🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 17 हू इज धिस भाऊराव पाटील
🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.
नुकतंच "हू इज धंगेकर" या डायलॉगची प्रचंड चर्चा झाली. असाच एक किस्सा कर्मवीरांच्या जीवनात घडला. त्या प्रसंगाची ही कथा "हू इज धिस भाऊराव पाटील"
एकदा सर चुनिलाल मेहता हे नव्याने निवडून आलेले मिनिस्टर साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार होते. ही माहिती तहसीलदार रावबहादूर दुधुस्करांनी कर्मवीरांना सांगितली. "आपल्या कार्याची माहिती मंत्रिमहोदयांना व्हावी." असे कर्मवीरांना मनोमन वाटले.
कर्मवीर सल्ल्याकरिता पुण्यास प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे गेले. मंत्रिमहोदयांना भेटून संस्थेची माहिती देण्यासंदर्भात दोघांची चर्चा झाली.
मंत्रिमहोदयांना नुसते हात जोडून भेटण्यापेक्षा आपल्या कार्याची ठळक माहिती छापून त्यांच्याकडे ते इकडे येण्यापूर्वी पाठवणे. बरे होईल म्हणजे आयत्या वेळी फक्त नाव घेतलं की काम होईल.
प्रबोधकारांनी लोकहितवादी साप्ताहिकात कर्मवीरांच्या कार्याची माहिती इंग्रजी दोन पानांत छापून प्रसिद्ध केली व त्याच्या प्रती गव्हर्नरांपासून सातारा-पुणे जिल्हयाच्या कलेक्टरांपर्यंत पाठवून दिल्या. मंत्री मेहतांकडे रजिस्टर पोस्टाने प्रती पाठवल्या. याचा परिणाम असा झाला, की साताऱ्यातील सत्काराच्या धामधुमीत असतानाही मंत्री महोदयांनी विचारले, "हू इज घिस भाऊराव पाटील अँड व्हेअर इज हिज बोडिंग ?"
"कोण आहे तो भाऊराव पाटील नि कुठे आहे त्याचे बोडिंग ?" यावर एका उपस्थिताने, "महत्त्व देण्यासारखे त्यात काही नाही." असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण, तिथे रावबहादूर काळे होते. त्यांनी त्याला तडकावले. ते म्हणाले, "आज तो चिमुकला ओढा आहे. उद्या त्याची विशाल गंगा होईल."
कर्मवीर त्यावेळी तिथे नव्हते. नंतर कोरेगाव मुक्कामी कर्मवीर व ठाकरे मंत्रिमहोदयांना भेटले. मेहतांनी स्वतः होऊन चौकशी केली व म्हणाले, "मी सर्व माहिती लोकहितवादी साप्ताहिकात वाचली आहे. तुमची योजना सरकारमान्य व्हायला योग्य अशी आहे."
खरंतर नाव मोठं होण्यासाठी, मोठं काम उभारावं लागतं. काम मोठं झालं की, नाव आपोआप मोठं होतं. कर्मवीरांच्या बाबतीत असेच काहीसं घडलं आहे.
दुधगांव येथील कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. याकामी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तरी या पोस्ट च्या माध्यमातून आपणांस नम्र विनंती आहे की, आपण "फूल न फुलाची पाकळी देऊन" या कार्यास हातभार लावावा.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.
शाखा-दुधगाव
ACCOUNT HOLDER NAME:
KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON
IFSCCODE:
ICIC0000104
ACCOUNT NO:
KBNP33UV3RH52219
*संपर्क*
श्री. दिपक अथने - 8857 03 61 08
श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76
श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41
धन्यवाद...!!!
No comments:
Post a Comment