Saturday, April 1, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र. 19 पारदर्शी व्यवहाराचे प्रतीक कर्मवीर

पारदर्शी व्यवहाराचे प्रतीक कर्मवीर


🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 19 पारदर्शी व्यवहाराचे प्रतीक कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.




कर्मवीरांना संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यानी शेवरलेट गाडी भेट दिलेली होती. उद्धव कामटे हा गाडीचा ड्रायव्हर होता. एकदा परगावाहून घरी येताना कर्मवीरांनी उद्भवला विचारले, “उद्धव, तू तुझ्या मुलाकरिता काही खाऊ घेतला नाहीस ? "


यावर उद्धव म्हणाला, “अण्णा, तुम्ही तुमच्या नातवंडाकरिता काही घेतले नाही. माझ्या मुलाचीच तुम्ही काळजी करता. मग मी कसा खाऊ घेणार ?"


यावर कर्मवीर म्हणाले, “अरे, तुला महिन्याला पगार मिळतो, तसाच फिरती भत्ता मिळतो. त्यातून तू खर्च करू शकतोस. तुझ्यासारखा मला काही पगार नाही. मी कशातून खर्च करणार ? संस्थेचा पैसा मी खर्च करू शकत नाही. ज्या दिवशी मी संस्थेच्या पैशामध्ये मन दाखवीन, त्या दिवशी माझ्या संस्थेला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागेल. कर्ता पुरुषच जर असं वागू लागला, तर इतरांना आवर घालता येणार नाही." 


कर्मवीरांचे हे विचार ऐकून ड्रायव्हर अक्षरशः नतमस्तक झाला. 


खरंतर हा प्रसंग अतिशय छोटा आहे. परंतु, या छोट्याशा प्रसंगातून कर्मवीरांचे प्रामाणिक, पारदर्शी व्यवहार, प्रगल्भ विचार आणि त्यांना मिळालेल्या यशाचे सार दडलेले दिसून येते. 


"रयत" केवळ एक शिक्षण संस्था नसून, तो एक विचार आहे. ते कर्मवीरांच्या विचारांचे मूर्त स्वरूप आहे. 


कर्मवीरांचे हेच विचार आदर्श मानून दुधगांव येथील कर्मवीर पुतळा सुशोभीकरण समिती कार्य करीत आहे. दर आठवड्याला सुशोभीकरण समितीचे प्रमुख जमा-खर्च मांडतात. आजवर पुतळा सुशोभीकरणासाठी तब्बल 11 लक्ष रुपये इतका निधी जमा झाला आहे. अजूनही 5 लक्ष रुपये निधी आवश्यक आहे. जमा झालेल्या निधीचा अगदी विचारपूर्वक आणि काटेकोरपणे विनियोग केला जात आहे. 


9 मे म्हणजे कर्मवीरांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनी कर्मवीर पुतळा सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शिल्लक राहिलेला अवधी फारच कमी आहे आणि मोठा निधी जमा करावयाचा आहे. या लेखाच्या निमित्ताने मी आपणांस विनंती करतो की, आपण या पुतळा सुशोभीकरण कार्यास कार्यास "फूल ना फुलाची पाकळी" देऊन सहकार्य करावे. 


कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!!!


No comments: