Friday, April 2, 2021

परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर मदत निधीच्या निमित्ताने भाग 2...

 🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर मदत निधीच्या निमित्ताने भाग 2...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

दि. 23 मार्च 2021 रोजी एका अपघातात दुर्दैवी परममित्र श्री.श्रीराम रणसिंग सर यांचं निधन झालं. घटना घडून दहा दिवस उलटून गेले. पण तरीही, सर अजूनही अवती-भवती असल्याचा भास होता आहे. सरांची आठवण आली नाही असा एकही दिवस उजाडला नाही. अनेक आठवणी ताज्या होत आहेत.त्यांपैकीच ही एक आठवण.


8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. जगभरात हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपणही आपल्या परीने हा दिन साजरा करत असतोच.

श्री. रणसिंग सर एका वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचे. या दिवशी घरातील सर्व कामे ते स्वतः करायचे. मुलांना अंघोळ घालणे, चहा-नाष्टा करणे, जेवण बनविणे, घराची साफसफाई करणे,इ. कामे ते आवडीने करायचे. आई आणि बायको या दोघांनाही त्या दिवशी कामातून सुट्टी द्यायचे. आराम करायला सांगायचे. आपल्या कामातून आई आणि बायको या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करायचे. जशी समानता घरी, तशीच ती शाळेत आणि अन्य ठिकाणीही.

मुन्शी प्रेमचंद यांना एक प्रश्न विचारला गेला की, " हे संपूर्ण जग सुंदर केव्हा होईल? तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितले की, पुरुष जेव्हा स्त्रियासारखे होतील, तेव्हा हे जग सुंदर होईल!" जग सुंदर बनविण्याची सुरुवात स्वतः पासून करणाऱ्या रणसिंग सर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची मोठी परवड होणार आहे.

या कठीण संकटातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी सरांचे मित्र आणि हितचिंतक सरसावले आहेत. त्यांनी आर्थिक मदत जमा करण्याचे काम सुरू केले आहे. 

आपल्या कृतीतून अनेकांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या, श्री.श्रीराम रणसिंग सरांच्या कुटुंबीयांना फुल ना फुलाची पाकळी मदत करून सहकार्य करावे. आपणास ही कळकळीची विनंती मी संदीप पाटील करतो आहे... कृपया आपली मदत खालील क्रमांकावर पाठवावी... धन्यवाद...

श्री. महेंद्र पांडुरंग सावर्डेकर.

(श्री.सावर्डेकर सर हे श्री.रणसिंग सर यांचे जिवलग मित्र आहेत.)

स्टेट बँक ऑफ इंडिया.

शाखा - उंब्रज

खाते क्रमांक - 31704654499

IFSC CODE - SBIN0011132

गुगल पे नंबर 9767051645

फोन पे नंबर 9767051645


श्री. श्रीराम रणसिंग सर अधिक माहितीस्तव 👇 

🎯 https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

🎯 https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/03/blog-post_30.html





No comments: