एका महिन्याच्या विश्रांतीनंतर यशवंत या लेखमालेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करताना जितका आनंद झाला त्यापेक्षा अधिक आनंद वाचक मित्रांनी या लेखमालेस दिलेला प्रतिसाद पाहून झाला.या दुसऱ्या सत्राचे होत असलेले स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे.मित्रांनो,असंच प्रेम या लेखांच्या माध्यमातून मिळत राहो हीच अपेक्षा.
आफ्रिकेसारख्या कृष्णवर्णीय देशात जन्माला येऊन जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होणाऱ्या एका यशवंताचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.
तो एका बकऱ्या चारणाऱ्याचा मुलगा.
त्याच्या जन्मानंतर तीन वर्षातच आईवडिलांचा घटस्फोट झाला.
आईने दुसरा विवाह केला आणि या लहानग्याची रवानगी झाली त्याच्या आजीआजोबांकडे.
सोडून गेलेला बापामुळे त्याला जीवनात अतिशय त्रास सहन करावा लागला.
रंगाने काळा असल्याने त्याला अनेकदा अपमान सहन करावा लागला.
कसे बसे शिक्षण पूर्ण केले.
काही काळ वकील आणि काही काळ शिक्षक म्हणून काम केले.
वकिली पेशामुळे त्याचा राजकारणात प्रवेश झाला.
दिवस भरभर उलटत होते..दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले होते...पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले...नावलौकिक वाढला. एक लेखक आणि समाजसेवक म्हणून तो प्रसिद्ध झाला होता.
2007 साल त्याच्यासाठी नवीन संधी घेऊन उजाडलं......
संधी होती अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक...
त्यानं आपली दावेदारी सिद्ध केली आणि कठोर प्रतिश्रमानंतर तो अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष बनला. ती व्यक्ती म्हणजेच बराक ओबामा.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारी बराक ओबामा हे केवळ तिसरे कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
ओबामांच्या जीवनात असंख्य अडचणी आल्या. रंगाने काळा म्हणून त्यांची हेटाळणी झाली. वडील नाहीत. याचा त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. म्हणून ते डगमगले नाहीत. आपल्या प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी असाध्य असे यश मिळवले.
आपल्याही जीवनात अनेक अडचणी असतात. म्हणून, या अडचणींना घाबरायचं नसतं, तर त्यांना सामोरं जायचं असतं. त्यांच्याशी दोन हात करायचं असतं.
1 comment:
Nice
Post a Comment