Showing posts with label प्रतिक्रिया. Show all posts
Showing posts with label प्रतिक्रिया. Show all posts

Monday, April 20, 2020

प्रतिक्रिया 28 सौ. नीता भरत कांबळे मॅडम मारुल हवेली


Sir, We are also proud of you.तुमच्या प्रत्येक लेखातील लेखन शैलीतून आम्हाला खूप प्रेरणा मिळते.एकही भाग वाचला नाही असे झाल नाही.पण आम्हाला खूप अडचणी य़ेतात.पण तुम्ही या सर्व गोष्टीवर मात करून तुमचे आदर्श काम करताय.You are jinios.खरे यशवंत तुम्ही पण आहात.तुमच्याकडून प्रेरणा घेण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू🙏🙏💐💐💐💐💐👏👏👏👏👏👌👌👌👌

प्रतिक्रिया 27 Bipin Kanase Angapur


सर तुम्ही सुरु केलेलं हे यशवंत हे लेख खूपच आदर्शदायी व मार्गदर्शक आहेत विविध भागातील व विविध क्षेत्रातील लोकांविषयी माहिती आम्हाला तुमच्या मुळे होत आहेत त्याबद्दल धन्यवाद 🙏
तुमच्या कडून असंच उत्तरउत्तर लिखाण होत जाओ आणि आम्हाला चांगली माहिती मिळत जाओ तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🙏

खूप धन्यवाद सर मला तुमच्या लेखाचा एक भाग बनविल्या बद्दल .
तुमच्या लेखांची शृखंला अशीच अखंड  चालू राहावी ही आत्मगजानन चरणी प्रार्थना

प्रतिक्रिया 26 Santosh Chavhan Pandharpur



*'यशवंत------एक प्रेरणास्रोत!'*
 मालिका खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
छोटे छोटे अनेक सत्य, प्रत्यक्ष अनुभव तुम्ही वाचकांसमोर मांडत आहात.
यातील एखादा भाग कदाचित एखाद्याच्या आयुष्याचा टर्निंग पाँईंट ही ठरू शकतो!
खूप छान...

संतोष चव्हाण.
सहशिक्षक केंद्रशाळा उंबरे पागे ता.पंढरपूर.

प्रतिक्रिया 25 अभिनेता गायक अभिजीत भोसले यांची प्रतिक्रिया..

अभिनेता गायक अभिजीत भोसले यांची प्रतिक्रिया..

तुमचे भरपूर लेख आहेत, हेही पाठवा.म्हणजे त्याचा आस्वाद आम्हा सर्वांना घेता येईल,
" यशवंत " एक प्रेरणा स्रोत.. मधून तुम्ही उत्तमोत्तम लिखाण केलंत, आणि कितीतरी चरित्र तुम्ही प्रेरणेच्या स्वरूपात आम्हा साठी ठेवलं आहे. तुम्ही तुमचं काम अविरत करत रहा याच " चंद्रछाया कलामंचा " तर्फे शुभेछ्या🌹🌹🌹🌹

संदीप पाटील सर.तुमच्या लिखाणाला सलाम आणि ते करण्यासाठी निरंतर तुम्ही घेत असलेले वाचन, जिज्ञासूवृत्ती, आकलन शक्ती, तुम्ही व्यक्तित्व मांडताना केलेली शब्द रचना सत्याचा भास निर्माण करतात. तुमच्या या प्रतिभेचा आम्हास जरूर उपयोग होईल,तसेच व्यक्तिमत्त्व विकासात भर पडेल.. त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि कलामांच्या तर्फे शुभेच्छा..
असेच तुमचे लिखाण आणि प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जावो याच सदिच्छा.👍👍👍👍


" यशवंत " च्या प्रदीर्घ यशाबद्दल श्री. संदीप पाटील सर तुमचे मनापासून अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏तुम्ही सुरू केलेला प्रवास आणि लेखन  सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.असाच तुमच्या विचारांचा भविष्यात ही अनेकांनी  लाभ घ्यावा याच सदिच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया 24 श्री लक्ष्मीकांत सोरटे

श्री लक्ष्मीकांत सोरटे समूह प्रशासक आपुलकी वाचनकट्टा यांची प्रतिक्रिया...

*ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

*नदी डोंगा परी जल नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

*तनू डोंगा परी मन नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

  _*संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात एखाद्या शारीरिक अपंग व्यक्तीविषयी समाजाचे मत आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभंगातून उदाहरणांच्या साहाय्याने आपले मत पटवून दिले आहे.*_

    _*ऊस वाकडा असला तरी त्यातील रस गोड असतो, नदी जरी वेडी वाकडी वाहत असली तरी तिचे पाणी गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे शरीर जरी वाकडे असले तरी त्याचे मन आणि विचार वाकडे नसतात.*_

    _*यशवंत एक प्रेरणास्रोत या सदरात गेनाभाई दर्गभाई पटेल यांचे चरित्र वाचण्यात आले आणि संत चोखामेळा यांचा वरील अभंग आठवला. पाटील सर आपण आम्हाला सदर ब्लॉगद्वारे एकापेक्षा एक सदरे दिलीत. या बद्दल आपले कितीही आभार मानले तरी कमीच वाटतात. मी तर तुमची सर्व लेखमाला माझ्या आपुलकी - वाचन कट्टा या व्हॉटसअप समूहात पाठवत असतो.*_

    _*सर, तुम्ही यापुढे देखील अशीच सदरे पाठवावीत आणि समाजातील अशा लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकावा अशी ईच्छा व्यक्त करतो.*_

*आपलाच*

*श्री.लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे*
*मुक्काम - वाकी*
*पोस्ट - खर्डा*
*तालुका - जामखेड*
*जिल्हा - अहमदनगर*

Laxmikant Sorate: _*ही फक्त एका लेखावरील प्रतिक्रिया दिली आहे. अगदी अशीच प्रतिक्रिया प्रत्येक ब्लॉग वरील पोस्ट विषयी द्यावीशी वाटते. कारण तुम्ही समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी झालेल्या आणि प्रसिध्दीपासून कोसो दूर असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे.*_

प्रतिक्रिया 23 सौ. अंजली औरसंग ठाणे

खरचं यशवंत साठी तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुमची जिद्द ,चिकाटी, उमेद,आणि त्यामुळॆ तुमच्या प्रत्येक लेखातून  आम्हाला  मिळालेली एक नवीन संघर्षाची कहाणी त्या संघर्षातून यशाचे शिखर कसे  गाठावे , जीवनात खचून न जाता पुढचा मार्ग कसा शोधावा हे मी नाही तर माझ्या घरातील प्रत्येकानी जाणलं 👍
तुमच्या रोजच्या लेखाची आम्ही सगळे जण आतुरतेने वाट पाहायचो.आम्ही सगळे एकत्र बसून त्याचे वाचन करायचो 📃
आमच्या साठी तुम्ही सुद्धा एक यशवंत च आहात🙏🏻
*U are great*💐
*तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा*

प्रतिक्रिया 22 संतोष जाधव

खूपच सुंदर सुंदर सुरेख अस सदर आपण सर्वा समोर मांडत आहेत हे कार्य असेच चालू  
राहू देत हिच शुभेच्छा

Regards,
संतोष जाधव | santoshgjadhav19@gmail.com

प्रतिक्रिया 21 Rajendra N. Biradar

खूप खूप प्रेरणादायी सर. असे प्रेरणादायी वाचल्यावर कुठेतरी मनाला प्रसन्न  
वाटतं. व कुठलेही कठीण काम करण्याची जिद्द वाढते.

Regards,
Rajendra N. Biradar | rb44741@gmail.com

प्रतिक्रिया 20 Pramod Madhavrao Shinde

खूप खूप सुंदर व स्तुत्य असा उपक्रम आहे. जे लोक उदास झाले असतील अशा लोकांना  
प्रेरणा मिळते ती आपल्या ह्या लेखनामधून. शोधून शोधून हिरे शोधणे खरच अवघड काम  
आहे तरी पण आपल्यामुळे ते सोपे झाले आहे.

Regards,
Pramod Madhavrao Shinde | shindearyan516@gmail.com

Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 19 अमर हेरवाडे दुधगाव

अमर हेरवाडे दुधगाव यांची प्रतिक्रिया

सर आपण दररोज लेख लिहिता वाचून खूपच आनंद होतो, दररोज काहीतरी नवीन करण्याची कल्पना मनात येत असतात आपणास विनंती आहे की आपण आपल्या लेखांमध्ये थोडासा बदल करून तरुण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी कशा पद्धतीने उपलब्ध करता येतील याच्यासाठी थोडा प्रयत्न करावा.
 भविष्यातील विचार करता नोकरीच्या संधी फारच कमी आहेत आणि त्याहूनही आर्थिक मंदी ह्याचा विचार करून तरुणांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो ह्या बद्दल थोडासा आपण प्रयत्न करावा ही विनंती,
आपणांस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

प्रतिक्रिया 18 अंगापूर नं.1

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नं.1 च्या सहकाऱ्यांच्य
प्रतिक्रिया

Rukmini kanase HM आजआपल्या यशवंत एक प्रेरणा स्तोत्र या लेखाचेदीड शतक पूर्ण होत आहे.त्याबद्दल आपलेमनःपूर्वक अभिनंदन वपुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐👍👍

Thorat Madam: यशवंत एक प्रेरणास्रोतचे दीडशे भाग पूर्ण झालेल्या विशेष अभिनंदन पाटील सर . पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐👍 असेच लिहीत राहा.

Garud Madam: 💐💐🙏सर तुमच्या लेखनाच्या रुपाने आम्हाला रोज एक यशवंत वाचायला मिळाले.नियमित आमचे प्रेरणादायी वाचन झाले . धन्यवाद💐💐 पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🙏

Rajshri Jadhav: अभिनंदन सर,असेच लेखन करत रहा,खूप खूप शुभेच्छा👏👏👏💐💐💐💐💐💐


प्रतिक्रिया 17 डीएडच्या वर्ग मित्रांच्या प्रतिक्रिया

डीएडच्या वर्ग मित्रांच्या प्रतिक्रिया..

Amol Sharma2: नक्कीच संदीप...

तुझा खरंच अभिमान वाटतो...

सुंदर लिहितोस....

👍👍👍👌👌👌👌
V C Narale: Sandy खरंच खूप अभिनंदनिय आहे आमच्यासाठी🌺🌺🌺🌺

Parvej t 2: खरच मित्रा ग्रेट आहेस तू👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
तुझं लेखन हे आता सामान्य राहिलेले नाही.
लवकरच तुझे २०० भाग पूर्ण होऊन पुस्तकरूपात
तुझे कार्य पदर्शित व्हावें
हीच सदिच्छा🌹🌹🌹
आम्हा सर्व मित्रांना तुझा अभिमान आहे भावा.
We love u......

Sanjay Dadas: खूप छान लिहतोयसं मित्रा. असचं पुढे ही सुरु ठेव त्यासाठी तुला तुझ्या लेखणीत सरस्वती प्रसन्न व्हा़वी हीच प्रार्थना 💐💐💐💐💐

 Nilesh: प्रेरणादायी प्रवासाने ठरते आमची दिशा....
वारंवार वाचण्याची चढते अशीही नशा....
अखंड चालत राहो
लेखनाचा वसा.....
जगी उमटू दे तुमचा ठसा.....
        -निलेश कांबळे
🌹🌹🌹🌹🌹🌹

Dada Waware: Sandip you write very inspribal...I am also waiting for Yashvant Story..And this is very nice project..This story I send my all friends which is not ded group.i hope that u become a most popular writer.......,,,,

प्रतिक्रिया 16 विपुल पाटील

वर्गमित्र आणि मार्केट यार्ड मधील प्रसिद्ध व्यवसायिक विपुल पाटील यांची प्रतिक्रिया

मास्तर असंच चालू राहिलं तर हजारावा भाग मला लिहायला लागेल यशवंत एक प्रेरणादायी स्तोत्र संदीप पाटील मास्तर एक मार्केट यार्ड मधील दिवानजी पासून एक समाजाला प्रेरणादायी विचार देणारा लेखक

मास्तर लेख सेंड करायचं टाइमिंग मस्त आहे सकाळी उठल्याउठल्या तुझा लेख दिसतो मी तर आता तुझा लेख वाचूनच बेडवरून उठतो.

प्रतिक्रिया 15 वर्गमित्र रमेश रावळ

वर्गमित्र रमेश रावळ यांची प्रतिक्रिया



काय म्हणू.. प्रिय मित्र संदिप कि माननीय सर... जरी अजून आपले लहान पणीचे दिवस आठवत असतील तरी स्वतःच्या कर्माने, धाडसाने, कष्टाने आज तू एक आदर्श शिक्षक झाला आहेस.. म्हणून माननीय शिक्षक महोदय असे संबोधनेच योग्य..
माननीय शिक्षक महोदय,
  आपल यशवंत ही लेख मालिका चालू करून खरेच एक अनमोल काम केले आहे.. तुमच्या या कामाचे तुम्हाला जितके कौतूक नसेल  त्याहून जास्त आम्हाला कौतूक व अभिमान आहे कारण आपल्या गावातील एक व्यक्ती जेंव्हा एवढ्या यशाच्या शिखरावर पोहचते तेंव्हा अभिमान हा वाटतोच आणि त्यातही तो आपला वर्गमित्र आहे म्हणून सांगताना अंगी मूठभर मांस चढत.. आपल्या यशवंत मालिकेतून आम्ही हे शिकलो कि यश हे पैसा, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून, रंग-रूप पाहून मिळत नाही तर ते फक्त आणि फक्त जिद्द, कष्ट, ध्यास आणि दिर्घोदयोगीपणा या जोरावर मिळत असते.. तुम्ही समाजातील प्रत्येक स्थरावरील, वेगवेगळ्या भौगोलिक पातळीवरील व वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आम्हांपर्यंत पोहचवण्यात तुम्ही यशस्वी झाले आहात म्हणून तुम्ही सुध्दा एक यशवंत झाला आहात.. आणि त्यावरूनच आम्हाला हि यशाचे महत्त्व व त्याची किंमत कळू लागली आहे व जर हे आपल्या सारखे सामान्य लोक इतके यशस्वी होऊ शकतात तर आम्ही सुध्दा निश्चितच होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.. आणि अजून एक मोलाची गोष्ट ही आम्हाला समजली कि यश म्हणजे पैसा मिळवणे नव्हे.. तुम्हच्या लेखमालेत सर्व प्रकारच्या यशस्वी लोकांची माहिती तुम्ही दिलीत.. ते सर्व जण यशस्वी झाले असे तुम्ही मानले ते त्यांनी जे ठरवले ते मिळवले म्हणून.. अनेक नाऊमेद झालेल्या मनाला तुम्हच्या या लेखामुळे नवीन उमेद मिळाली आहे व ते परत एकदा यशस्वी होण्याकडे वाटचाल करीत आहेत याचे श्रेय नक्कीच तुम्हाला जाते... असेच लिहित रहा व नवनवे यशवंत, त्यांचे लढे, त्यांचा संघर्ष व त्यांचे यश आम्हां पर्यंत पोहोचवत रहा.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

प्रतिक्रिया 14 श्रीमती सुनीता गोरवे सांगली

श्रीमती सुनीता गोरवे सांगली यांची प्रतिक्रिया

Geli tin divs kahich vachle nhvte aaj matr vachlyshivay utalech nahi khup chan lekhn kart ahat sir ya sarv lekhanche "ghe bharari", kiva "asa mi ghadlo ", "mich mazhi prerana" Ya navache book 📚 tyar kara sir khup chan mahiti aapn deta ti eaka book madhe milali tr sglynach tycha khup fayda hoiel as maz pramanik mt aahe 🙏 tumchya ya lekhnas maza salm asech lekhn tumchya  hataun ghado 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏


सर आपल्या लेखनाला तोडच नाही .मनाला आलेली  मरगळ.मन काही कारणामुळे उदास झाले असेल तर आलेले डिप्रेशन.आणि आयुष्यात माझ्याच वाट्याला का?ही सगळी  दुःख  .मी कोणते पाप केले म्हणून माझ्या वाट्याला  हे सगळं  येत .या सर्व प्रश्नांना उत्तर  मिळाले आणि मन समाधान पावले .प्रसिद्धीसाठी वाटेल तो खोटेपणा करनारी पण  काही  मानसे असतात पण आपण  फारच वेगळेआहात. आपल्या   लेखातून फक्त  समाजाचे हिचच.जपणार्या या अवलियास मानाचा मुजरा 🙏🙏🙏 आणि या वाचन दिंडीत आम्हांला सहभीगी होण्याची संधी आमच्या  सारख्यांना मिळवून दिली त्या बद्दल खूपच धन्यवाद .पुन्हा एकदा आभार.आभारासाठी शब्दच सुचत  नाहीत.🙏🙏🙏🙏🙏

प्रतिक्रिया 13 वर्गमित्र आदिनाथ पाटील

वर्गमित्र आदिनाथ पाटील ची प्रतिक्रिया

Mstch sir .....tumcha ha yashvant ek preranastrotr mala roj vachava vatto karan ya madun mala ek veglech lokanche vegle anubhav tyani kelele kashat ani tyatun tyana milalele yash he abhimanaspad ahe...yatun swata jiddin ubha rahnyasati mala prerna milte as vatty....khupch chan....asha lokan vishayi abhyas ghyayla avdel je halakitun aale ani yashwant zhle.....tyanchasti mazakdun salam...tumi ya lekhadvare changl kam krt ahat as mala vatty....tumchehi abhar.....ani tumihi asech yashwant vhave hich eccha...🙏🙏

प्रतिक्रिया 12 सौ.शुभांगी कुंभार. पाटण

सौ.शुभांगी कुंभार. पाटण. यांची प्रतिक्रिया


मा. संदीप सर,सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आमच्या पासून अनभिज्ञ असलेली ही *माणकं* तुम्ही उजेडात आणली.

भारत सरकार दरवर्षी अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल सन्मान, पुरस्कार  देत असते.
आपण ते दूरदर्शनवर बघतो, ऐकतो, पण त्या व्यक्तींची विस्तृत माहिती आपणास नसते .ती तुम्ही आम्हाला घरबसल्या दिली. तुमच्या या पोस्ट ची आम्ही रोज आतुरतेने वाट पाहतो.

त्यांच कार्य किती महान आहे, ते कोणत्या गोष्टींनी प्रेरित होऊन हे करू लागले हे समजणं ,समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचे आहे.
ही माणसं खरंच खूप
महान आहेत.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर, खडतर संकटांना तोंड देत त्यांनी हे कार्य एक व्रत समजून केलं आहे.
सर्व काही सुखसुविधा असताना देखील आजचा माणूस दुःखी आहे. आणि काहीच सुविधा नसताना त्यातून या  *यशवंतां* नी इतरांना सुखाचा प्रकाश दिला आहे.
खरंच त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम🙏🏼🙏🏼

मा. संदीप पाटील सर, तुमच्या या प्रचंड लोकप्रिय लेखमालेच्या प्रवासाला आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
सौ.शुभांगी कुंभार. पाटण.

प्रतिक्रिया 11 श्री. विष्णू ढेबे सर

श्री. विष्णू ढेबे सर उपक्रमशील शिक्षक सातारा


आपल्या उपक्रमशील शिक्षक समूहाचे सदस्य श्री संदीप पाटील सर यांच्या यशवंत एक प्रेरणास्त्रोत हे सदर उदया दीड शतकाचा पल्ला गाठत आहे. अतिशय प्रेरणादायी अशी व्यक्तीचारित्र संदीप सरांनी आपल्या लेखमालेत साकारली. अगदी मोजक्या शब्दांमध्ये व्यक्तिमत्त्व  बालपण ते अगदी त्यांच्या शेवटपर्यंतचा जीवनप्रवास  उत्कृष्ट शब्दांमध्ये मांडण्याचे कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. लेखमालेत बरीचशी व्यक्तिमत्त्व अगदी भारतातील, भारताबाहेरील यशवंत जे आपल्याला खूपच कमी माहीत होते ,ते मांडण्याचा त्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या लेखणीचे करावे तेवढे कौतुक थोडेच. त्यांच्या या सर्व लेखमालेचे पुस्तक प्रकाशित व्हावे ही सदिच्छा. यापुढील लेखन प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा*  🙏🙏

प्रतिक्रिया 10 श्री.दीपक मगर सर

'संस्कारदीप'कार श्री.दीपक मगर सर यांची प्रतिक्रिया

*यशवंत*
अनेकविध वेचक वेधक प्रेरक व्यक्तिमत्वे जनमाणसासमोर सातत्याने प्रकाशित करत आपण सादर केलेलं हे सदर खूपच प्रेरणादायी...
आपल्या व्यक्तिमत्त्व अन संवेदनशीलतेस सलाम...

पुस्तक लवकरात लवकर हाती पडो...मनःपूर्वक शुभेच्छा!🙏

प्रतिक्रिया 9 श्री सुनील शेडगे

सातारा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मित्रवर्य संदीप पाटील यांच्या 'व्हाॅटस अप'वर लिहित असलेल्या अन् अलीकडं विशेष प्रसिध्दी पावलेल्या 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' या दैनंदिन लेखमालेचा आजचा हा सलग दीडशेवा भाग. त्यानिमित्त!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  *यशवंत*

*सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*मित्रवर्य संदीप सर,*

आज आपल्या 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' या लेखमालेचं दीड शतक पूर्ण होतं आहे. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक, ह्दयपूर्वक अभिनंदन!

*एकच विषय नजरेसमोर ठेवून सलग दीडशे दिवस लिहिणं, हे शिवधनुष्य* *पेलण्यासारखं आहे. इतकं मोठं आव्हान आपण अगदी लीलया पेलता आहात, याचं मोठं कोैतुक वाटतं.* *आपली ही कामगिरी निश्चितच* *अनन्यसाधारण ठरावी.*

संदीप सर,
आपल्या या आजच्या ठळक कामगिरीनं माझं मन गतकाळात पोहोचलं. तुम्ही तेव्हा पाटण तालुक्यात कार्यरत होता. कुठल्याशा एका 'व्हाॅटस ग्रुप'वर आपण दोघं एकत्र होतो. आपला परिचय तिथला. माझ्या लेखांवर तुम्ही अगत्यानं प्रतिक्रिया नोंदवायचा. लेखन आवडल्याचं सांगायचा. मग मध्ये तीनेक वर्षे लोटली. निवडणूक प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपली पहिली भेट दहिवडीत घडली.
गडबडीतही आपण बोलत राहिलो.
जाता जाता तुम्ही आठवण म्हणून दोघांचा 'सेल्फी' घेतला.

दरम्यानच्या काळात तुम्ही लेखनाचा श्रीगणेशा केला. 'यशवंत- एक प्रेरणास्त्रोत' ही लेखमाला आपण सुरु केली. अगदी सुरवातीलाच मी फोन करुन तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तुम्ही खूपच आनंदी झाला होता.

*आपण तेव्हा सुरु केलेल्या पायवाटेचं आज हमरस्त्यात* *रूपांतर होतं आहे.*
*हे करताना आपला* *प्रवास कसा झाला असेल, याची कल्पना नक्कीच आहे. वाचक पटकन वाचतो अन्* *कदाचित बाजूला होतो. लिहिणाऱ्याला मात्र तसं करता येत नाही. त्याला सतत लेखनाशी* *स्वतःला बांधून घ्यावं लागतं. स्वतःत लेखन मुरवून, जिरवून घ्यावं लागतं. लेखन हा* *लिहिणाऱ्याचा श्वास ठरावा लागतो. ध्यास बनावा लागतो. हे सारे गुण आपण आत्मसात करत गेला आहात.* *आजचं हे यश म्हणजे त्याचीच फलश्रृती.*

लेखनाच्या रुपानं आता आपली मोठी घोडदौड सुरु आहे. राज्यातल्या कित्येक ग्रुपवर आपलं लेखन पोहोचतं आहे. आपण तयार केलेल्या, 'ब्लाॅग'लाही वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. हे यश नक्कीच  सुखावणारं आहे.

*प्रेरणा, जिद्द, संघर्ष हा आपल्या लेखनाचा गाभा आहे. तेच* *लिहिण्याचं सूत्र आहे. अर्थात हे शब्द केवळ लिहिण्यासाठी तुम्ही वापरलेले नाहीत. तुम्ही स्वतः तसे जगला* *आहात.*
*दहावीनंतर मार्केट* *यार्डात दिवानजीचे काम करणारा, दहा* *रुपयांसाठी दोन तास पेपर टाकणारा* *एकेकाळचा एक मुलगा आज अंगापूरसारख्या एका आंतरराष्ट्रीय शाळेचा कुशल शिक्षक बनला आहे. लेखनाच्या रुपानं यशवंत बनला आहे.*

संदीप सर,
तुमचा अभिमान वाटतो.
असेच लिहित राहा. यशाची शिखरं पादाक्रांत करत राहा.

संदीप पाटील यांचे लेख वाचण्यासाठी
click on

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/150.html

*शनिवार। 18 एप्रिल 2020*
*सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा*
*sunilshedage123@gmail.com*
*Mob : 98224 54630*

*माझे मागील सर्व लेख वाचण्यासाठी click on*
https://sunnyspecialblog.wordpress.com

🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁

             ©  🇸 🇺 🇳 🇮 🇱
           🇸 🇭  🇪 🇩 🇦 🇬 🇪

🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃