Wednesday, November 14, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 37

आयुष्यात येणारे प्रसंग व्यक्तीला घडवत असतात.त्याच प्रसंगातून बोध घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या एका यशवंताची ही कथा....

एका १३ वर्षांच्या  मुलाला त्याच्या वडिलांनी जवळ बोलावले आणि एक जुना व वापरलेला कपडा देऊन विचारले की,"या कपड्याची किंमत किती असेल?"

त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला कि,''तो एक डॉलरचा असावा.'' त्यावर वडील त्याला म्हणाले कि, "काहीही करून हा कपडा बाजारात जाऊन 2 डॉलर ला विकायचा आहे."

त्या मुलाने विचार केला."काय करावे? ज्यामुळे एवढ्या जुन्या कपड्याची किंमत 2 डॉलर मिळतील." त्याने तो कपडा स्वच्छ धुतला आणि घरी इस्त्री नसल्यामुळे कपड्यांच्या ढिगाखाली सरळ होण्यासाठी ठेवून दिला.

दुसऱ्या दिवशी तो कपडा आधीपेक्षा जास्त चांगला दिसत होता.त्याने तो कपडा घेतला आणि घराजवळच असलेल्या रेल्वे स्टेशन जवळ 5 तासांच्या मेहनतीनंतर वडिलांनी सांगितलेल्या किमतीत विकला.त्यावर अत्यंत आनंदित होऊन त्याने ते पैसे वडिलांना दिले.

काही दिवसानंतर वडिलांनी परत पुन्हा एक तश्याच प्रकारचा कापड त्याला दिला आणि म्हणाले,"जा हा कपडा २० डॉलरला विकून ये."

यावर तो मुलगा विचारात पडला की, ''अशा कपड्याची २० डॉलर किंमत कोण देईल? परंतु वडिलांनी त्याला सांगितले कि,"जा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर."

त्यावर त्या मुलाने पुन्हा बुद्धी लढवली आणि मग त्याने शहरात जाऊन त्याने त्या कपड्याला मिकी माऊसचे स्टीकर लावले आणि अशा शाळेजवळ विकायला बसला जिथे श्रीमंत घरची मुले शिकायला येतात.

एका छोट्याशा मुलाने आपल्या वडिलांना भेट म्हणून तो कपडा विकत घेतला आणि ५ डॉलर जास्तीचे बक्षीसही दिले.

अशा प्रकारे त्याने तो 1 डॉलरचा कपडा २० डॉलरला विकला आणि 5 डॉलरचे बक्षीसही मिळविले.कपडा पूर्ण २५ डॉलरला विकल्यामुळे तो मुलगा खूप आनंदी झाला आणि ख़ुशी-खुशीत ती बातमी त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावर वडिलांनी त्याला शाबासकी दिली.

काही दिवसानंतर वडिलांनी त्याला पुन्हा तसाच एक कपडा दिला आणि सांगितले की,"जा आणि हा कपडा 200 डॉलरला विकून ये."

त्याने 2-3 दिवस सतत विचार केला.तो कपडा घेऊन शहरात गेला.त्याने पाहिले के शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आलेली होती.तिच्या सुरक्षेसाठी पोलीस तिच्या भोवती तैनात होते.

तो मुलाने कशाही प्रकारे पोलिसांचे कवच भेदून अभिनेत्री पर्यंत पोहचला आणि आतला आपल्या जवळच्या त्या कपड्यावर ऑटोग्राफ मागितले.

लहानग्या मुलाचा प्रयत्न पाहता ती अभिनेत्री त्याला नकार देऊ शकली नाही. तो कपडा घेऊन बाजारात गेला आणि कपड्यावरील ऑटोग्राफचा त्याने खूप प्रचार केला.

बरीच गर्दी जमली तेव्हा त्याने बोली लावली आणि शेवटी तो कपडा त्याच माणसाला विकला ज्याने त्याचे २००० डॉलर देऊ केले.हा मुलगा म्हणजे प्रसिध्द बास्केटबॉलपट्टू  मायकल जॉर्डन.

मायकल जॉर्डन अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातील एक झोपडपट्टीत जन्माला आला होता.पण,वरील प्रसंगातून त्याला दोन गोष्टी समजल्या होत्या.पहिली गोष्ट  प्रयत्न आणि बुद्धी यांचा योग्य वापर केल्यास कठीण गोष्ट साध्य करता येते.दुसरी गोष्ट  आपली किंमत ठरविण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच असतो.एकदा तर मायकल ला शाळेच्या टीम मधून काढून टाकण्यात आले होते.पण,निराश न होता त्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं.म्हणूनच तो एक यशवंत आहे.

परिस्थिती कशीही असली तरी त्याला आपण त्याला कशाप्रकारे सामोरे जातो यावर यश अवलंबून असतो.कपडा एकच प्रकारचा असतो.पण,त्याची किंमत कशी वाढवायची?हे आपल्यावर अवलंबून असते.समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच.समस्यांबद्दल 'व.पु' म्हणतात, "काही समस्या पैशाने सुटतात तर काही माणसांनी सुटतात,तर काही समस्या काळावर सोडून द्यावे लागतात. यापलीकडे समस्या नसतात.''




ही पोस्ट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि नावासह शेयर करा.

Please Follow My Blog.

No comments: