Saturday, December 31, 2022

असा हा कर्मवीर - कथा क्र. 6 - उपकाराची जाण

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असा हा कर्मवीर - कथा क्र.6 - उपकाराची जाण
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.






दुधगांव ता. मिरज येथे कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. यानिमित्ताने संपूर्ण गाव एकवटला आहे. देणगी गोळा केली जात आहे. विविध बैठकांच्या माध्यामातून कर्मवीर आण्णांच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. यानिमित्ताने दर रविवारी आण्णांच्या जीवनातील कथा, प्रसंग, घटना "असा हा कर्मवीर" या सदराखाली "यशवंत - एक प्रेरणास्रोत" या माझ्या ब्लॉग वर प्रसारित करत आहे. आपणांस तो नक्की आवडेल. अशी आशा आहे. 

डांबर प्रकरणात कर्मवीरांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष द्यावी. यासाठी कोल्हापूर संस्थानच्या पोलिसांनी कर्मवीरांवर दबाव वाढवला. पण बाणेदार स्वभावाच्या कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्यास नकार दिला. यामुळे पोलिसांनी कर्मवीरांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. हंटरने फोडून काढू लागले. पण, कर्मवीरांनी निर्णय बदला नाही. खोटी साक्षी देण्याऐवजी मरण पत्करणे. त्यांना सुसह्य वाटू लागले. म्हणून, त्यांनी विहिरीत उडून उडी मारली, काचा खाल्ल्या, रॉकेल प्याले असे प्रकार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. 

याच दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी रावबहादूर पागे नावाच्या एका उच्च पोलीस अधिकाऱ्याला केंद्र सरकारने दिल्लीहून पाठवले. पूर्वी त्याने साताऱ्यात काम केले होते. त्यामुळे त्याला अनुभव होता.

गणपत मांग नावाचा एक माणूस पोलिसांचा खबऱ्या म्हणून, काम करायचा. तो पागेच्या ओळखीचा होता. पागेंनी आल्या-आल्या त्याला बोलावून घेतले. कर्मवीरांना अडकवता येईल, अशी काहीतरी साक्ष तो देईल. अशी पागेची अटकळ होती. पण, प्रत्यक्षात काहीतरी अगदी वेगळेच घडले. 

"हेच पाटील मास्तर आमच्या मांगवाड्यात येऊन आमच्या मुलांना लिहायला वाचायला शिकवतात. तेही फुकट. आमच्या जमातीची हे सेवा करतात. अशा माणसाविरुद्ध मी कधीही साक्ष देणार नाही. तुम्ही माझी मान कापलीत तरी चालेल. पण, हे पाप मी करणार नाही." कर्मवीरांना पाहताच गणपतने त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडत-रडत सांगत राहिला. गणपतच्या मुलालाही साताऱ्यातील शिकवणीच्या दिवसांत कर्मवीरांनी फुकट शिकवले होते आणि ही गोष्ट गणपत विसरला नव्हता. 

हे दृश्य पाहून स्वतः पागे आश्चर्याने थक्कच झाला. या प्रकरणात कर्मवीर निर्दोष आहेत. याची त्याला खात्री पटली आणि तसा अहवाल त्याने सरकारला दिला. 

कर्मवीरांनी ज्यांना मदत केली होती, असे अनेक गोरगरीब भविष्यातही कर्मवीरांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. 

आज पुतळा सुशोभीकरणाच्या निमित्ताने दुधगावमधील समस्त नागरिकांना कर्मवीरांच्या अनंत उपकारातून उतराई होण्याची संधी लाभली आहे. पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. अनेक ग्रामस्थ या निमित्ताने देणगीसाठी पुढे आले आहेत. आपणही या महान कार्यात सहभागी होऊया. देणगी देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.
शाखा-दुधगाव
ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219

*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41

धन्यवाद...!!!

No comments: