Sunday, August 9, 2020

शिक्षक मंच सातारा - प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने

 🎯*यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *शिक्षक मंच सातारा - प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


8 ऑगस्ट 2019 रोजी सातारा जिल्ह्यातील काही धडपड्या, ध्येयवेड्या, तंत्रस्नेही शिक्षकांनी, व्यापक आणि उद्द्दात उद्देशाने एकत्र येवून एका समूहाची केली. तो समूह म्हणजेच ' शिक्षक मंच सातारा '. आज या समूहाच्या स्थापनेला एक पूर्ण झाले आहे. त्या निमित्त समूहातील सर्व सदस्य, प्रशासक आणि कोअर कमिटी सदस्य या सर्वांनाच खुप खुप शुभेच्छा !!!


साताऱ्यातील शिक्षकांनी, साताऱ्यातील शिक्षकांसाठी चालविलेला, साताऱ्यातील शिक्षकांचा समूह म्हणजेच "शिक्षक मंच सातारा" होय. साताऱ्यातील शिक्षकांना शाळेतील दैनंदिन कामकाज पार पाडत असताना, ज्या बाबींची नितांत गरज असते, त्या सर्व बाबींची उपलब्धता या समूहाव्दारे करून दिली जाते. GR पासून परिपत्रका पर्यंत, परिपाठापासून पाठापर्यंत, शिक्षे (अध्यापन) पासून परिक्षे पर्यंत, सरल पासून शाळा सिद्धी पर्यंत, ऑडिओ पासून व्हिडिओपर्यंत, PDF पासून Excel, word पर्यंत, ऑफलाईन पासून ऑनलाईन पर्यंत साऱ्या साऱ्या बाबी, खंडाळापासून उंडाळ्यापर्यंत पसरलेल्या, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांपर्यंत क्षणार्धात पोहोचविण्याचे काम या समूहाच्या माध्यमातून केलं जात आहे. 


जिल्हा परिषदेतून निघालेले आदेश, परिपत्रके असो वा मंत्रालयातून शिक्षण विभागाशी निगडित निघालेला GR असो. काही मिनिटातच या समूहावर उपलब्ध होतो. हे या समुहाचं वैशिष्ट्य होय. 


या समूहाच्या माध्यमातून केवळ माहितीच पोहचविण्याचे काम केलं जातंय असं नाही, तर शिक्षकांना नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. त्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी आठवड्यातून एकदा कार्यशाळेचे आयोजन देखील केले जाते. ऑनलाइन माहिती भरताना निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय देखील शोधून देण्याचे कार्य या समूहाद्वारे केले जाते.


शिक्षक राबवित असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे काम येथूनच केले जाते. शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ' शिक्षक मंच सातारा '  ने आपली खास ओळख निर्माण केली आहे. 


सध्या लॉक डाऊन च्या काळात सातारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, शाळा बंद असतानाही शैक्षणिक प्रवाहात कायम राहावेत, या उद्देशाने ' शिक्षक मंच सातारा ' ने ऑनलाईन टेस्ट ची निर्मिती करून, ती विद्यार्थ्यांपर्यंत सलगपणे पोहोचविली आहे. 


या समूहाची आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याची दखल सातारा जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. ही बाब अतिशय गौरवाची आहे. 


या समूहाच्या कृतिशील तंत्रस्नेही प्रशासकांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामुळे अल्पावधीतच ' शिक्षक मंच सातारा ' हा समूह संपूर्ण सातारा जिल्ह्यात लोकप्रिय झाला. 17 समूहाच्या माध्यमातून 4000हून अधिक शिक्षक या समूहाशी जोडले गेले आहेत. ही या समूहाच्या माध्यमातून होत असलेल्या कामाची यशस्विता होय.


' शिक्षक मंच सातारा ' या समूहाची कार्यतत्परता आणि लोकप्रियता चंद्राच्या कलेप्रमाणे उत्तरोत्तर वाढतच जावो. हीच अपेक्षा. पुनश्च एकदा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


धन्यवाद.....



2 comments:

RAUT SAGAR said...

Very nice...

Salvi Suvarna Pramod. said...

खूप छान लेखन सर,👌👌💐💐