Friday, November 13, 2020

Thanks To sakal

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *Thanks To sakal*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

शिक्षण व्यवस्था आणि प्राथमिक शिक्षकांवर आगपाखड करण्यात, टीका करण्यात परवा एका वृत्तपत्रानं धन्यता मानली. असे असताना दुसरीकडे मात्र 'सकाळ'सारखं दैनिक शिक्षणव्यवस्था आणि प्राथमिक शिक्षकांवर मोठा विश्वास दाखवून, सकारात्मक बातम्या समाजामध्ये देण्याचं अनमोल असं कार्य वेळोवेळी करत आलं आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण आणि शिक्षकांबद्दल समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण होण्यास मदत होत आहे.

शिक्षकांवर मोठी आगपाखड करण्याचे, टीका, निंदानालस्ती करण्याचे काम काहींच्या लेखणीतून सुरू असते. शिक्षकांबद्दल समाजामध्ये द्वेष पसरविण्यात, असंतोष निर्माण करण्यातही अशांना

भूषण वाटते. पण, या साऱ्याला अपवाद असलेलं दैनिक म्हणजे "दै.सकाळ" होय. एकंदरीत प्राथमिक शिक्षक आणि  शिक्षण व्यवस्थेबाबत सत्य, वास्तव बातमी देण्याचं, समाजामध्ये सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचं महत्त्वाचं काम "दै.सकाळ" करतं आहे. 

2019 साली "दै. सकाळ" सातारा आवृत्तीने "उपक्रमशील शिक्षक" या सदराची सुरुवात केली होती. या सदरात तब्बल 99 प्राथमिक शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचा वेध घेण्यात आला होता. 

2020 या सालात "वाट तंत्रस्नेहींची" हे सदर सुरू केले. या सदरात तब्बल 75 प्राथमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीचा वेध घेतला. या दोन्ही सदराचे लेखन प्राथमिक शिक्षक श्री. सुनिल शेडगे सर यांनी केले आहे. 

या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करताना जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारीअधिकारी, दोन्ही शिक्षणाधिकारी, मा.शिक्षण सभापती आदी अधिकारी पदाधिकारी वर्ग उपस्थित होते. यामुळे प्राथमिक शिक्षक करत असलेलं कार्य वरिष्ठांपर्यंत देखील पोहोचले. एक सकारात्मक संदेश वरिष्ठांपर्यंत पोहचला. 

या सदरात शिक्षकांची कौटुंबिक आणि शैक्षणिक वाटचाल, शाळा विकासासाठीचे प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा केलेला वापर याचा सुंदर मिलाफ केला गेला. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून या सदरावर कौतुकाचा वर्षाव होत होता. 

एकीकडे काही जण अत्यंत शिवराळ भाषेत शिक्षकांचा अपमान करत असताना, "दै.सकाळ" ने मात्र शिक्षकांची प्रतिष्ठा जपली. एकीकडे शिक्षकांबद्दल समाजात द्वेष पसरवीत असताना, "दै.सकाळ" ने मात्र शिक्षण व्यवस्था प्राथमिक शिक्षक यांच्याबद्दल सकारात्मक विचार रोवला. प्राथमिक शिक्षक करत असलेल्या कार्याला पाठबळ देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं कार्य "दै. सकाळ" सदैव करत आलं आहे. या कार्याबद्दल "Thanks To Sakal" म्हणावेसे वाटते.




No comments: