Saturday, February 25, 2023

कथा क्र. 14 मातृहृदयी कर्मवीर

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 14 मातृहृदयी कर्मवीर 

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.







कर्मवीरांनी अनेक शाळा, वसतिगृहांची स्थापना केली. यामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अतिशय आपुलकीने काळजी घेतली. त्यांना काय हवं ? काय नको? पाहिलं. आई-वडिलांपासून दूर असणाऱ्या या मुलांना कर्मवीरांनी आपल्या मायेच्या पंखांखाली घेतलं. त्यांना मायेची उब दिली. कर्मवीरांच्या या प्रेमाने मुलंही भारावून जायची. त्यांना आई वडिलांची उणीव जाणवायची नाही. असे अनेक प्रसंग सांगता येतील. कर्मवीरांच्या य स्वभावाची आजची ही कथा. मातृहृदयी कर्मवीर  


एकदा कर्मवीर विद्यार्थ्यांचे श्रमदान कसे चालले आहे ? याची पाहणी करण्यासाठी एकेठिकाणी गेले. तिथे एक विद्यार्थी अतिशय मन लावून काम करताना त्यांनी बघितला. त्यांनी कौतुकाने त्याला जवळ बोलावले आणि शाबासकी दिली. त्यावेळी त्याच्या हातांवर आलेले फोड कर्मवीरांना दिसले.


ते बघताच कर्मवीरांचे मन कळवळले. "अरेऽ अशा परिस्थितीतही तू काम कसं करतोस?" असे म्हणत त्यांनी त्या मुलाला पोटाशी ओढून घेतले. त्याचे ते फोड आलेले दोन्ही हात त्यांनी स्वतःच्या गालांवर ठेवले आणि लगेच दुसऱ्या एका विद्यार्थ्याला बोलावून त्यांनी त्या मुलाला वैद्याकडे इलाज करून घेण्यासाठी पाठवले.

हा मुलगा म्हणजे डी. एस. उर्फ दादासाहेब जगताप. जे पुढे महाराष्ट्र सरकारात मंत्रीही झाले. आपल्या विद्यार्थ्यांकडे आईच्या मायेने बघणारी व्यक्तीच हे सारे करू शकते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर कर्मवीर मातृहृदयी होते.

अशा या मातृहृदयी कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण दुधगांव, ता. मिरज येथे सुरू आहे. या कार्यात आपण आर्थिक अथवा वस्तूरुपाने देणगी देऊन, सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा. हीच एक नम्र विनंती. धन्यवाद..!!!

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!!!

No comments: