Saturday, August 8, 2020

श्री. अमोल गुलाब मिसाळ सर - इंग्लिश गुरु

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *श्री. अमोल गुलाब मिसाळ सर - इंग्लिश गुरु.*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

सध्या जग फार जवळ येत चाललं आहे. संगणक, स्मार्टफोन आदींचे मानवी जीवनातील स्थान अधिकाधिक घट्ट होत चालले आहे. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत तर ते अधिकच बळकट झाले आहे. Work From Home प्रमाणेच Teaching From Home and Learning From Home या नव्या Online शिक्षणाच्या संकल्पना देखील जन्मास आल्या आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुरू झाली. आपले अज्ञान दूर करण्यासाठी नवनव्या गुरूंचा शोध सुरू झाला. या लॉकडाऊन च्या काळात अनेकांना नवे गुरु लाभले. या गुरूंनी मुक्तहस्ताने आपल्या कडील ज्ञानाची कवाडे विद्यार्थ्यांसाठी खुली केली. इंग्रजीच्या ज्ञानाची कवाडे हजारोंसाठी खुले करणारे " इंग्लिश गुरु म्हणजेच श्री. अमोल मिसाळ सर " त्यांपैकीच एक. त्यांचा हा आज प्रवास आपण जाणून घेणार आहोत...


श्री.अमोल गुलाब मिसाळ हे दिघंची, ता - आटपाडी, जि. सांगली येथील रहिवाशी. सध्या ते जि.प.शाळा मुसलमानवस्ती चाफेर, ता - पाटण,जि. - सातारा येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 28/06/2011 रोजी जि.प.शाळा वांझोळे ता - पाटण येथून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. 


पहिल्या वर्षीच त्यांच्या अथक परिश्रमातून वांझोळे शाळेतील एक विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक बनली. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळेच दुसऱ्या वर्षी त्यांच्याच पुढाकाराने शाळेत Semi English ची सुरवात झाली. आपल्या इंग्रजी वरील प्रभुत्वच्या जोरावर 2017 - 18 साली संपन्न झालेल्या शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत Spoken English या इव्हेण्ट मध्ये त्यांनी पाटण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.


श्री. मिसाळ सर हे उत्तम कवी आहेत. अनेक साहित्य संमेलनात आपल्या कवितांचे सादरीकरण त्यांनी केले आहे. ' व्यथा डी.सी.पी.एस. ग्रस्तांची ' ही त्यांची कविता अतिशय लोकप्रिय ठरली आहे. 


श्री. मिसाळ सर हे एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. amol misal या youtube channel च्या माध्यमातून, शिक्षणक्षेत्रातील  तांत्रिक बाबीचे, शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शिवाय विद्यार्थीसाठी उपयुक्त अशा pdf ची त्यांनी निर्मिती देखील केली आहे. 


एकंदरीतच श्री अमोल मिसाळ हे एक हरहुन्नरी, धडपडे आणि स्वतः सोबत इतरांचा विचार करणारं व्यक्तिमत्त्व. लॉक डाऊनचा भला मोठा काळ, त्यांनी स्वतः च्या समृद्धीसाठी दिला. शिवाय, इतरांसाठी काय करता येईल ? याचाही विचार केला. त्यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती संकल्पना म्हणजेच " I CAN SPEAK ENGLISH " हा 30 दिवसांचा कोर्स.


" I CAN SPEAK ENGLISH " या 30 दिवसांच्या कोर्स ची सुरुवात दि 6 जुलै पासून झाली. आपल्या Youtube chaneel व whatsapp समूहाची च्या माध्यमातून त्यांनी या कोर्स ची सुरुवात केली. या उपक्रमांर्गत त्यांनी प्रत्येक घटकावर आधारित एका मार्गदर्शक व्हिडिओ ची स्वत: निर्मिती केली. तो प्रसारित केला. त्या घटकाच्या अनुषंगाने 30 प्रश्नां च्या Online चाचणीची निर्मिती केली. त्यांनतर सहभागी झालेल्यांसाठी Homework दिला आणि तो करून घेतला. शिवाय या कोर्स मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्यांनी गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन देखील केले आहे. तेही तब्बल 30 दिवस अखंडपणे आणि पूर्णपणे मोफत. 


त्यांच्या या उपक्रमाची आज सांगता होत आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठीच मुख्यत्वे या रचनाबद्द कार्यक्रमाची निर्मिती केली होती. परंतु, कोर्स ची रचना आणि त्याची अंमबजावणी पाहून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले. हे त्यांच्या कोर्स चे यश म्हणावे लागेल. त्यांच्या या कोर्स चा लाभ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला आहे. या कोर्स मुळेच अनेकांची इंग्रजी बाबतची असलेली, अकारण भीती नाहीशी झाली असून त्यांच्यात नवा आत्मविश्वास आणि चैतन्य निर्माण झाले आहे. ते लिलया इंग्रजी बोलू लागले आहेत. म्हणूनच ते "इंग्लिश गुरु" आहेत. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 


श्री. मिसाळ सर यांना या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख मा.एम.एस.जाधव साहेब, श्री. दत्ता नाळे सर, विकास माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.


उद्यापासून श्री. मिसाळ सर यांच्या " I CAN SPEAK ENGLISH " या कोर्स ची कमतरता भासत राहिलं. हा कोर्स संपूच नये असे. अनेकांना वाटते आहे. आपण लवकरच एखादा नवा कोर्स आपल्या सर्वांसाठी निर्माण करावा. यासाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा!!!

आपण " I CAN SPEAK ENGLISH " हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याबद्दल श्री मिसाळ सर आपले खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

श्री. अमोल मिसाळ यांच्या " I CAN SPEAK ENGLISH " या कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा https://englishguruamolmisal.blogspot.com 




1 comment:

Unknown said...

Misalsir work is nice due to this programme me and my son was connected with english language. My son learned english and always ready for misalsir programme. Thanks misal Sir.🙏