Sunday, June 20, 2021

"दै.सकाळ" मधील बातमीच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *"दै.सकाळ" मधील बातमीच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगांव. 9096320023.*


19 जून 2021 रोजी "दै.सकाळ" सांगली आवृत्तीमध्ये 'वॉलेट' प्रसंगाची "शिक्षकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन" ही बातमी प्रसारित झाली. या बातमीने मला सोशल मीडियावर मोठी कौतुकाची थाप मिळवून दिली. अनेक समूहावर माझ्या 'त्या' कामाचे कौतुक झाले. माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेक मित्रांनी, हितचिंतकांनी, नातेवाईकांनी 'त्या' बातमीचा स्टेटस ठेऊन, बातमी फॉरवर्ड करून, तसेच मेसेज व फोनद्वारे अभिनंदन करून माझ्याप्रति प्रेमभाव व्यक्त केला. 


आजच्या या बातमीने दोन वर्षापूर्वीची जुनी आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. माझे मार्गदर्शक श्री.सुनील शेडगे(आप्पा) लिखित "दै.सकाळ" (सातारा आवृत्ती) मध्ये, प्रकाशित "उपक्रमशील शिक्षक" सदरामध्ये माझ्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन "दिवानजी ते आंतरराष्ट्रीय शाळेचा शिक्षक" शीर्षकाखाली माझ्यावर अप्रतिम असा लेख लिहून, आजवर केलेल्या कामाला समाज मान्यता मिळवून दिली होती. त्यावेळी मी प्रचंड भारावून गेलो होतो. असंच आजही घडलं. आज पुन्हा एकदा "दै.सकाळ" बातमी छापून आली. 


"दै.सकाळ" चे सांगलीचे उपसंपादक श्री.अजित कुलकर्णी सर यांनी 'या' बातमीच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. कुलकर्णी सरांनी फेसबुकवर 'वॉलेट' प्रसंगाची पोस्ट वाचली आणि "दै.सकाळ" मध्ये बातमी प्रसारित केली. 


श्री.कुलकर्णी सरांची आणि माझी पहिली भेट "दै.सकाळ" च्या कार्यालयात झाली. या भेटीने मैत्रीची विण अधिकच घट्ट केली. मध्यंतरी महिला दिनाच्या निमित्ताने सरांना ग्रामीण भागातील प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या महिलेवर लेख लिहायचा होता. त्यांनी फोनवर विचारणा केली. मी माळवाडीच्या बोणे मॅडम यांचे नाव सुचवले होते. मुलाखतीवेळी मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो. संवेदनशील पत्रकार म्हणून त्यांचा जिल्हाभर लौकिक आहे. नावीन्यपूर्ण, सृजनशील, सकारात्मक संदेश देणाऱ्या बातम्या देण्यावर व समाजातील दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वांना प्रकाशात आणण्यावर त्यांचा भर असतो. सरांनी लिहिलेल्या बातमी बद्दल त्यांचे आणि "दै.सकाळ"चे मन:पूर्वक आभार. 


या कार्यात श्री.विनोदकुमार पाटील सर व वर्गमित्र संदीप कोले यांचे मोलाचे योगदान लाभले. त्याबद्दल त्यांचेही मन:पूर्वक आभार.


या बातमीचे निमित्ताने माझ्यावर होत असलेला कौतुकाचा वर्षाव अजूनही थांबला नाही. खरंतर मी केलेलं काम अतिशय साधं आहे. माझ्या आई-वडिलांनी, समाजाने, मित्रमंडळींनी आणि हितचिंतकांनी जे संस्कार माझ्यावर केले आहेत. त्याचेच हे प्रतिबिंब आहे. असं मी मानतो. माझ्या हातून घडत असलेल्या प्रत्येक कार्यात, माझ्या जडणघडणीत हातभार असलेल्या प्रत्येकाचा जसा मोलाचा वाटा आहे. अगदी तसंच 'या' कार्यातही आहे. असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या व माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मित्रांचे, हितचिंतकांचे आणि नातेवाईकांचेही मन:पूर्वक आभार. आपले प्रेम आणि साथ अशीच माझ्या सोबत रहावी. हीच एक अपेक्षा. 


धन्यवाद....🙏






No comments: