Tuesday, March 30, 2021

परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर मदत निधीच्या निमित्ताने...

 परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर मदत निधीच्या निमित्ताने...


🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर मदत निधीच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर यांचं दि. 23 मार्च 2021 रोजी एका अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनाने हजारो लोकांचा आधार तुटला. एक आदर्श शिक्षक, सच्चा मित्र, हक्काचा मार्गदर्शक, उत्तम सल्लागार, संकटकाळी धावून येणारा संकटमोचक अशा अनेक भूमिका निभावणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्यानं अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.


रणसिंग सर या जगात नाहीत. हे मानायला मन  तयारच होत नाहीये. शिवाय, त्यांच्या नावापुढे कै. लिहायला हात ही धजावत नाहीत. ते गावाला गेले असतील. अशी जो तो, मनाची समजूत घालून घेत आहे. कराड, पाटण, वाई, सातारा, नगर परिसरातील कित्येकजण त्यांना शोधायला त्यांच्या जन्मगावी कोरेगाव - चिखली, ता. श्रीगोंदे, जि. अहमदनगरकडे धाव घेत आहेत. 


मला राहवलं नाही. मीही सरांना शोधायला त्यांच्या गावी गेलो. चिखलीच्या फाट्यावर मला घ्यायला सर येतील, असे वाटले. पण, नाही. पुढे कोरेगाव मध्ये गेलो. तेथेही चौकात त्यांना शोधलं. पण, सापडले नाहीत. वाटेत सर ज्या शाळेत शिकले ती कोरेगावची प्राथमिक शाळा दिसली. कोरोना काळात सर तिथे क्वारंटाईन होते. शाळेची, मैदानाची साफसफाई करताना,पाणी मारताना, शाळेसमोर झाडे लावत असताना सर भेटतील. असे वाटले. पण, सर भेटले नाहीत. सरतेशेवटी सरांच्या घरीच गेलो. अंगणात, दारात, गोठ्यात, मळ्यात, कांद्याच्या चाळीत, शेत तळ्यात शोध शोध शोधलं. सर काही सापडलेच नाहीत. आईचे, मॅडम चे, आप्पांचे, बापूचे, छोट्याशा निषाद आणि श्रेयांश चे डोळेही सरांनाच शोधत होते. आता मात्र संयम सुटला. रडूच कोसळलं. सावरायला सर येतील असंही वाटलं. पण, सर काही आलेच नाहीत... सरांना कायमस्वरुपी हृदयात साठवून परतलो.  


सरांच्या अचानक जाण्यानं घरावर मोठा आघात झाला आहे. घरचा खंबीर आधारच नाहीसा झाल्याने सारेच सैरभैर झाले आहेत. समोर अनंत अडचणींचा महाकाय डोंगर उभा राहिला आहे. आता करायचं काय ??? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


अडचणीच्या प्रसंगी मदतीला सर्वात आधी हजर असणाऱ्या माझ्या मित्राच्या कुटुंबासमोर आज समस्यांचा मोठा पहाड उभा राहिला आहे.


सर सरकारी नोकरीत आले खरे. पण, शासनाच्या निर्णयानुसार, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असल्याने, जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारे कोणतेही विशेष लाभ मिळणार नाहीत. जर, एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू 10 वर्षापेक्षा कमी सेवा कालावधीत झाला असेल तर, दहा लक्ष इतकेच सानुग्रह अनुदान मिळते. पण, 10 वर्षापेक्षा अधिक सेवा होऊन, मृत झालेल्या कर्मचाऱ्याला कोणत्या स्वरुपाची, कसली आणि किती आर्थिक मदत मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे. सरांची सेवा 15 वर्षे झाली आहे. शासनाकडून सरांच्या कुटुंबीयांना किती आणि कधी मदत मिळेल. हे निश्चित सांगता येत नाही.


या समस्येतून सरांच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी सरांचे मित्र, हितचिंतक सरसावले आहेत. त्यांनी आर्थिक मदत जमा करण्याचे काम सुरू केले आहे. 


नोकरी गमाविलेल्या मित्राच्या, गृहकर्जाचे हप्ते स्वतःहून भरणाऱ्या आणि परतीची अपेक्षा न बाळगणाऱ्या माझ्या मार्गदर्शक श्री.श्रीराम रणसिंग सरांच्या कुटुंबीयांना फुल ना फुलाची पाकळी मदत करून सहकार्य करावे. आपणास ही कळकळीची विनंती मी संदीप पाटील करतो आहे... कृपया आपली मदत खालील क्रमांकावर पाठवावी... धन्यवाद...



श्री. महेंद्र पांडुरंग सावर्डेकर.

(श्री.सावर्डेकर सर हे श्री.रणसिंग सर यांचे जिवलग मित्र आहेत.)

स्टेट बँक ऑफ इंडिया.

शाखा - उंब्रज

खाते क्रमांक - 31704654499


IFSC CODE - SBIN0011132


गुगल पे नंबर   9767051645

फोन पे नंबर    9767051645








  

No comments: