Thursday, November 15, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 41

एका शाळकरी मुलाच्या परीक्षेचा निकाल त्याच्या हातात पडला.त्याला F श्रेणी मिळाली होती.तो निकाल घरी दाखविल्यावर घराचे काय हाल करतील?याची त्याला पूर्ण कल्पना होती.म्हणून त्यानं डोकं चालवलं.पेन वापरून F श्रेणीचे रुपांतर B श्रेणीमध्ये केलं आणि ते घरच्यांसमोर सादर केलं. घरच्यांना त्याच्या या हुशारीची खबर लागली नाही. त्यामुळे तो बचावला. हे झालं शालेय जीवनातलं.पण,आपलं करियर घडवित असताना आलेल्या F चं रुपांतर B मध्ये करण्यासाठी त्यानं असं काय केलं?कि तो आज करोडो लोकांच्या मनावर राज्य करतोय.चला तर जाणून घेऊ प्रवास त्या "करोडो दिलों की धडकन" चा......

त्याला लहानपणापासूनच वाद्ये वाजविण्याची आवड.कधी तो गिटार वाजवायचा,तर कधी ड्रम.वाद्य वादनाबरोबरच त्याला गायनाचीही खुप आवड.तसा तो गोड गळ्याचा.वयाच्या 12 व्या वर्षी त्याच्यातील उत्तम गायकाचा शोध त्याच्या आईला लागला.तिने त्याच्या या गुणाला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं.तो घरातच गायनाचा सराव करू लागला.ना कोणती शिकवणी ना कोणता गुरु.आता तो गाणी गाण्यासाठी रेडियो स्टेशनच्या चकरा मारू लागला.पण,त्याचं वय पाहता त्याला नाकारलं जाऊ लागलं.पण,त्यानं प्रयत्न करायचे सोडले नाहीत.अंगी गुणवत्ता असेल तर यश मिळतंच.

त्याच्या आईला एक कल्पना सुचली. त्याच्या गाण्याचे विडियो रेकॉर्डिंग करून  youtube  वर प्रसारित करू लागली.अल्पावधीतच त्याची गाणी प्रसिद्धीस आली.गाण्यांबरोबर तो ही प्रसिद्धीस आला.एका कंपनी सोबत त्याचा करार झाला.त्याचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला.त्याच्या आवाजात एव्हढी जादू होती कि,अल्पावधीतच तो स्टार झाला."करोडों दिलों कि धडकन" बनला.तो गोडगळ्याचा गायक म्हणजेच जस्टीन बिबर.

वयाच्या 16 व्या वर्षी जस्टीन चा पहिला अल्बम प्रदर्शित झाला.आता तो दिवसाचे 18-18 तास काम करतोय.कारण,कमी वयात यशस्वी होण्यासाठी जेव्हढे कष्ट करावे लागतात.त्यापेक्षा अधिक कष्ट ते टिकविण्यासाठी करावे लागतात.म्हणूनच तो आज यशवंत आहे.

आपलं करियर घडवित असताना येणाऱ्या F चं रुपांतर B मध्ये करण्यासाठी म्हणजेच Failure च रुपांतर Best मध्ये करण्यासाठी एकच पेन उपयोगी पडतो.तो पेन म्हणजे कष्ट. तेंव्हा आपल्यातील ' बेस्ट ' शोधा आणि कामाला लागा. कारण, कष्टाला पर्याय नाही.




1 comment: