Sunday, April 19, 2020

प्रतिक्रिया 7 श्री राजेंद्र वाकडे सर

श्री राजेंद्र वाकडे सर, तारळे ता. पाटण यांची प्रतिक्रिया

शेडगे सर,तुम्ही पाटील सरांवर खूप छान लेख लिहून मोठी कौतुकाची थाप टाकली....मीही त्यांची यशवंत मालिका दररोज वाचत होतो...खरेतर संदीप पाटील सर, माझे अतिशय चांगले,व जवळचे मित्र...ते माझ्या आवर्डे केंद्रातील कडवे बुद्र्क या शाळेवर...खूप छान स्वभाव,मृदू भाषा,उत्तम सूत्रसंचालक, उत्तम नियोजक, माणसे जोडण्याची कला असलेला माणूस...ते अंगापुराला बदलून आले ,तिथेही त्यांनी अनेक माणसे जोडली...सरांचे वाचन खूप, कुणालाही कधीही न दुखावणारा माणूस,ते सध्या पाली या गावी राहतात.. आपले कोणी दिसले की चहा घेतल्याशिवाय सोडत नाहीत हे माझा अनुभव..मोठा कुटुंबवत्सल माणूस,घरी आई वडील ,दोन छोटी लाडकी बाळे, व पाली येथें शिक्षिका असणारी कर्तव्यदक्ष पत्नी,...अतिशय सुसंस्कार असणारे हे संदीप पाटील सर... नक्कीच छान लिहीत आहेत..एखादी मालिका लिहिण्यास सुरुवात करणे व त्याचे दिडशे भाग पूर्ण होणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे..संदीप पाटील सरांचे खूप खूप अभिनंदन...💐💐💐👌👌🙏🙏

No comments: