Friday, November 16, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 47

4 जुलै 1976 चा दिवस. अमेरिका आपला 200 वा स्थापना दिवस साजरा करत होता. सगळीकडे आनंदीआनंद होता. मुलांच्या हॉस्टेलवर फोनची घंटी वाजली. फोन एका इस्राईली तरुणासाठी  होता. तिकडून त्याला सांगण्यात आले कि, त्याचा भाऊ दहशतवादयांविरुद्ध एका मिशनमध्ये शहीद झाला आहे. त्याला ती वेदना सहन झाली नाही आणि त्याने एक पण केला. तो पण कोणता? पण करणारा तो तरुण कोण? त्याचा पण पूर्ण झाला का? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग....

1972 चा काळ. एक तरुण सैन्यात देशाची सेवा करत असताना जखमी झाला. त्या जीवघेण्या प्रसंगातून तो सहीसलामत बाहेर पडला.बमग तो तरुण सैन्यातील सेवा संपल्यावर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. 4 जुलै1976 ला भाऊ शहीद झाल्याचे त्याला समजले. त्याचे अंतिम दर्शन घेताना त्याने पण केला कि, "तुझे बलिदान वाया जाऊ देणार नाही." त्याने आपल्या भावाच्या स्मरणार्थ दहशतवादविरोधी संस्था स्थापन केली.

अमेरिकेत त्याला इस्राईलच्या राजदूत कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. 1996 साल त्याच्यासाठी एक नवी संधी घेऊन उजाडले. पंतप्रधानपदाची निवडणूक जाहीर झाली. त्याने आपली दावेदारी सिद्ध केली आणि तो इस्राईलचा सर्वात तरुण पंतप्रधान बनला. तो इस्राईलचा सर्वाधिक तरुण पंतप्रधान म्हणजेच बेंजामिन नेत्यान्याहू.

बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्राईल जगातील सर्वाधिक शक्तिशाली असणाऱ्या आठ देशांच्या यादीत समावेशीत आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरलं की, ते अधिकच घाबरवतात. त्या संकटांचा सामना केला की,ती नाहीशी होतात. खांद्याला लागलेली गोळी आणि भावाचा मृत्यू या प्रसंगांना नेत्यान्याहू घाबरले नाहीत. हाच बोध त्यांच्या प्रवासातून घेऊया.यशवंत होऊया. 

No comments: