Sunday, April 23, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 22 मुलांच्या सुख-दुःखात समरस होणारे कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 22 मुलांच्या सुख-दुःखात समरस होणारे कर्मवीर 

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.




कर्मवीरांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणा देऊन जातात. या प्रसंगातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडते. असाच एक प्रसंग आज मांडतोय.


भारती विद्यापीठाचे माजी सहसचिव दे. मु. महादार हे रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थी. पुढे शिकून त्यांनी व्हॉलंटरी शाळेत सुपरवायझर म्हणून चांगले काम केले. 


वसतिगृहातील जेवण म्हणजे काही सांगायलाच नको. कच्चा भात, पाण्याची आमटी अन् डागाळलेली भाकरी.


असेच एकावेळी कर्मवीर अचानक वसतिगृहात आले. मुलांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. ते जेवायला मुलांच्या पंगतीत बसले. वाढण्याचे काम महादारांकडे होते. 


त्यावेळी महादार 13-14 वर्षांचे विद्यार्थी होते. कर्मवीरांना वाढण्याकरिता चांगली भाकरी सापडेना. साऱ्या डागाळलेल्या भाकऱ्या. हे कर्मवीरांच्या लक्षात आले. ते म्हणाले, "हाताला येईल ती भाकरी वाढ. ती मी खाईन. स्वनिर्मितीचा आनंद वेगळाच असतो." असे म्हणून कर्मवीरांनी मुलांबरोबर आनंदाने जेवण केले. मुलांच्या सुख-दुःखात समरस होणारे कर्मवीर एक निराळेच व्यक्तिमत्व.





धन्यवाद...!

No comments: