Thursday, May 21, 2020

अभिमानास्पद सांगलीच्या प्राथमिक शिक्षकाने शोधला कोरोनावर उपाय

🎯 अभिमानास्पद सांगलीच्या प्राथमिक शिक्षकाने शोधला कोरोनावर उपाय.

सध्या भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना या रोगाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. अनेक संशोधनसंस्था या रोगावर इलाज शोधण्याचे काम करत आहेत. अशा परिस्थतीमध्ये जि.प.शाळा कडेपूर जिल्हा सांगली या शाळेत कार्यरत असणारे उपशिक्षक श्री. जिवंधर बाळू मलमे यांनी कोरोना रोगावर इलाज शोधला आहे.

जिवंधर मलमे माझे मित्र. त्यांचा आणि माझा परिचय डी. एड.ला असल्यापासून आहे. ते मूळचे मिरज तालुक्यातील सोनी या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी विज्ञान शाखेतून बारावी चे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी लठ्ठे अध्यापक विद्यालय आष्टा, ता.वाळवा या विद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. 2010 साली त्यांची सातारा जिल्हा परिषद येथे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. श्री.मलमे हे गारवडे शाळेत आणि मी पापर्डे या शाळेत कार्यरत होतो. एकाच केंद्रात एकत्र काम करण्याचाही योग आला.  2017 साली त्यांची बदली जि.प.शाळा कडेपूर जि. सांगली याठिकाणी झाली.

ते अतिशय चौकस बुद्धीचे आहेत. नोकरी करत असतानाच आपले पुढील शिक्षण सुरूच ठेवले. त्यांना विज्ञान शाखेची प्रचंड आवड असल्याने, त्यांनी निसर्गोपचार पद्धती चे शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांनी काही औषधांवर संशोधन सुद्धा केलेले आहेत. सध्या ते शिवाजी युनिव्हर्सिटी येथे पी. एच.डी. करत आहेत.

मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली. देश लॉक डाऊन झाला. झाला. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोगावर इलाज शोधण्यासाठी देशातील अनेकांना आवाहन केले. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत श्री मलमे यांनी संशोधन करण्यास सुरु केली. अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांना या रोगावर औषध शोधण्यात त्यांना यश आले. माननीय पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटरवर देखील त्यांनी आपल्या संशोधना बद्दल सविस्तर माहिती नोंदवली आहे.

श्री मलमे यांनी फेसबुक वर देखील संशोधन प्रसारित केले. कोरोनावरील औषधा बाबत त्यांनी केलेल्या पोस्टसाठी फेसबुकचा 'रायझिंग स्टार' हा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. औषधा बाबत माहिती घेतली. औषध स्वतः तयार करून ते  वापरले देखील. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि लक्षणे दिसणाऱ्या अनेकांनी या औषधाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे श्री.मलमे यांना फोनवर कळविले आहे. 

त्यांच्या या संशोधनाची दखल भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबई मधील कार्यरत दोन वैज्ञानिकांनी घेतली आणि त्यांना या औषधाचे पेटंट घेण्यासंदर्भात देखील सूचना केली. भारती विद्यापीठाचे डीन डॉ. भारत बल्लाळ यांनी त्यांना पेटंट रजिस्टर करण्यासंदर्भात खूप महत्त्वपूर्ण मदत केली आहे. त्यांनी आपल्या औषधाचे पेटंट रजिस्टर केलेले आहे. 

एका प्राथमिक शिक्षकाने कोरोना या रोगावर औषध शोधून त्याचे पेटंट घेण्याची ही पहिलीच वेळ भारतातील पहिलीच वेळ आहे. परंतु अद्यापही काही जाणकार मंडळी त्यांच्या या संशोधनावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. काही वृत्तपत्रांनी त्यांच्या ह्या संशोधनाची बातमी प्रसारित करण्याबाबत नकार दर्शविला. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारतात कोरोनावर  कोणी उपाय शोधू शकत नाही. अशी मानसिकता येथील लोकांची झाली असल्याचे ते सांगतात. त्यामुळेच त्यांच्या या औषधावर काहीजण जाणकार मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या संशोधनाची दखल सरकारने घ्यायला हवी. अशी त्यांची अपेक्षा आहे.

श्री. मलमे यांच्या या कामगिरीबद्दल शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्री मलमे यांच्या या कार्याची दखल स्थानिक न्यूज चॅनेल ने घेतले आहे. त्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/a9zrxHMOYoo

धन्यवाद,
श्री संदिप पाटील, दुधगाव.
9096320023.




1 comment:

Unknown said...

Thanks for your Ayurvedic medicine