एक 65 वर्षे वयाचा वृद्ध आत्महत्या करण्याचा विचारात एका झाडाखाली बसला होता. आजवर त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या होत्या. निराश, हताश झालेल्या त्या वृद्धाने आजवरच्या आपल्या आयुष्यावर, आलेल्या अडचणींवर प्रकाश टाकला आणि त्याला एक शोध लागला. त्या शोधानं त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्या वृद्धाला नेमका कोणता शोध लागला? त्याचं आयुष्य कसं बदललं? तो वृद्ध कोण? जाणून घेऊ आजच्या भागात...
वयाच्या पाचव्या वर्षी त्याने आपल्या वडिलांना गमावलं.
सोळाव्या वर्षी त्याला शाळा सोडावी लागली.
सतराव्या वर्षी त्याला तब्बल चार ठिकाणच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
अठराव्या वर्षी त्याचं लग्न झालं. एकोणिसाव्या वर्षी तो बाप झाला आणि विसाव्या वर्षी त्याची बायको मुलीला सोबत घेऊन त्याला सोडून निघून गेली.
कंडक्टर बनला. चार वर्षात नोकरी सुटली.
आर्मीत भरती झाला. तेथून त्याला कमी करण्यात आले.
LOW कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी गेला, मिळालं नाही.
विम्याचे काम सुरू केले. पण,तिथेही अपयश.
एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केलं आणि 65 व्या वर्षी निवृत्त झाला.
आयुष्यातील 1009 वेळा आलेल्या अपयशाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात आला. पण, त्याच्या हेही लक्षात आले की, आपण आपल्या जीवनात अजून बरंच काही करू शकतो. याच विचाराने त्याला काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या 65 व्या वर्षी त्याला आपल्यातल्या ' बेस्ट ' चा शोध लागला आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. चिकन फ्राय करून तो गल्लोगल्ली विकू लागला. त्याने बनविलेल्या चिकन चा एक ब्रँड तयार झाला. तो प्रसिद्ध चिकन ब्रँड म्हणजे केंटकी फ्राईड चिकन अर्थात KFC आणि त्याचा निर्माता म्हणजेच कर्नल सँडर्स. वयाच्या 88 व्या वर्षी तो अब्जाधीश बनला.
एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल, की, जो पर्यंत आपल्याला आपल्यातील बेस्ट चा शोध लागत नाही. तोपर्यंत यशाचे मार्ग खुले होत नाहीत. कर्नल यांना वयाच्या 65 व्या वर्षी, 1009 वेळा अपयश आल्या नंतर, आपल्यातील ' बेस्ट ' चा शोध लागला. विशेष एका गोष्टीचे वाटते की, मरायचे तर होतंच. पण, एकदा प्रयत्न करण्याचा मार्ग कर्नल यांनी निवडला. म्हणूनच कर्नल सँडर्स एक यशवंत आहेत.
अनेक लोकं आपल्या आयुष्यातील समस्या आणि अडचणींच्या बाबतीत हळहळ व्यक्त करत असतात. कदाचित कर्नल यांनीही केली असेल. परंतु, त्यावर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक दुःख असतात. त्या उगाळत बसून, वेळ वाया घालवू नका. 'बेस्ट' शोधा आणि कामाला लागा.
No comments:
Post a Comment