Sunday, September 24, 2023

कर्मयोगी सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने

कर्मयोगी सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने 



बागणी येथील 'युवक संघटना गणेश मंडळ' यांचे वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा "कर्मयोगी सन्मान पुरस्कार" दिनांक 23/09/2023 रोजी आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ. तृप्तीताई हवलदार, मंडळाचे मार्गदर्शक आणि विद्यमान उपसरपंच श्री. संतोषजी घनवट यांचे हस्ते सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. "शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र" असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी युवा व्याख्याते श्री. संदिप कुडचीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


बागणी गावात कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी कोणताही प्रस्ताव मंडळ मागवत नाही. पुरस्काराचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. 


दिनांक 7 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हा परिषद शाळा बागणी नं.2 येथे आंतरजिल्हा बदलीने हजर झालो. गेल्या तीन वर्षांत शाळेत केलेल्या शैक्षणिक कामगिरीबद्दल आणि राबविलेल्या अनेकविध उपक्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. 


कर्मभूमीत मिळालेल्या पुरस्काराने माझा आनंद द्विगुणित तर झालाच शिवाय मिळणाऱ्या प्रेरणेतून कामाची गती निश्चितच वाढेल.


"कर्मयोगी सन्मान पुरस्कार" हा सन्मान केवळ माझा एकट्याचा नाही तर, माझ्या जिल्हा परिषद शाळा बागणी नं. 2 मधील माझ्या आजी-माजी मुख्याध्यापकांचा, सर्व शिक्षक बंधू-भगिनींचा आणि विद्यार्थिनींनीचा आहे. 


पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. खरंतर माझा आजवरचा प्रवास हा 'हितचिंतकांनी' दिलेल्या शुभेच्छांमुळेच सुकर झालेला आहे. त्यामुळे शुभेच्छांचे, आशीर्वादांचे अनन्य साधारण महत्व मी जाणतो.


_माझ्या हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी खूप खूप आभार आहे. भावी वाटचालीसाठी या शुभेच्छा सदैव पाठीशी रहाव्यात. हीच अपेक्षा._


"कर्मयोगी सन्मान पुरस्कार" पुरस्कारासाठी माझी निवड केलेबद्दल 'युवक संघटना गणेश मंडळ, बागणी' चे श्री. संजय पवार मेहेरबान, अध्यक्ष श्री. महादेव कुंभार, उपाध्यक्ष श्री. सुनिल गायकवाड, सचिव श्री. संदीप सावंत, खजिनदार श्री. किरण गायकवाड आणि मंडळाच्या असंख्य सभासदांचे मनःपूर्वक आभार...!



धन्यवाद...!

No comments: