Monday, April 20, 2020

प्रतिक्रिया 24 श्री लक्ष्मीकांत सोरटे

श्री लक्ष्मीकांत सोरटे समूह प्रशासक आपुलकी वाचनकट्टा यांची प्रतिक्रिया...

*ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

*नदी डोंगा परी जल नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

*तनू डोंगा परी मन नोहे डोंगा*

*काय भूललासी वरलिया रंगा*

  _*संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात एखाद्या शारीरिक अपंग व्यक्तीविषयी समाजाचे मत आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभंगातून उदाहरणांच्या साहाय्याने आपले मत पटवून दिले आहे.*_

    _*ऊस वाकडा असला तरी त्यातील रस गोड असतो, नदी जरी वेडी वाकडी वाहत असली तरी तिचे पाणी गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे शरीर जरी वाकडे असले तरी त्याचे मन आणि विचार वाकडे नसतात.*_

    _*यशवंत एक प्रेरणास्रोत या सदरात गेनाभाई दर्गभाई पटेल यांचे चरित्र वाचण्यात आले आणि संत चोखामेळा यांचा वरील अभंग आठवला. पाटील सर आपण आम्हाला सदर ब्लॉगद्वारे एकापेक्षा एक सदरे दिलीत. या बद्दल आपले कितीही आभार मानले तरी कमीच वाटतात. मी तर तुमची सर्व लेखमाला माझ्या आपुलकी - वाचन कट्टा या व्हॉटसअप समूहात पाठवत असतो.*_

    _*सर, तुम्ही यापुढे देखील अशीच सदरे पाठवावीत आणि समाजातील अशा लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकावा अशी ईच्छा व्यक्त करतो.*_

*आपलाच*

*श्री.लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे*
*मुक्काम - वाकी*
*पोस्ट - खर्डा*
*तालुका - जामखेड*
*जिल्हा - अहमदनगर*

Laxmikant Sorate: _*ही फक्त एका लेखावरील प्रतिक्रिया दिली आहे. अगदी अशीच प्रतिक्रिया प्रत्येक ब्लॉग वरील पोस्ट विषयी द्यावीशी वाटते. कारण तुम्ही समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी झालेल्या आणि प्रसिध्दीपासून कोसो दूर असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे.*_

No comments: