Wednesday, April 28, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 180

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 180*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/04/180.html



भारताला 1932 साली कसोटी क्रिकेट खेळण्याची मान्यता मिळाली. परंतु संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशकं वाट पाहावी लागली होती. भारतीय संघाने 1952 साली इंग्लंडवर 1 डाव आणि 8 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड व गुलाम अहमद याचा या कसोटी विजयात मोलाचा वाटा आहे. असे मानले जाते. पण, खेळाडूं व्यतिरिक्त आणखी एका खेळाडूचा या विजयात मोलाचा वाटा आहे. त्याचाच हा प्रेरणादायी प्रवास...


11 मार्च 1915 रोजी सांगली मधील एका आठ भावंडं असलेल्या मराठी-ईसाई कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील एक शिक्षक. तरीही त्याला अनेक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागला. सुरुवातीपासूनच त्याची आवड पुस्तकांपेक्षा क्रिकेट आणि फुटबॉल अधिक होती. सरतेशेवटी त्याने क्रिकेटची निवड केली. 


विविध स्तरावरील स्पर्धेत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि वयाच्या केवळ 18 व्या वर्षीच म्हणजे 1933 साली त्याची निवड महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी झाली. याच कालावधीत भारताला कसोटी क्रिकेट खेळण्याची मान्यता मिळाली होती. मिळाली संधी साधत विविध विक्रम त्याने प्रस्थापित केले. भारताच्या मुख्य संघात स्थान मिळविण्याएवढी पात्रता त्याने सिद्ध केली होती. पण, दुसऱ्या महायुध्दाच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे थांबले असल्याने, अंगी गुणवत्ता असूनही त्याची निवड भारतीय संघात झाली नाही. तरीही, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये आपले स्थापन अधिकाधिक समृद्ध केले. 


दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर वयाच्या 31 वर्षी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याचे पदार्पण झाले. पहिल्या वहिल्या सामन्यासोबतच अन्य सामन्यातही त्याने नेत्रदीपक कामगिरी केली. यामुळेच त्याला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. 1952 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला वहिला विजय मिळाला. भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारा तो कर्णधार म्हणजेच विजय हजारे होय. 


हजारे यांनी केवळ 30 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. यासाठी केवळ 7 वर्षे इतका कमी कालवधी मिळाला. पण, मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन, त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. "मला कमी संधी मिळाली. मला कमी वेळ मिळाला." अशी कारणे सांगून आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकजण करत असतात. त्या सर्वांसाठी हजारे यांचा प्रवास एक चपराक आहे. 


भारतीय कसोटी क्रिकेटसाठी विजय हजारे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री' हा मनाचा किताब देऊन गौरव केला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते केवळ पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 


*कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*






No comments: