🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *सागर राऊत - शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मार्गदर्शनातील साताऱ्याचा उगवता तारा..*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
🏵 _माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._
कोरोनारुपी महासंकटाने देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात कोंडून ठेवलं. या लॉक डाऊनच्या काळात अनेकांना वेळ कसा घालवायचा ? याचं मोठं कोडं पडलं होतं. यावर उपाय म्हणून काही जणांनी आपल्या छंदांना वेळ दिला, तर काही जणांनी आपली कमकुवत बाजू बलस्थानात परावर्तित केली, तर काहींनी आपली बलस्थानं आणखीण बळकट करण्याचं काम केलं. यापैकीच एक नाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सागर राऊत होय. सागर राऊत यांनी आपल्या छंद आणि बलस्थाने यांना या लॉकडाऊन मध्ये अधिक वेळ दिला आणि केवळ तीन महिन्यांच्या कालावधीतच आपले यूट्यूब चैनल मॉनेटाइज करण्यात यश मिळवलं. त्याचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
सागर प्रकाश राऊत माझा डी.एड. चा वर्गमित्र. आम्ही दोघे पाटण येथील गुरुजन अध्यापक विद्यालय येथे एकत्र होतो. (केवळ दोन महिन्यांनी माझे कॉलेज बदलले.) सागर हा खंडाळा तालुक्यातील कोपर्डे या गावचा. त्याचं डी.एड. पाटण येथील गुरुजन अध्यापक विद्यालय येथे झाले. 2009 साली जि.प.प्रा.शा. एकसळ ता. कोरेगाव येथे त्याच्या नोकरीस सुरुवात झाली.
आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने एकसळ शाळेचा लौकिक वाढविला. त्याच्या कारकिर्दीत शाळेस आयएसओ मानांकन, स्वच्छ शाळा सुंदर गुणवत्तापूर्ण शाळा आदी मानांकने मिळाली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेला जिल्हास्तरावर उज्वल यश प्राप्त झाले. त्याच्या या कार्याची दखल घेऊन 2018 साली पं.स.कोरेगाव यांचे वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2019 साली त्याची बदली पाटण तालुक्यातील दुर्गम अशा भिकाडी रामेल या शाळेत झाली.
मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं सर्वच लोकं आपापल्या घरात लॉक डाऊन झाली. या काळात अनेकांनी आपल्या छंदांना वेळ दिला. आपली बलस्थानं अधिक बळकट केली. सागर याने देखील हेच केलं. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या सागरने या काळात व्हिडीओ निर्मितीच्या छंदाला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. दहा दिवसांचं व्हिडिओ निर्मितीचं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं
26 एप्रिल 2020 रोजी वासोटा किल्ल्याचे प्रवास वर्णन करणारा पहिला व्हिडिओ तयार केला. अनेकांना तो आवडला आणि सुरू झाला, एक नवा अध्याय व्हिडिओ निर्मितीचा....
आपल्या 'केएस एज्युकेअर चॅनल' च्या माध्यमातून सुरुवातीला गणित आणि पत्नी सौ.कीर्ती राऊत यांच्या मदतीने हिंदी विषयाचे शैक्षणिक व्हिडिओ निर्माण केले. त्याने तयार केलेले व्हिडिओ अनेकांना आवडू लागले आणि त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. यामुळेच त्याला उत्तमोत्तम व्हिडिओ निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. सागरने निर्मिलेले व्हिडिओ पाहून अनेकांनी, त्याला व्हिडिओ निर्मिती कशी करावी ? संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली आणि यातूनच सागरला एक नवी दिशा मिळाली.
'केएस एज्युकेअर चॅनल' या Youtube चॅनल च्या माध्यमातून सागरने महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांसाठी "व्हिडिओ निर्मिती कार्यशाळां" चे ऑनलाइन आयोजन सुरू केले. यात प्राथमिक स्तरापासून ते ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत जाऊन व्हिडिओ निर्मिती कशाप्रकारे करता येईल ? याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले. आज हजारो शिक्षक त्यांच्या कार्यशाळेतून, व्हिडिओ निर्मिती करण्याचं तंत्र आत्मसात करून, आपल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक व्हिडिओ निर्माण करत आहेत.
सागरने आजवर 100 हून अधिक दर्जेदार व्हिडिओंची निर्मिती केली आहे. 2300 Subscribers आणि 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण झाला. सागरचा हा प्रवास इतका वेगाने झाला की, केवळ तीन महिन्यांच्या कालावधीतच, त्याचे 'केएस एज्युकेअर' हे यूट्यूब चैनल मॉनेटाइज झाले. या वेगवान प्रवासामध्ये त्याने घेतलेले परिश्रम. देखील तितकेच वेगवान आहेत. याची नोंद घेणे गरजेचे आहे.
शिक्षकांच्या गरजेनुसार इफेक्टिव पीपीटी आणि ओ.बी.एस.स्टुडिओ या दोन कोर्सची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रभरातून या कोर्ससाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोबतच,
1.व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा,
2.अँड्रॉइड ॲप व्हिडिओ सिरीज,
3.हिंदी वर्णमाला व्हिडिओ सिरीज,
4.स्पर्धा परीक्षा गणित व्हिडिओ सीरियल,
5.पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कोर्स,
6.ओ बी एस स्टुडिओ कोर्स,
7.सामान्य ज्ञान व्हिडिओ सिरीज,
8.ट्रेकिंग व्हिडिओ सिरीज सारखे अनोखे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम त्याने हाती घेतले आहेत.
सागरच्या या प्रवासात पत्नी कीर्ती, शिक्षक मंच सातारा आणि महाराष्ट्र शिक्षक पॅनल या समूहांचा मोलाचा वाटा आहे. सागरच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रभरातील हजारो शिक्षक त्याला आपला "व्हिडिओ निर्मितीतील मार्गदर्शक" मानतात. खऱ्या अर्थानं सागर "शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मार्गदर्शनातील साताऱ्याचा उगवता तारा आहे." असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मित्रा,तुझ्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल, तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! आणि पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा... धन्यवाद..
श्री. सागर राऊत यांचा
संपर्क क्रमांक 👇.
7588061745, 8767018884.
Youtube चैनल लिंक http://www.youtube.com/c/SAGARRAUT189
TELEGRAM चैनल लिंक
10 comments:
प्रिय मित्र संदीप अप्रतिम लिहितोस.
Well done sir !!keep it up 💐💐💐
आभिनंदन सर तुमच्या कार्याला सलाम
खरंच राऊत सर अत्यंत अचूक मार्गदर्शन करतात. राऊत सर तुमच्या इथून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!������
👌👌
खरेच राऊत सर खूप छान मार्गदर्शन करतात अगदी सोप्याकडून काठीणकडे सहज आणि सुलभ पद्धतीने,!!!!!
अभिनंदन राऊत सर and all the best
खरेच राऊत सर खूप छान मार्गदर्शन करतात अगदी सोप्याकडून काठीणकडे सहज आणि सुलभ पद्धतीने,!!!!!
कार्यशाळेच्या माध्यमातून सागर सर यांनी खूप सूंदर मार्गदर्शन केले आहे, तसेच संदीप सर आपणही खूप सुंदर उपक्रम आमच्यासमोर सादर करत आहात,खूप छान माहिती मिळतेय असेच नवनवीन उपक्रम राबवून मार्गदर्शन करत रहा
सागर राऊत सर यांचे कार्यशाळेतील मार्गदर्शन घेऊन मी माझे youtube चॅनेल तयार केले व एक ब्लॉग तयार केला आहे मोबाईल अँप वापराबाबतचे व्हिडिओ youtubeवर पाहून मार्गदर्शन घेतलेले आहे राऊत सरांनी स्वतः मिळवलेले ज्ञान स्वतःच्या जवळ न ठेवता ते इतरांनाही देऊन खूप मौल्यवान काम केले आहे म्हणून मला म्हणावेसे वाटते की सागर सरांनी सागर शिंपल्यातील मोतीच सर्वांना वाटले तंत्रज्ञानाची साक्षरता सर्वामध्ये रुजविली त्यामुळे सागर सरांना शुभेच्छासुध्दा अपुऱ्या पडतील सागर सरांमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळालेली माहिती म्हणजे एक अनमोल खजिना आहे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आभारही मानता येईनात कारण आभार मानले की काम संपते त्यामुळेच आभारही न मानता मी असे म्हणेन सर हे कार्य असेच सुरू ठेवा व आम्हाला वेळोवेळी अशीच मदत करत राहा तुमच्या या कार्याला अखंड शुभेच्छा धन्यवाद सर
Post a Comment