🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 216*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/216.html
"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"
दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/216.html
भारतीय महिलांवर पूर्वापार असणारी बंधने आपणा सर्वांना ज्ञात आहेतच. केवळ "चूल अन् मूल" इतकंच त्यांचं जीवन मर्यादित होतं. अशा या आव्हानात्मक काळात एका मुस्लिम महिलेने पुरुषांना आव्हानं दिली. केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. त्या मुस्लिम महिलेने केवळ स्वतःला सिद्ध केले नाही, तर भारतीय महिलांची ताकद देखील दाखवून दिली. त्या "अलीगढची ॲमेझॉन" ची चा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.
ही कथा आहे, 1920 - 30 च्या दशकातील. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरात तिचा जन्म झाला.
लहानपणापासूनच तिला कुस्तीची फार आवड होती. पण , तिला कुस्ती कोणी शिकवत नव्हतं. कारण, ती अशा काळात जन्माला आली होती, ज्या काळात सर्वच जाती धर्मातील महिलांवर अनंत बंधने होती. पण, तरीही अलीगढ येथील सलाम नावाच्या एका कुस्ती प्रशिक्षकाने तिला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली.
हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कुस्तीचे धडे गिरवले. खरंतर प्रशिक्षण फारच आव्हानात्मक होते. कारण, त्या काळात कुस्तीचे प्रशिक्षण घेणारी, ती एकमेव महिला होती. त्यामुळे तिला पुरुषांबरोबरच व्यायाम करावा लागे. शिवाय, त्यांच्याबरोबरच कुस्तीचा सराव देखील करावा लागे.
ज्यावेळी आपण एखादे वेगळे पाऊल टाकतो, त्यावेळी समाज आपल्याकडे तुच्छ नजरेने बघतो. टिका करतो, टिंगल करतो. मानसिक खच्चीकरण करतो. इतकंच काय जीव नको-नको करून टाकतो. या साऱ्या परिस्थितीला तिला तोड द्यावे लागले. पण, तरीही तिने कुस्ती शिकणे थांबवले नाही.
तिने व्यावसायिक कुस्ती करण्यास सुरुवात केली. त्या काळात ती एकमेव महिला पैलवान होती. त्यामुळे तिने कुस्ती कोणाशी खेळायची ? हाच प्रश्न होता. अशा परिस्थितीत तिने पुरुष पैलवानांना आव्हान देण्यास सुरुवात केली.
'जो मला कुस्तीत पराभूत करेल, मी त्याच्याशी लग्न करेल.' असे तिने जाहीर केले. पण, अनेक पैलवानांनी प्रतिष्ठेमुळे आणि लाजेखातर तिच्याशी कुस्ती करण्यास नकार दिला. काही पैलवानांनी तिच्याशी कुस्ती करण्यास तयारी दर्शवली. पण, ते तिला जिंकू शकले नाहीत. तिची तुलना अमेरिकेच्या प्रसिद्ध कुस्तीपटू अमेझॉन बरोबर होऊ लागली आणि आणि तिला "अलीगढची ॲमेझॉन" म्हणून ओळखले जाऊ लागले. ती "अलीगढची ॲमेझॉन" म्हणजेच हमीदा बानो होय.
हमीदा यांनी देशभरात तब्बल साडेतीनशेहून अधिक कुस्त्या केल्या. त्या सर्वच्या सर्व जिंकल्या आहेत.
जगापेक्षा वेगळा विचार करणारी लोकं विशेषतः महिला समाजाच्या हेटाळणीचा विषय बनतात. समाज त्यांना नाव ठेवतो, निंदा करतो, बदनाम करतो, टोमणे मारतो, अपमान करतो. त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण, या सर्व अडचणींना पुरून उरणाऱ्या व्यक्तीच समाजापुढे आदर्श निर्माण करू शकतात. हमिदा बानो अनंत अडचणींना सामोरे जाऊन, कुस्ती क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाच्या बळावरच त्या भारतातील पहिल्या महिला पैलवान बनल्या आहेत. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.
वर्धमान महावीर यांची आज जयंती. या निमित्ताने विनम्र अभिवादन...!
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/215.html
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment