Tuesday, January 1, 2019

यशवंत च्या निमित्ताने



🎯 यशवंत च्या निमित्ताने 

नूतनवर्षाभिनंदन  2019.


1 जानेवारी 2018 हा दिवस माझ्या जीवनातील काही महत्त्वाच्या दिवसांपैकी एक. कारण, या दिवशी मी एका नव्या दिशेने, एक नवे पाऊल टाकले. कधीकधी मी कविता लिहायचो. नाही म्हणायला दोन-तीन कथा लिहल्या होत्या.पण, हे लेखन केवळ माझ्यापुरतेच मर्यादित होते. *यशवंत* हे माझ्या जीवनातील केवळ माझ्यापुरतं मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचलेलं पहिलं लेखन.



_परिस्थितीवर मात करणाऱ्या आणि आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशवंताचा हा प्रवास शंभर पर्यंत येऊन पोहोचला. पहिल्या पर्वातील 8–10 भाग लिहून झाल्यावर मला विश्वास वाटू लागला की,  *‘येत्या वर्षात आपण 100 पर्यंत नक्की मजल मारू.’* वेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रिया,मला प्रोत्साहन द्यायच्या. यामुळेच माझ्या विश्वासाला बळ मिळाले._



_*यशवंत* च्या या प्रवासात अनेक नवे मित्र जोडले गेले. काही जुन्या पण संपर्कात नसलेल्या मित्रांचीही भेट याच निमित्ताने झाली. श्री माणिक नागरगोजे सर, गंगाखेड आणि श्री लक्ष्मणभाऊ उगलमुगले सर, नगर यांची प्रत्यक्ष भेट या निमित्ताने झाली. हे या प्रवासाचेच एक साध्य. *यशवंत* च्या निमित्ताने माझी स्वतःची, स्वतःला नव्याने ओळख झाली. माझ्या व्यक्तिमत्त्वातील या नव्या पैलूचा शोध याच निमित्ताने लागला._



_*“यशवंत केवळ प्रेरणेचा झरा न राहता ते संस्कारांचा मोती ठरतो आहे. अनेक शाळांत परिपाठात याचे वाचन मुलांसमोर केले जात आहे.”*_  या फोन वरील प्रतिक्रिया ऐकल्यावर मन भरून येतं. 



*कधीकाळी संदिप पाटील हे दुधगाव(जि.सांगली), मनोर(जि.पालघर) आणि पाटण(जि.सातारा) पुरतेच मर्यादित असलेले नाव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहचलेच, शिवाय ते शेजारील राज्यातही पोहचले. विशेष करून बेळगाव. सीमाभागातील अनेक मराठी वाचक बांधवांनी माझ्या लेखनाचे कौतुक केले. त्यामुळे लेखनाला गती मिळाली.* 

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
*काही निवडक प्रतिक्रिया*

🎯 _“यशवंत मुळे प्रेरणा मिळते. एक दिवस आम्ही ही येऊ आपल्या यशवंत च्या पानावर”  यशवंत मुळे जिच्यात हा आत्मविश्वास निर्माण झाला, त्या  *निकिता वाघ सातारा* ची ही बोलकी प्रतिक्रिया._
०००००००००००००००००००००००

🎯 _विचारांची प्रगल्भता यांच्या डोक्यात खच्चून भरलेली आहे .कल्पना शक्तीचा, विचार शक्तीचा तो महामेरू आहे.आणि आपण समाजाचे काही तरी देणेकरी आहोत ही भावना सतत मनात ठेवणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व.आणी काही तरी नवीनात नाविन्य शोधणारे विचारप्रवर्तक. असे ज्यांचे  व्यक्तिमत्त्व आहे त्यांना मानाचा मुजरा. व भविष्यातील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.– *भगवान यशवंत पेखले पाटील,कल्याण जि.ठाणे*_
०००००००००००००००००००००००

🎯 _आपला प्रत्येक लेख, वाचकाला खिळवून टाकणारा असतो..वाचनास सुरुवात केली की, शेवटपर्यंत वाचावयास भाग पाडणारा असतो..अर्थात उत्कंठावर्धक..असे लेखन सामर्थ्य दुर्मिळ असते.. श्री प्रकाश गुदळे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ब्लॉग सुरु करण्याबाबत चा विचार अनेक दिवस मनात घोळत होता. वर्षाखेरीस तोही पूर्णत्वास आला. 32 फॉलोअर्स आणि 6250 भेटीचा टप्पा अल्पावधीतच पूर्ण झाला आहे. अनेक वाचक बांधवांनी पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना केली आहे. लवकरच ते ही पूर्णत्वास येईल. अशी आशा आहे.


यशवंत चे 100 भाग पूर्ण होण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा कोणाचा असेल? तर तो यशवंत वर मनापासून प्रेम करणाऱ्या हजारो वाचक मित्रांचा आहे. माझे लेखन सर्वदूर पोहचविण्यात ज्यांनी हातभार लावला त्या ज्ञातअज्ञात मित्रां चा मी शतशः आभारी आहे. यामध्ये प्रामुख्याने माझे वर्गमित्र श्री. अविनाश कर्पे देऊर सातारा, श्री. एम पी पाटील,श्री राहुल कोळी,श्री पांडुरंग पोळ तासगाव, श्री. परवेज तांबोळी मंचर, कविवर्य श्री सिद्धेश्वर गुळवे सर मनोर, श्री.विद्यासागर पाटील,रविकांत कोळी दुधगाव, महाराष्ट्राचे सूत्रसंचालक ग्रुप चे प्रशासक श्री माणिक नागरगोजे सर गंगाखेड, आपुलकी वाचन कट्ट्याचे समूह प्रशासक श्री लक्ष्मीकांत सोरटे, श्री चंद्रकांत क्षीरसागर सांगली .आपले खुप खुप आभार. या सोबतच अनेक अज्ञात समूह प्रशासकांनी माझे लेखन आपल्या ग्रुपवर प्रसारित केले. त्याबद्दल मी आपलाही आभारी आहे.


2018  या वर्षातील आपल्या सोबतचा प्रवास 2019 मध्येही कायम राहील. नव्या वर्षात नवे यशवंत आणि त्यांचा संघर्ष आणि त्यातून मिळणारी प्रेरणा, खास आपल्या भेटीला नक्की घेवून लवकरच येईन. याची मी आपणांस खात्री देतो. आणि इथंच थांबतो.

धन्यवाद.


आपलाच,
श्री. संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.


No comments: