🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 20 काळजीवाहू कर्मवीर
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.
कर्मवीरांचे धाकटे बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर गावी राहत असत. ते वकिली करीत. टी. पी. पाटील त्यांचे नाव. कर्मवीर त्यांना "तात्या" म्हणत.
एकदा तात्या कर्मवीरांच्याकडे आले. लक्ष्मीबाईंना आनंद झाला. त्यांनी कर्मवीरांना, "भाऊजी आले आहेत. घरात तांदूळ नाही. तांदूळ आणा." असे सांगितले.
घरात पैशाचा खडखडाट होता. कर्मवीरांच्या घरची परिस्थिती तशी जेमतेमच असते. हे तात्यांनाही माहीत होते.
त्यामुळे तात्या म्हणाले, "वहिनी, मला काही नको. काही करू नका !" पण वहिनी ऐकेनात. तांदूळ आणायला कर्मवीरांना त्यांनी आग्रहाने बाहेर पाठविलेच.
कर्मवीरांच्या डोक्यात दुसराच एक विषय होता. आज एका मुलाचा मॅट्रिकचा फॉर्म भरायचा होता. त्याकरिता पैसे पाहिजे होते. पैसे तर नव्हते. रस्त्याने निघाले असता कर्मवीरांना एक वकील मित्र भेटले. त्यांनी कर्मवीरांच्या कार्याची विचारपूस केली व जाताना संस्थेला 10 रुपयांची देणगी दिली. कर्मवीरांना अतिशय आनंद झाला. ते तडक शाहू बोर्डिंगमध्ये गेले व त्या मुलाला बोलवून फॉर्म भरायला सांगितला.
तात्यांना कर्मवीर म्हणाले म्हणाले, “बघितलेस ? मला या मुलाच्या फॉर्मची काळजी लागून राहिली होती. ईश्वरच माझ्या मागे उभा आहे. हेच खरे."
शेवटी तांदूळ न घेताच ते घरी गेले होते. खरंतर कर्मवीरांना आपल्या मुलापेक्षा बाहेरच्या मुलांचीच काळजी जास्त असे. हा प्रसंग केवळ त्यांच्या जीवनातील एक घटना आहे. असे शेकडो प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले आहेत, ज्यातून गोरगरिबांविषयी त्यांची काळजी दिसून येते.
याच काळजीवाहू कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण दुधगांव येथे सुरू आहे. 9 मे 2023 रोजी कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिनी या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शिल्लक राहिलेला कालावधी अतिशय थोडा आहे. आजपासून केवळ एकच महिना बाकी उरलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यापासून मोठ्या जोमाने काम सुरू आहे. अजूनही साडेतीन लाख रुपयांचा निधी जमा करणे गरजेचे आहे. या सुशोभीकरणाच्या कार्यात आपण खारीचा वाटा देऊन सहकार्य करावे. हीच एक विनंती.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.
शाखा-दुधगाव
ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219
*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41
धन्यवाद...!!!
No comments:
Post a Comment