Friday, November 16, 2018

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 48

एका परदेशी युवकाला एव्हरेस्ट शिखर सर करायचं होतं.आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्य दलात भरती व्हायचं होतं.पण,राजनैतिक कारणाने त्याला भारतीय दाखल होता आले नाही.पण,काही दिवसांतच तो ब्रिटनच्या सैन्य दलात भरती झाला.खडतर प्रशिक्षणातून जीवन जगण्यासाठी तग धरून येण्याची कला तो तिथेच शिकला.तो एका लष्करी ऑपरेशनमध्ये सहभागी झाला.पाच हजार फुटावरून एका पॅराशुट च्या सहाय्याने उडी मारताना त्याचा पॅराशुट व्यवस्थितपणे उघडलाच नाही.त्या अपघातात त्याचा पाय मोडला.डॉक्टरांनी सांगितले कि, "हा स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही.हा चालूच शकणार नाही." पुढे त्या तरुणाचे काय झाले?त्याने त्याचं स्वप्नं पूर्ण केलं का?तो तरुण कोण?जाणून घेऊ आजच्या भागात.चला तर मग...

7 जून 1974 साली जन्मलेला एक मुलगा लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि धाडसी.कराटे स्पर्धेत त्याने black बेल्ट मिळविला होता.अपघातात त्याचा पाय मोडल्याने,तो स्वतःच्या पायावर नीट उभं राहू शकणार नसल्याचे,चालू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.पण,तो प्रचंड जिद्दी होता.त्याची इच्छाशक्ती दुर्दम्य होती.त्याने एव्हरेस्टचे एक चित्र आपल्या खोलीत लावले अन तासनतास तो त्याच्याकडे पाहू लागला.आपलं स्वप्न पुन्हापुन्हा पाहू लागला.काही दिवसातच तो स्वतःच्या पायावर उभं राहू लागला,चालू लागला आणि पळू देखील लागला.वयाच्या 23 व्या वर्षी त्याने एव्हरेस्ट शिखर सर केले.सर्वात तरुण गिर्यारोहक बनल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली.अपघात आणि एव्हरेस्ट शिखर सर करताना आलेल्या अडचणी आणि चुकातून तो बरेच काही शिकला.जे आपल्या नशिबी आले ते इतरांच्या नशिबी येऊ नये.यासाठी त्यानं कठीण प्रसंगात जीव कसा वाचवायचा? आणि तग धरून कसं राहायचं? याचा सल्ला जगाला देण्याचे ठरवले आणि यातूनच डिस्कवरी चॅनेलवर जन्माला आली एक टी.व्ही.मालिका.त्याचं नाव आहे मन वर्सेस वाईल्ड आणि त्याचा हिरो म्हणजे बेयर ग्रील्स.

रणरणतं वाळवंट असो किंवा हिमच्छादित प्रदेश.घनदाट जंगल असो किंवा समुद्रातील वादळ.यासारख्या विपरीत परिस्थितीशी सामना करण्यास ग्रील्स नेहमी तयार असतो.म्हणूनच ते एक यशवंत आहे.

परिस्थिती कितीही विपरीत असू द्या.त्याच्याशी लढायचं कसं? आणि त्याला जिंकायचं कसं?याचा शोध ग्रील्स च्या जीवनप्रवासातून लागतो.त्याचा बोध घेऊ.यशवंत होऊ.

ही पोस्ट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि नावासह शेयर करा.

Please Follow My Blog.


No comments: