Friday, June 12, 2020

यशवंतच्या निमित्ताने

🎯 यशवंतच्या निमित्ताने

सर्व वाचक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार🙏

"यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" या लेखमालेच्या सातव्या पर्वातील अंतिम भाग अर्थात 175 वा भाग हातावेगळा झाला. पहिल्या सहा पर्वांसारखेच हे सातवे पर्व ही अतिशय यशस्वी ठरले. त्यास वाचक मित्रांनी उदंड प्रतिसाद दिला. भारतासह 13 देशातील एकूण 47000 वाचकांच्या भेटी आणि 130 फॉलोअर्स मिळाले. हा त्याचाच एक भाग.

लॉकडाऊन 1.0 आणि 2.0 च्या काळात सहावे पर्व लिहून झाल्यानंतर ब्रेक घेतला. परंतु लॉकडाऊन हटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. हनुमानाच्या शेपटी सारखेच लॉकडाऊन देखील वाढतच चालले होते. अशातच लॉकडाऊन 3.0 ची चाहूल लागली आणि मन बेचैन होऊ लागले. "पुन्हा लेखनाची सुरुवात करावी." असे मनोमन वाटू लागले. पण,लिखाणाचा दुवा सापडत नव्हता. पण, म्हणतात ना, "इच्छा असेल तर, मार्ग दिसेल." अगदी तसंच काहीसं घडलं. तिसऱ्या लॉकडाऊनच्या पूर्वी मा. पंतप्रधान यांनी 'आत्मनिर्भर भारत' ची घोषणा केली आणि सातव्या पर्वाच्या लेखनाचा विषय मिळाला. भारतातील काही प्रसिद्ध व्यावसायिकांच्या जीवनातील संघर्षावर आणि त्यातून मिळणार्‍या प्रेरणेवर हे संपूर्ण पर्व आधारित राहिले. लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच या तरुणांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे आणि स्वतः आत्मनिर्भर होऊन, देशाला आत्मनिर्भर करण्याचे विचार सुरू झाले होते. या विचारांना खतपाणी घालणे, त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे, त्यांचे आत्मबल वाढविणे आणि त्यांना प्रेरणा देणे. केवळ हेच उद्देश या सातव्या पर्वाचे होते.

एका उदात्त विचाराने सुरू झालेल्या सातव्या पर्वाचा प्रवास, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. 'उद्योजक महाराष्ट्र' या समूहाने याची दखल घेतली आणि त्यांनी "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" चे काही भाग आपल्या व्हाट्सअप समूहावर प्रसारित केले. यामुळेच हे लेखन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्यास मदत झाली. त्याबद्दल 'उद्योजक महाराष्ट्र' या समूहाचा मी शतशः आभारी आहे.

"महाराष्ट्राचे सूत्रसंचालक" या समूहाचे प्रशासक आदरणीय माणिक नागरगोजे सर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, जि.प.प्रा.शा- झोला,ता. गंगाखेड जि. परभणी 8805625211 हे आपल्या 60 हून अधिक समूहावर मागील 3 महिन्यापासून अव्यहतपणे "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" चे पहिल्या भागापासून प्रसारित करित आहेत. त्यामुळे अनेक अज्ञात वाचकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. तब्बल 450 नवे वाचक मित्र या निमित्ताने ब्रॉडकास्ट लिस्ट ला जोडले गेले. आदरणीय नागरगोजे सरांचे शतशः आभार.

माझे लेखन सर्वदूर पोहविण्याचे खूप मोठे काम काही मित्रांनी केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने  श्री. अविनाश कर्पे, शिक्षक मंच सातारा, श्री लक्ष्मीकांत सोरटे, श्री.रमेश काशीदसर, श्री.राहुल कोळी व श्री एम पी पाटील तासगाव, श्री. गजानन टेकाळे यांचा समावेश होतो. आपले खूप खूप आभार. या सोबतच अनेक अज्ञात समूह प्रशासकांनी माझे लेखन आपल्या ग्रुपवर प्रसारित केले. त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

नेहमीप्रमाणेच अनेक वाचकांनी लेखन कौशल्याचे कौतुक केले. काहींनी विचारांना गती मिळाल्याचे कळविले. याच सातव्या पर्वाच्या काळात ब्लॉगला तब्बल 22000 वाचकांनी भेटी दिल्या आहेत. हा प्रतिसाद आणि प्रतिक्रियामुळे मला लेखनास ऊर्जा मिळते.

काही वाचकांच्या प्रतिक्रिया....

👉 (8459030133 वाचक मित्र वाचन संस्कृती 1वरील सदस्य) यांची प्रतिक्रिया....

*खूप छान सुरुवात होते सर प्रत्येक दिवसाची, आपल्या यशवंत या मालिकेमुळे...* 🙏🏻
दररोज नवीन प्रेरणादायी अनुभव आणता तुम्ही आमच्या साठी...
प्रत्येक यशवंत च्या अनुभवातून काही ना काही शिकण्यासारखं असतं...
प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाने आपल्या मेहनतीने कमवलेल्या संपत्तीला वाढवावं ही अपेक्षा असते आणि यात आपले आजचे यशवंत यशस्वी झाले....🙏🏻

*रोज येणाऱ्या  "यशवंत- एक प्रेरणास्त्रोत" साठी आपले आभार....* 🙏🏻
★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★
👉 अरुण बोरुडे 7020443547 पिंपरी चिंचवड
यांची प्रतिक्रिया...

भारतात सर्वात श्रीमंत श्री मुकेश अंबानी यांना मानाचा मुजरा तसेच त्यांच्या कार्यास सलाम.🙏🌹👏
सर , तुम्ही आज या यशवंत -प्रेरणास्त्रोत या लेखमालेतून यशवंत व्यक्ती यशवंत होण्याआधी कशा परिस्थितीतून  यशाच्या मार्गावर / स्थानावर पोहचले आणि आज हि त्या स्थानावर टिकवून आहेत. सर्वच यशवंतांची ही यशस्वी वाटचाल आम्हा सर्वच वाचकांना एक फार मोठी प्रेरणादायी व आत्मविश्वास निर्माण करणारी राहील.
परिस्थिती वर जे मात करण्यात यशस्वी होतात तेच यशस्वी होतात. आपल्या अनूभवातून मनात आलेल्या चांगल्या कल्पनांना सत्यात  उतरवणार्या सर्व यशवंतांना  पुनश्च मानाचा मुजरा👏🌹 
सर ही यशवंत लेख माला वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सुध्दा फार मोठे कष्ट घेतले आहेत आपल्या ह्या प्रेरणादायी कार्यास सलाम 👏🌹
आपण पुढेही आपले कार्य चालू ठेवून  जास्तीत जास्त युवकांपर्यंत हे आपले लेखन   वेगवेगळ्या माध्यमाद्वारे पोहचावे ही सदिच्छा व आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. 👏🙏🌹🌷
जय हिंद
धन्यवाद🙏🌹

★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★
👉 सुनील लोरे, मुरुड यांची प्रतिक्रिया..
Its very nice and beneficial ro all readers. U hv been providing easy and specific source of inspiration to readers.
Nic to see you soon with new series

★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★
👉 मच्छिद्र वाघ नांदेसर येवला,नाशिक यांची प्रतिक्रिया
सर तुम्ही लिहिलेल्या लेखात मुकेश अंबानी यांना भारतात कोण ओळखत नाही,,परंतु त्यांनी कमावलेली संपत्ती ही इतक्या मेहनतीने व कष्टाने वाढवली हे सामान्य माणसाला तुम्ही तुमच्या लिखाणातून पटवून दिले जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगात काहीही अवघड नाही या लेखात तुम्ही जे दररोज लेख लिहिता त्यापासून निश्चितच सर्वाना प्रेरणा  मिळत राहते असेच लेख वाचून अजूनही नवीन असे यशवंत तयार होवो हीच सदिच्छा🙏🙏🙏

★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★
👉 Om Nevkar Pune
Sir as I am a student I am learning various things which are happening in our surroundings...
Now I am trying to learn experiences what other Entrepreneurs are suffered.
The blogs you post are always keeping me motivated💯...
You are doing the best work of motivating others and keeping them focused to their goals💫❤
★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★
👉 Asmita sawant Thane
जीवन संघर्षमय असते परंतु जर तो नसेल तर जगण्याला अर्थ नाही, द्ऻरिदय वाट्याला आलं म्हणून कित्येक जण फक्त रडत बसतात पण त्याऐवजी कष्ट घेण्याचा प्रयत्न केला तर आपले दारिद्र्याचे दिवस आपणच बदलू शकतो . फक्त  कष्ट करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी.
आपले प्रेरणास्त्रोत रोज सकाळी वाचले की खरचं नवी ऊर्जा संचारते .
धन्यवाद आदरणीय श्री. पाटील सर 🙏😊
★■◆■◆■◆■★   ★■◆■◆■◆■★

मित्रहो, असेच प्रेम "यशवंत - एक प्रेरणास्त्रोत" वर आपण सदैव करावे. हीच या निमित्ताने आपणास विनंती. लवकरच एका नव्या विषयासह,नव्या यशवंतांसह आठव्या पर्वात आपल्या भेटीला येईलच. तोपर्यंत नमस्कार..
धन्यवाद..



No comments: