🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत.
🎯 भाग - 147.
( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/147.html
जन्म देऊन सोडून गेलेला बाप, अन् वयाच्या पाचव्या वर्षी आलेलं अपंगत्व यावर मात करून, यशच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षीच भारताच्या चौथ्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या एका तरुण खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात जाणून घेणार आहोत.चला तर मग....
28 जुलै 1995 रोजी तामिळनाडूतील सालेम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरिअवाडागमपत्ती या गावात एका गरीब कुटुंबात मरियप्पनचा जन्म झाला. आई, बहीण आणि चार भावंडं असा त्याचा परिवार. वडिल घरदार, बायकापोरं वाऱ्यावर सोडून गेलेले. ना शेत,ना दार. अशा खडतर परिस्थितीत आईने वीटभट्टीवर काम करून मुलांचा सांभाळ केला.
इतक्या हलाखीच्या परिस्थितीत देखील संकटं पाठ सोडायला तयार नव्हती. मरियप्पन 5 वर्षांचा असतानाचा एक प्रसंग. तो रस्त्याने जात असताना, नशेत असलेल्या एका बस चालकाने त्याच्या अंगावर बस घातली. या अपघातात त्याला आपला पाय गमवावा लागला. तो कायमचा अधू झाला. आईने त्याला वाचविण्यासाठी, परिस्थिती नसताना कर्ज काढून बराच खर्च केला. तब्बल सतरा वर्षे तिने नुकसानभरपाई मिळविण्यासाठी न्यायालयात लढा दिला.
अपघातातून सावरून मरियप्पन शाळेत जाऊ लागला. वर्गात हुशार असलेला मरियप्पन, मैदानातही तितक्याच चपळ होता. तो हॉलीबॉल उत्तम प्रकारे खेळायचा. त्याच्या उंचपुऱ्या शरीरयष्टीकडे पाहून, पीटी च्या शिक्षकांनी त्याला उंच उडीत सहभाग घेण्याविषयी सल्ला दिला. त्याने तो सल्ला मानला.त्याने उंच उडीचा अधिकाधिक सराव केला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने आपल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला वगळता अन्य स्पर्धक शारीरिकदृष्ट्या सक्षम होते. तरीही त्याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या यशाने त्याचा आत्मविश्वास वाढला.तो जोमाने तयारी करू लागला. त्याची निवड राष्ट्रीय पॅराअथलेटिक्स साठी झाली. याही स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली. येथेच त्याच्यावर एका गुणी प्रशिक्षकांची नजर पडली. त्याला उत्तम मार्गदर्शन मिळाले. मिळालेले मार्गदर्शन आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर, वयाच्या 21 व्या वर्षी 2016 साली रिओ येथे भरलेल्या पॅरालिंपिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक पटकावून स्वतःचा आणि देशाचा मान उंचावला. अशी सुवर्ण कामगिरी करणारा तो खेळाडू म्हणजेच "मरियप्पन थंगवेलू" होय.
मरियप्पन चा प्रवास वाचून झाला. आता स्वतःला काही प्रश्न विचारा.
मी अपंग आहे का ?
माझे आई/वडील मला सोडून गेले आहेत का ?
माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे का ?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर "होय" असतील तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात मरियप्पनसारखी देदीप्यमान कामगिरी करणे. बिलकूल अशक्य नाही आणि जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे "नाही" असतील तर आपण सुज्ञ असल्याने मला जादा काही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. "जी माणसं कारणं सांगतात, ती कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत आणि यशस्वी झालेली माणसं कधीच कारणं सांगत नाहीत."
अपघाताने आलेले अपंगत्व, बापाचा नसलेला आधार आणि आत्यंतिक दारिद्र्य या सर्वावर आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या बळावर मात करून मरियप्पन यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला वयाच्या तेविसाव्या वर्षीच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.
सध्या आपण "यशवंत - एक प्रेरणास्रोत" च्या सहाव्या पर्वाच्या अंतिम टप्प्यात येवून पोहोचलो आहोत. याची कदाचित आपणांस जाणीव असेलच. या निमित्ताने आपणांस एक विनंती आहे की,गेली तीन आठवडे आपण या लेखनमालेचे अत्यंत मन:पुर्वक वाचन करताहात. याची आपल्या असंख्य प्रतिक्रिया मधून वेळोवेळी प्रचिती येत आहे. आपल्याला हा संपूर्ण प्रवास कसा वाटला ? याबद्दल आपली दीर्घ प्रतिक्रिया लिहून पाठवावी. जेणेकरून त्या ब्लॉगवर प्रसारित करता येतील. तसेच आपण ही लेखमाला ज्या ग्रुपवर फॉरवर्ड करत आहात किंवा इतर कोणत्या ग्रुपवरून वाचायला मिळत असेल. त्याचा एक screenshot अवश्य पाठवावा. जेणेकरून त्याचा उल्लेख अंतिम भागातही करता येईल. शक्य झाल्यास ब्लॉग ला भेट द्या आणि फॉलो करा.
इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.
धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.
🎯 *"दरिपल्ली रमैया"* यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/146.html

No comments:
Post a Comment