Sunday, April 16, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 21 पितृतुल्य कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 21 पितृतुल्य कर्मवीर 

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.



कर्मवीरांच्या देखरेखीखाली छ. शिवाजी कॉलेजवर विहिरीच्या खुदाईचे काम चालू होते. छ. शाहू वसतिगृह क्र. 2 चे विद्यार्थी तिथे कामाला जात असत. त्या वसतिगृहाचे प्रमुख श्री. जे. बी. पाटील हे होते.


एक दिवस असं घडलं कि, जे. बी. पाटील यांच्या लग्नाचा दिवस होता. मुंडावळ्या बांधलेल्या असतानाच त्यांना कर्मवीरांचा निरोप मिळाला, "उद्या पहाटे वसतिगृहातल्या पोरांना घेऊन विहीर खुदाई कामावर जावे." 


लग्न झाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच हळदीच्या अंगाने मुलांना घेऊन ते कामावर गेले. काम खूपच होते. लवकर उरकणारे नव्हते. दुपारी जेवणा करिता घरी जायला मिळणार नाही. म्हणून, त्यांनी जेवणाचा डबा मागवून घेतला. कर्मवीर झाडाखाली बसले होते. जे. बी. पाटील कामावर होते. 


कालच लग्न झालेलं आहे. तेव्हा डब्यात लाडू, करंज्या, पोळया असतील, म्हणून कर्मवीरांनी पाटलांचा डबा उघडला. त्यात भाजी-भाकरी होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवसाचे हे पक्वान्न होते. ही बाब कर्मवीरांना खटकली. नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी जे. बी. पाटील यांचं घर गाठलं.


घरी सारा खडखडाट होता. काहीही नव्हते. अन्न-धान्य भरलेले नव्हते, भांडी-कुंडी नव्हती. हे सारे पाहून कर्मवीर सद्गदित झाले व म्हणाले, "काय पोरं आहेत ही ! लेकानं लगीन करून घेतलंय आणि घरात तर कशाचाच पत्ता नाही."


तत्कालीन परिस्थिती फारच वेगळी होती. वेळच्या वेळी पगार होत नसत. अनुदान सहा महिन्यांनी मिळे. मग पगार होत असे. दिवाळीसारख्या सणाला देखील कधी-कधी पगार नसे. परगावच्या शिक्षकांना हात हलवतच घरी जावे लागे. जर का अनुदान आलेच व शाळेच्या इमारतीसारखे बांधकाम चालू असेल तर मग पुन्हा पगार लांबे. असे असूनही सारे रयतसेवक सेवाभावी वृत्तीने काम करीत असत.


अनुदान मिळाले नसल्याने, पगार लांबल्याचे कर्मवीरांना समजले. त्यामुळेच जे. बी. पाटलांच्या घरात खडखडाट असल्याचे लक्षात आले. 


कर्मवीर थेट संस्थेच्या कार्यालयात गेले.

जे. बी. पाटलांच्या नावावर उसनवार पैसे घेतले व संसाराला लागणारे सर्व साहित्य भरण्याची व्यवस्था केली. 


रात्री जे. बी. पाटील घरी आले, तेव्हा घर साऱ्या साहित्याने भरलेले पाहिले. "कर्मवीर येऊन गेले." हे पाटलांच्या पत्नीने सांगितले. तेव्हा पाटलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.


कर्मवीरांनी प्रत्येक रयत सेवकाशी वडिलकीचं नातं जपलं. रयत शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष रयत सेवकांच्या जीवावर उभा आहे. संस्थेच्या पडत्या काळात याच रयतसेवकांनी अनंत यातना सहन करून, संस्थेची कमान सतत उंचावत ठेवली आहे. संस्थेसाठी रयतसेवक इतक्यात तळमळीने का राबतात? याचं उत्तर वरील प्रसंगावरून लक्षात येते. 


कर्मवीर जसे गोरगरिबांच्या मुलांसाठी पितृतुल्य होते तसेच ते रयत सेवकांसाठीही होते. या पितृतुल्य कर्मवीरांच्या दुधगांव येथील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही 3 ते 4 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. तरी या पोस्ट च्या माध्यमातून आपणांस नम्र विनंती आहे की, आपण "फूल न फुलाची पाकळी देऊन" या कार्यास हातभार लावावा.


कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!!!




No comments: