Saturday, March 11, 2023

असे हे कर्मवीर - कथा क्र.16 रयतसेवक कर्मवीर

 🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 असे हे कर्मवीर - कथा क्र. 16 रयतसेवक कर्मवीर

🎯 श्री. संदिप पाटील, दुधगांव. 9096320023.


कर्मवीरांची राहणी अत्यंत साधी होती. या राहणीमुळे त्यांच्यावर लोकांचा लगेच विश्वास बसायचा. लोकांना ते आपल्यातलेच एक वाटायचे. 


खादीचे चार नेहरू सदरे, चार धोतरे आणि तीन पंचे एवढेच कपडे त्यांच्यापाशी असत. खांद्यावर एक घोंगडी असे, जी ते रात्री झोपताना पांघरूण म्हणून आणि पावसाळ्यात रेनकोट म्हणून वापरायचे. 


वहाणा नसल्याने पायाला आणि केस नसल्याने डोक्याला ऊन, वारा आणि पाऊस याचा प्रचंड मारा व्हायचा. तरीही ते थांबत नव्हते. 


कर्मवीरांनी पत्नी लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ एक फंड तयार केला होता. त्यातून गरीब विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जात असे. याच फंडातून ते स्वतःच्या खर्चासाठी दरमहा साठ रुपये घेत आणि त्यातच सर्व खर्च भागवत. एकाअर्थी कर्मवीरांच्या वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नव्हता. 


साधी सही करतानाही ते कधी "भाऊराव पाटील" म्हणून सही करत किंवा कधी नुसतेच 'भाऊ पाटील' म्हणून सही करत. भाऊच्या पुढे "राव" लिहिताना म्हणत, "यामध्येही 'मी' पणा वाटतो." 


सहीच्या खाली "रयतसेवक" लिहायला ते विसरत नसत. "संस्थापक, रयत शिक्षण संस्था" असं त्यांनी कधीही लिहिलं नाही.


इतक्या मोठ्या बलाढ्य अशा रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक असलेल्या कर्मवीरांनी जीवन जगताना साधेपणा जपला. हा साधेपणाचं त्यांच्या विशाल कर्तुत्वाचा दागिना आहे.


कर्मवीरांच्या संस्थेत शिक्षण घेऊन अनेकांनी शिक्षण संस्था काढल्या. या संस्थापकांना "साहेब" म्हणून घेण्यात अतिशय मोठेपणा वाटतो. पण, कर्मवीरांचा साधेपणा हाच त्यांचा मोठेपणा होता. हे बाब अधोरेखित करण्याजोगी आहे. 


रयतसेवक कर्मवीरांच्या दुधगांव येथील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. याकामी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तरी या पोस्ट च्या माध्यमातून आपणांस नम्र विनंती आहे की, आपण "फूल न फुलाची पाकळी देऊन" या कार्यास हातभार लावावा.


कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली.

शाखा-दुधगाव

ACCOUNT HOLDER NAME:

KARMVEER PUTALA SUSHOBHIKARAN SAMITI DUDHGAON

IFSCCODE:

ICIC0000104

ACCOUNT NO:

KBNP33UV3RH52219


*संपर्क*

श्री. दिपक अथने - 8857 03 61 08

श्री. कैलास आवटी - 9595 23 76 76

श्री. तेजकुमार कोले - 9403 23 04 41


धन्यवाद...!!!







No comments: