Saturday, January 7, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र.7 रयत शिक्षण संस्थेची स्थापना

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र.7 - रयत शिक्षण संस्थेची स्थापना.

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.







दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. आपणांस तो नक्की आवडेल. अशी आशा आहे. 

दुधगांव, काले, नेर्ले ही तत्कालीन सत्यशोधक चळवळीची केंद्रे. ही सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची गावं. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं, सत्याग्रहं कर्मवीरांनी केली. 

"आपण सत्यशोधक समाजाचे विचार, त्यांची भाषणे आणि त्यांचे जलसे यांतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत; परंतु आपल्या विचारांप्रमाणे जनतेमध्ये सुधारणा होत असल्याचे मला तरी दिसत नाही. शिक्षणप्रसाराशिवाय यावर परिणामकारक तोडगाही मला दिसत नाही; म्हणून बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी, एक शिक्षणसंस्था स्थापन करणे आवश्यक आहे." 

5 सप्टेंबर 1919 रोजी काले येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या भव्य परिषदेमध्ये कर्मवीरांनी वरील विचार मांडले. कर्मवीरांचे हे विचार परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी उचलून धरले. 

याच परिषदेत संस्था स्थापनेचा ठराव झाला. संस्थेला नाव काय द्यायचे ? यावर परिषदेत बरीच चर्चा झाली. 'रयत शिक्षण संस्था' असे नाव कर्मवीरांनी सुचवले. सर्वानुमते हे नाव नक्की झाले. 

4 ऑक्टोंबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना झाली. 

खरंतर एखादी संस्था स्थापन करणं, खूप सोपं. परंतु, ती संस्था चालवणं, महाकठीण काम. संस्था चालण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. तसेच, मोठा त्यागही करावा लागतो. संस्थेची स्थापना झाली, त्यावेळी कर्मवीर किर्लोस्कर कंपनी कामाला होते. संस्थेच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ स्वतःला संस्थेच्या कामाला वाहून घेतले.

कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. म्हणून, आज महाराष्ट्रातील बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दुधगांव मधील पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. अनेक ग्रामस्थ या निमित्ताने देणगीसाठी पुढे आले आहेत. ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाने या महान कार्यात सहभागी व्हावे. ही विनंती. देणगी देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!!!



No comments: