Monday, January 25, 2021

मित्रवर्य राहुल कोळीच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *मित्रवर्य राहुल कोळीच्या कार्यशाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

राहुल माझा डी.एड. चा वर्गमित्र. त्याची आणि माझी पहिली भेट जिथं झाली, ते ठिकाण म्हणजे गुरुजन अध्यापक विद्यालय, पाटण. दोघांनाही या विद्यालयात डी.एड. साठी प्रवेश मिळाला होता. मग आम्ही एकाच खोलीत राहिलो. नंतर एकत्रच आष्टा डी. एड. कॉलेज ला बदलून आलो. नंतर नोकरीला लागलो. तेथेही एकत्रच. राहुलचा खडतर प्रवास मी अतिशय जवळून पाहिला आहे. यापूर्वी त्यावर लेखन झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय आणि शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली. राहुलने आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत अभूतपूर्व अशी कामगिरी करून यश संपादन केले. चहूबाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 

राहुलच्या या ज्ञानाचा फायदा दुधगावमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना व्हावा. असं मनोमन वाटायचं. माझा मनोदय त्याला बोलून दाखवला आणि त्याने लगेच होकरही दिला. आज त्याच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेचा लाभ दुधगावमधील काही विद्यार्थ्यांना झाला आहे.

राहुल ने आज एकाच दगडात दोन पक्षी मारले. दुधगाव मधील मुलांना मार्गदर्शन तर केलेच. सोबतच बोरगाव शाळेचे अनेक विद्यार्थी या कार्यशाळेला ऑनलाइन उपस्थित होते. राहुल शिकवत असलेला घटक एकाचवेळी दोन्ही कडचे विद्यार्थी शिकत होते. शिष्यवृत्ती परीक्षेचा त्याचा अभ्यास पाहून दुधगाव मधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी भारावूनच गेले. 

तासगाव तालुक्याला लाभलेली शिष्यवृत्ती परीक्षेची परंपरा, त्यासाठी शिक्षक घेत असलेले परिश्रम, पालक व विद्यार्थ्यांची धडपड या सार्‍या बाबींची आज नव्याने उकल झाली.

यशाचा मार्ग मुळीच सोपा नसतो. त्यात असंख्य अडचणी, अडथळे असतात आणि या अडथळ्यांवर मात करून पुढे जाणारेच, यशाच्या शिखरावर विराजमान होतात. नेमका हाच संदेश आज आजच्या कार्यशाळेतून राहुल ने दिला. 

आज राहुल ने दिलेल्या योगदानाबद्दल मन:पूर्वक आभार. येत्या काळात त्याच्या हातून उत्तम शैक्षणिक कार्य घडो. यासाठी शुभेच्छा !!!

धन्यवाद...




No comments: