🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 129*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
कर्नाटकातील एका महिलेने कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, केवळ आपल्या कामाच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवली. केवळ नोकरीच नाही, तर देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा. त्या महिलेच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा...
कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील होन्नोळी या गावात एका गरीब, आदिवासी कुटुंबात तिचा जन्म झाला. केवळ दोन वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे, तिला अगदी लहान वयातच आईसोबत कामाला जावे लागले. त्यामुळे तिला कोणतेही शिक्षण घेता आलेच नाही. अगदी लहान वयातच तिचा विवाह झाला.पण, काही वर्षातच पतीचे निधन झाले आणि घरची संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यांवर असली.
तिला बालपणापासूनच वृक्ष संवर्धनाची आवड होती. त्यामुळे वनविभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात ती हिरीरीने सहभागी व्हायची. तिच्या या आवडीमुळेच तिला वनविभागात काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने तिची नेमणूक झाली.
वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हेच तिचे काम. ती झाडांची काळजी अगदी आपल्या मुलांप्रमाणे घ्यायची. एखादं झाड पाहिलं की, त्याची गरज तिला लगेचच समजायची आणि ती क्षणार्धात पूर्ण देखील करायची. मनापासून, सातत्यानं कित्येक वर्ष केल्यानंतर, झाडांच्या अनेक प्रजातींची माहिती, तिला तोंडपाठ झाली. एखाद्या वनस्पतिशास्त्रज्ञाइतकं ज्ञान तिला अवगत होतं. तिच्या या सखोल ज्ञानामुळेच वन विभागाने तिला सरकारी नोकरीत कायम देखील केले. परिसरातील अनेक पर्यावरण तज्ज्ञ, विद्यार्थी तिच्याकडून झाडांविषयीची माहिती घेण्यासाठी येवू लागली. त्यामुळेच तिचा नाव लौकिक वाढू लागला. परिसरातील लोक तिला "जंगलाचा एन्सायक्लोपीडिया" असे संबोधू लागले. हा "जंगलाचा एन्सायक्लोपीडिया" म्हणजेच "तुलसी गौडा" होय.
गेल्या साठ वर्षांपासून तुलसी गौडा वृक्षसंगोपनाचं काम करत आहेत. या काळात त्यांनी लाखाहून अधिक झाडं लावली आहेत आणि ती सर्वच्या सर्व झाडं जगविली देखील आहेत. "आवड आणि अधिक जाणून घेण्याची वृत्ती" यामुळे वृक्षासंबंधी त्यांना सखोल ज्ञान प्राप्त झाले. या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना देखील, त्या सरकारी नोकरी मिळू शकल्या. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारने पद्मश्री या देशातील चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
यशस्वी होण्याच्या प्रक्रियेतील पहिला महत्वाचा घटक म्हणजेच आवड. तुलसी गौडा यांनी आपली आवड शोधली आणि मनापासून जपली. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद !!!!!
🎯 तुलसी गौडा यांच्या फोटोसाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/129.html
🎯 शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या एका अडाणी, अशिक्षित "अक्षर संता" चा प्रेरणादायी प्रवास जाणून 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/03/128.html
🎯 स्वतःच्या अंधत्वावर मात करणाऱ्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी👇 येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2019/07/103.html
No comments:
Post a Comment