Saturday, January 23, 2021

इंग्लिश गुरु श्री.अमोल गुलाब मिसाळ सर यांच्या दुधगाव येथील कार्यशाळेच्या निमित्ताने

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *इंग्लिश गुरु श्री.अमोल गुलाब मिसाळ सर यांच्या दुधगाव येथील कार्यशाळेच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

कर्मवीर सार्वजनिक वाचनालय दुधगाव येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताहात मित्रवर्य श्री.अमोल मिसाळ सर यांची इंग्रजी विषयांवर आधारित मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यानिमित्ताने काही महिन्यापूर्वी लिहिलेल्या लेखाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

श्री.अमोल गुलाब मिसाळ हे दिघंची, ता - आटपाडी, जि. सांगली येथील रहिवाशी. 28/06/2011 रोजी जि.प.शाळा वांझोळे ता - पाटण येथून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 10 वर्षे सेवा पूर्ण झाली असून सध्या ते जि.प.शाळा पारेकरवाडी ता. आटपाडी येथे कार्यरत आहेत. 

येथे पहिल्या वर्षीच त्यांच्या अथक परिश्रमातून वांझोळे शाळेतील एक विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक बनली. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळेच दुसऱ्या वर्षी त्यांच्याच पुढाकाराने शाळेत Semi English ची सुरवात झाली. आपल्या इंग्रजी वरील प्रभुत्वच्या जोरावर 2017 - 18 साली संपन्न झालेल्या शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत Spoken English या इव्हेण्ट मध्ये त्यांनी पाटण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

श्री. मिसाळ सर हे उत्तम कवी आहेत. अनेक साहित्य संमेलनात आपल्या कवितांचे सादरीकरण त्यांनी केले आहे. ' व्यथा डी.सी.पी.एस. ग्रस्तांची ' ही त्यांची कविता अतिशय लोकप्रिय ठरली आहे. 

श्री. मिसाळ सर हे एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. amol misal या youtube channel च्या माध्यमातून, शिक्षणक्षेत्रातील तांत्रिक बाबीचे, शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शिवाय विद्यार्थीसाठी उपयुक्त अशा pdf ची त्यांनी निर्मिती देखील केली आहे. 

एकंदरीतच श्री अमोल मिसाळ हे एक हरहुन्नरी, धडपडे आणि स्वतः सोबत इतरांचा विचार करणारं व्यक्तिमत्त्व. लॉक डाऊनचा भला मोठा काळ, त्यांनी स्वतः च्या समृद्धीसाठी दिला. शिवाय, इतरांसाठी काय करता येईल ? याचाही विचार केला. त्यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती संकल्पना म्हणजेच " I CAN SPEAK ENGLISH " हा 30 दिवसांचा कोर्स.

" I CAN SPEAK ENGLISH " या 30 दिवसांच्या कोर्स ची सुरुवात दि 6 जुलै पासून झाली. आपल्या Youtube chaneel व whatsapp समूहाची च्या माध्यमातून त्यांनी या कोर्स ची सुरुवात केली. या उपक्रमांर्गत त्यांनी प्रत्येक घटकावर आधारित एका मार्गदर्शक व्हिडिओ ची स्वत: निर्मिती केली. तो प्रसारित केला. त्या घटकाच्या अनुषंगाने 30 प्रश्नां च्या Online चाचणीची निर्मिती केली. त्यांनतर सहभागी झालेल्यांसाठी Homework दिला आणि तो करून घेतला. शिवाय या कोर्स मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्यांनी गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन देखील केले आहे. तेही तब्बल 30 दिवस अखंडपणे आणि पूर्णपणे मोफत. 

सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठीच मुख्यत्वे या रचनाबद्द कार्यक्रमाची निर्मिती केली होती. परंतु, कोर्स ची रचना आणि त्याची अंमबजावणी पाहून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले. हे त्यांच्या कोर्स चे यश म्हणावे लागेल. त्यांच्या या कोर्स चा लाभ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला आहे. या कोर्स मुळेच अनेकांची इंग्रजी बाबतची असलेली, अकारण भीती नाहीशी झाली असून त्यांच्यात नवा आत्मविश्वास आणि चैतन्य निर्माण झाले आहे. ते लिलया इंग्रजी बोलू लागले आहेत. म्हणूनच ते "इंग्लिश गुरु" आहेत. 

मिसाळ सरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन गुरुवर्य सुनिल शेडगे सर यांनी "वाट तंत्रस्नेहीची' या ' दै.सकाळ ' सातारा आवृत्तीमध्ये प्रकाशित लेखमालेत समावेश करून, त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला आहे.

आज दुधगाव येथे श्री.मिसाळ सरांची इंग्रजी विषयाची कार्यशाळा संपन्न झाली. योगायोगाने आज या कार्यशाळेला भेट देण्यासाठी मिसाळ सरांचे गुरू व बागणी गावचे सुपुत्र श्री.राहुल पाटणे सर आवर्जून उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी गुरुशिष्यांची भेट झाली. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सप्ताह निमित्त उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल मिसाळ सरां यांचे आभार. येत्या काळात त्यांच्याकडून उत्तमोत्तम कार्य घडो. यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !!!



No comments: