🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *श्री. माणिक नागरगोजे सर यांचे विषयी*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
🏵 _माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._
*दि. 24 मार्च 2020. भारतात लॉक डाऊन सुरू झाले, तो हाच दिवस.. कोरोना सारख्या भयंकर संकटासोबतच, वेळ कसा व्यतीत करायचा ? हा मोठा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता. आपले मनोरंजन आणि वेळ व्यतीत करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे पर्याय शोधले. या संपूर्ण काळात अनेक मनं नकारात्मक विचारांनी प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील हजारो वाचक मित्रांसाठी* _*श्री माणिक नागरगोजे सर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोला, जिल्हा परभणी*_ *यांनी एक पर्याय उपलब्ध करून दिला. तो म्हणजे 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' चे पुनः प्रसारण.*
*श्री.नागरगोजे सर हे 'महाराष्ट्राचे सूत्रसंचालक'* या आपल्या *निश्चित उद्दिष्टांनुरुप चालणाऱ्या आणि नावाजलेल्या समूहाच्या प्रमुख प्रशासक.* शिवाय ते राज्यातील तब्बल 70 हून अधिक समूहाशी निगडित आहेत. *'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत'* च्या दुसऱ्या पर्वात सरांशी माझी व्हॉट्स ऍप वर भेट झाली. लेखन वाचून सरांनी फोनवर कौतुक देखील केले. या नंतर आमची मैत्री अधिक दृढ होत गेली. पुढे वर्षभरातच म्हणजे मे महिन्यात त्यांची प्रत्यक्ष भेट कोल्हापुरात झाली. सरांचे एक ऑपरेशन झाले होते. ते उपचार घेत असलेल्या एका हॉस्पिटलमध्येच त्यांची भेट घेतली. बराच वेळ त्यांच्या सोबत व्यतीत केला. अनेक विषयांवर चर्चा झाली. सरांच्या स्वभावातील अनेक पैलूंचे दर्शन झाले. सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. याची जाणीव झाली. या भेटी नंतर सरांशी असणारी मैत्री अधिकच घट्ट झाली.
'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' चे प्रत्येक पर्व सर्वदूर पोहोचण्यात सरांचा मोठा हातभार आहे. हे यापूर्वीच्या अनेक लेखांमध्ये मी वेळोवेळी नमूद केले आहेच. परंतु, या लॉक डाऊन च्या काळात देखील 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' चे तब्बल 100 भाग सलग 100 दिवस अखंडपणे संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या 70 हून अधिक समूहात सरांनी प्रसारित केले. यामुळे वाचकांना मोठी पर्वणी मिळाली.
*सरांच्या या उपक्रमामुळे 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' या ब्लॉग ला अनेक भेटी मिळू लागल्या. माझ्या ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील होण्यासाठी वाचकांची संख्या वाढू लागली. या कालावधीत तब्बल 50 हजार भेटी पूर्ण झाल्या. शिवाय, 450 वाचक मित्र ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये नव्याने जोडले गेले. 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' सर्वदूर पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे आणि होत आहे. तब्बल 100 दिवस इतका मोठा कालावधी प्रसरणासाठी देणं. रोज नित्यनेमाने आणि सातत्याने 70 समूहात पोस्ट पाठविणे. ही सोपी गोष्ट नाही. याची मला जाणीव आहे. आजवर सरांचे मोठे सहकार्य मला लाभले आहे. यापुढेही लाभो. हीच विनंती. सरांच्या या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.*
धन्यवाद....
No comments:
Post a Comment