काही लोकांना ‘नजर’ असते, काही लोकांना फक्त ‘दिसतं’, तर काही लोक असे असतात, ज्यांना काळाच्याही पुढे पाहण्याची ‘दृष्टी’ असते आणि, म्हणूनच ते समाजात ‘वेगळे’ ठरतात. अशीच दृष्टी असणाऱ्या एका यशस्वी "डॉक्टर" ची ही प्रेरक कहाणी.....
माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात जन्मलेला डॉक्टर......
दहाजणांचं कुटुंब, आईवडील शेतमजूर,अशी प्रतिकूल परिस्थिती...
दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच न जाताही...दहावीला जिल्ह्यात पहिला...
गावाला येण्यासाठी लाल डब्याची गाडी नव्हती.म्हणून याला रोज १४ किमी पायी जावे लागले...
या डॉक्टरला एका कंडक्टरच्या घरी राहून महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे लागले.
या डॉक्टरला महिन्याला 30 रुपये मजुरीसाठी रोज खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी आणावे लागले.
या डॉक्टरला MBBS ला ऍडमिशन घेतल्यावर वसतिगृहातील 7 मुलांचा रोज स्वयंपाक करावा लागला. का? तर जेवण फुकट मिळायचे म्हणून..
अथक परिश्रम करून तो एक नेत्रतज्ञ बनला...
1991 साल उजाडलं.....या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी.... डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे भाकीत केलं.....आईनं किडनी दिली....
पुनर्जन्म मिळाला.....आणि पुढील आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी हा निर्णय त्याने घेतला....
आजवर या अवलिया डॉक्टर ने सव्वा कोटींवर रुग्णांची तपासणी केली आहे. तर, त्यापैकी दीड लाख वृद्धांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या.
जन्मत: अंध असलेल्या १० हजार रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरण्याचं काम केलं...
एक लाख शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टरचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.......असा हा अवलिया डॉक्टर म्हणजे डॉ.तात्याराव लहाने.
लातूरमधील मकेगावसारख्या लहानशा खेडयातून मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सारं काही सांगणारा आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठणारा एक ध्येयवादी म्हणून डॉ.लहानें चे नाव घेता येईल...
म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
No comments:
Post a Comment