायरस ने आपण पैसे कमावू शकतो. याची जाणीव त्याला झाली. आपल्या भावाच्या मदतीने त्याने स्वतः च अँटी व्हायरस तयार करायचे ठरविले. तब्बल दीड वर्षे प्रयत्न करून एका देशी अँटी व्हायरस चा जन्म झाला. एक नवी कंपनी स्थापन केली. अथक परिश्रम करून आपले उत्पादन विकले आणि कंपनी नावारूपास आली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या कंपनीने आपले स्थान भक्कम केले. ती कंपनी म्हणजेच क्लिक हिल आणि त्याचा संस्थापक म्हणजेच कैलास काटकर होय.

कैलासजींचा हा प्रवास अतिशय खडतर आहे.  तीव्र स्पर्धा, आर्थिक चणचण, नवे उत्पादन, अनेक नावाजलेल्या परदेशी कंपन्या या व यासारख्या असंख्य समस्यांना ते पुरून उरले आहेत. तीव्र बुद्धी, खडतर परिश्रम, ऊर्जा, चिकाटी, नाविन्याची ओढ, भविष्याची जाण यासारख्या अनेक गुणांसोबतच गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या जोरावर त्यांनी 112 हून अधिक देशात आपल्या कंपनीचे जाळे निर्माण केले आहे. 

कैलाशजींच्या या प्रवासात ना कुटुंबाची आर्थिक स्थिती आड आली, ना शिक्षण. केवळ त्यांचं कर्तृत्वच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेलं आहे.  पुण्यातील एका चाळीतील एका लहानशा खोलीत सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास एक नावाजलेला ब्रँड बनून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि भक्कम स्थान निर्माण करण्यात कैलाश काटकर यशस्वी झाले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 157* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/157.html

Sunday, May 24, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 157

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 157
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

कधीकाळी एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीचे आज जगभरात 450 हून अधिक हॉटेल्स आहेत. त्याला हे कसं शक्य झालं ? त्याच्या यशाची गुरुकिल्ली कोणती ? कोण आहे हा यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग...

मुंबईतील ग्रँड रोड रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच तो हुशार. ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत. त्या आत्मसात करण्यावर त्याचा खूप भर असायचा. यामुळेच त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले. 

त्याचे वडील एक हॉटेलचालक. त्यांचा व्यवसाय अतिशय जोमाने चालायचा. कोणीतरी त्याच्या वडिलांना फसवून दोन पैकी एक हॉटेल हस्तगत केले. घडल्या प्रसंगाने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. मग त्याच्या आईने त्याला वडिलांसोबत काम करण्यास सुचविले. तो राजी तयार झाला. वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावू लागला. विस्कटलेल्या व्यवसायाची घडी त्याने बसविली. आता त्याच्या विचारांची उंची वाढली होती. मुंबईत सर्वात मोठं हॉटेल उभारण्याचा, व्यवसायाचा विस्तार वाढविण्याचा मोठा विचार त्याच्या मनात निर्माण झाला. त्याने तो विचार वडिलांना बोलूनही दाखवला. वडील राजी झाले आणि त्याच्या स्वप्नं पूर्तीच्या प्रवासाची सुरुवात झाली.

विदेशवारी करून तेथील वेगवेगळ्या खाद्यांची माहिती जमा करण्याचे त्याने निश्चित केले. यासाठी त्याने थेट लंडन गाठले आणि तेथील एका हॉटेलमध्ये त्याने अल्प पगारावर कूक ची नोकरी स्वीकारली. विविध खाद्य पदार्थ शिकण्याबरोबरच हॉटेल व्यवसायातील बारकावे तो शिकला. निश्चित केलेले उद्दिष्ट त्याने साध्य केले. जगभर प्रवास करून तो भारतात परत आला. गाठीला असलेल्या पैशातून त्याने एक हॉटेल सुरू केले. ते यशस्वीरित्या चालविले. मग एकामागोमाग एक अशी अनेक हॉटेल्स सुरू झाले. दरम्यान सांताक्रूझ विमानतळाजवळचे हॉटेल 'प्लाझमा' विकण्यासाठी काढले होते. त्यांने ते हॉटेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जवळ पुरेसे पैसे नव्हते. पण, जिद्द असेल तर माणूस काहीही करून दाखवू शकतो. याची प्रचिती आली. मोठ्या जिद्दीने त्याने पैसे गोळा केले. ते हॉटेल खरेदी केले आणि त्याच जागेवर केवळ भारतातील नव्हेच तर आशियातील पहिले "इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल" (पर्यावरण पूरक हॉटेल) उभे राहिले. ते "इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल" म्हणजेच "हॉटेल ऑर्किड" होय आणि त्याचा मालक म्हणजेच डॉ.विठ्ठल कामत होय. 

वयाच्या विसाव्या वर्षी विठ्ठल कामत यांनी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक राव बहादुर ऑबेराय यांना सांगितले होते की," मला तुमच्या हॉटेल पेक्षा मोठे हॉटेल मुंबईत बांधायचे आहे." त्यांचे हे स्वप्नं पूर्ण होण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागली. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीची शिडी एका दिवसात चढता येत नाही. हे नव्याने सांगायला नको. 

यश हे तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर नव्हे, तर तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. आपल्या मानसिकते समोर सर्व समस्या शून्य असतात. दृढ निश्चय, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी या यशाच्या गुरुकिल्ली जोरावरच, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात 450 हून अधिक हॉटेल्स उभे करण्यात, कामत यशस्वी झाले आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.


धन्यवाद..




🎯 *भाग - 156* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/156.html







Saturday, May 23, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 156

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 156
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

भारत - पाकच्या फाळणीत आपले सर्वस्व गमावून पाकिस्तानातून भारतात रिकामे आलेल्या एका पाचवी नापास महाशयाने, अनंत अडचणींवर मात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्याने अब्जावधी रुपयांचे साम्राज्य निर्माण केले. स्वतःचा वेगळा ब्रँड निर्माण केला. त्या कर्तृत्ववान यशवंताचा प्रेरणादायी प्रवास, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.. 

27 मार्च 1923 साली तत्कालीन भारतातील सियालकोट येथे एका सामान्य कुटुंबात महाशयचा जन्म झाला. शालेय शिक्षणात काडीचाही रस नसल्याने चौथीपर्यंत तो कसाबसा पास झाला.पण, पाचवीत पास होऊ शकला नाही. पर्यायाने वयाच्या 10 व्या वर्षीच त्याने शिक्षण सोडून दिले.

शालेय शिक्षण अर्ध्यात सुटले. पण, व्यावहारिक जीवनातील शिक्षण महाशयाची वाट पाहत होते. उनाडक्या करत हिंडणाऱ्या या मुलाने "काहीतरी काम शिकावे." या उद्देशाने वडिलांनी एका दुकानात कामाला लावले. परंतु, ते काम त्याला आवडले नाही. म्हणून त्याने ते काम सोडून दिले. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत त्याने आपल्याला न आवडणारी पन्नासेक कामे सोडून दिली. यामुळे त्याचे वडील हैराण झाले आणि त्यांनी त्याला एक मसाल्याचे दुकानच काढून दिली. मसाल्याचा व्यवसाय त्याला मनापासून आवडू लागला. त्याने या व्यवसायात जम बसविला.

तो काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा होता. अशातच भारताची फाळणी झाली. सियालकोट प्रांत पाकिस्तानात गेला. तेथील हिंदूंची अवस्था बदतर झाली. त्यामुळेच महाशय आणि त्याचा परिवार आपले सर्वस्व सोडून सियालकोट मधून भारतातील दिल्ली येथे आला. दिल्लीत येताना त्याच्याकडे केवळ पंधराशे रुपये होते. रुपयांमध्ये काही त्याने टांगा खरेदी केला. एकेकाळचा मसाला व्यापारी, आज टांगेवाला बनला होता. वेळ अतिशय वाईट होती. यातच केवळ दोनच महिन्यांत, व्यवसाय न आवडल्याने महाशयांने टांगा चालविणे बंद केले.

एकेदिवशी बेरोजगारी महाशय विचार करत बसला होता. "आपण केवळ मसाला बनविण्याचेच काम उत्तम प्रकारे करू शकतो. शिवाय, ते आपल्या आवडीचे काम आहे." या विचाराने त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने घरातच मसाला बनविण्याचे काम सुरू केले. घरोघरी जाऊन तो आपले उत्पादन विकू लागला. त्याच्या ईमानदार वृत्तीने, दर्जेदार आणि निर्भेळ मसाल्याने ग्राहकांचे मन त्याने जिंकले. त्याच्या मसाल्याची मागणी वाढू लागली. त्याने स्वतः ची फॅक्टरी उभी केली. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. केवळ दिल्लीतच नव्हे तर जगभरात त्याच्या मसाल्याचा वास पसरला. साऱ्या जगभरात त्याचा ब्रँड नावारूपास आला. तो प्रसिद्ध ब्रँड म्हणजेच MDH. आणि तो महाशय म्हणजेच महाशय धर्मपाल गुलाटी होय. 

धर्मपाल गुलाटी यांच्या जीवन प्रवासावरून प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे," ज्या क्षेत्रात आपणास आवड आहे. ज्या कामात आपण निपुण आहोत. ती आवड आणि ते कामच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचू शकते." आवड नसणारे काम आपला वेळ आणि शक्ती दोन्ही व्यर्थ घालविते. यशस्वी होण्यासाठी, व्यर्थ जाणारा वेळ आणि शक्ती वाचविण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते ? हे लवकरात लवकर शोधले पाहिजे. आणि त्यात जीव ओतून काम केले पाहिजे. 

धर्मपाल गुलाटी यांनी देखील हेच केले आहे. आज 92 वर्षे वय असताना ही कामातील त्याचा उत्साह एखाद्या तरुणाला ही लाजवेल असा आहे. ते भारतातील सर्वात वयोवृध्द आणि सर्वाधिक पगार असणारे CEO आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.



*कृपया ब्लॉग फॉलो करा....*

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 154* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/155.html