Sunday, August 22, 2021

"यशवंत - एक प्रेरणास्रोत"ला लाभलेल्या 'नवी अर्थक्रांती' या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्यानिमित्ताने..

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *"यशवंत - एक प्रेरणास्रोत"ला लाभलेल्या 'नवी अर्थक्रांती' या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्यानिमित्ताने...*

🎯 *श्री संदीप पाटील, दुधगाव.9096320023.*


_*परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झालेल्या अनेक व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणादायी असतात. या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांवर टाकलेला प्रकाश,म्हणजेच 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत'*_


या तब्बल 200 प्रेरणादायी लेखांच्या या मालिकेला वाचक मित्रांनी उदंड प्रतिसाद दिला. तो आपल्या आप्तस्वकियांपर्यंत पोहोचविला. भारतासह 19 देशातील 210000+ वाचकांच्या ब्लॉगभेटी आणि 267 फॉलोअर्स मिळाले. ही बाब माझ्यासाठी खूपच सुखावह आहे. 


आजवर अनेक ज्ञात-अज्ञात मित्रांनी, समुहप्रशासकांनी "यशवंत - एक प्रेरणास्रोत"ला आपल्या समूहावर व्यापक प्रसिद्धी दिली आहे. यात प्रामुख्याने सर्वश्री माणिक नागरगोजे,लक्ष्मीकांत सोरटे,अविनाश कर्पे, नरेंद्र देवळे व मिलिंद पंडित यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो. श्री.धनंजय कलामस्ते यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून तर, श्री.विपिन ज्ञाने सर नाशिक व श्री.भिमराव पाटील सर राजगुरुनगर यांनी आपल्या भारदस्त आवाजातून "यशवंत - एक प्रेरणास्रोत"ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.


आज "यशवंत - एक प्रेरणास्रोत"ला आणखी एक नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजेच 'नवी अर्थक्रांती'.


'नवी अर्थक्रांती' हे एक प्रकाशन आहे.ते उद्योग अन् व्यवसायांशी संबंधित मासिक,पुस्तके प्रकाशित करतं. साक्षर,संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्याचं व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्याचं स्वप्नं उराशी बाळगून दोन कॉलेज तरुणांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी 'नवी अर्थक्रांती' ची स्थापना केली. 


समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे. हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती,आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान,चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेण्याचं व त्याला प्रकाशित करण्याचं हे काम फेसबुक,व्हॉट्सॲप,ट्विटर,इंस्टाग्राम,ब्लॉग या सारख्या समाजमाध्यमांद्वारे 'नवी अर्थक्रांती' करतं आहे.


गेल्या सहा वर्षांत 'नवी अर्थक्रांती'नं सामान्य मराठी तरुणाला चाकोरीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली. कितीही अडचणी आल्या, तरी पुढेच जायचं.मागे हटायचं नाही. ही जिद्द निर्माण केली. याच विचारांनी प्रेरित होऊन आज शेकडो जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला.वाढवला. मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्याचं आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी हातभार लावण्याचं काम 'नवी अर्थक्रांती' इमाने इतबारे करत आहे. आजवर फेसबुक,व्हॉट्सॲप,ट्विटर,इंस्टाग्राम,ब्लॉग या सारख्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून तब्बल 20 लाख लोकांपर्यंत 'नवी अर्थक्रांती' पोहचली आहे. 


मराठी माणसाला व्यवसाय करायला मदत करणाऱ्या 'नवी अर्थक्रांती'च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' या लेखमालिकेचे सोमवार दि. 23 ऑगस्ट 2021 पासून रोज संध्याकाळी 6 वाजता प्रसारण होत आहे. ही बाब माझ्यासाठी खूपच सुखावह आहे. 


'नवी अर्थक्रांती'च्या या नव्या प्लॅटफॉर्मवरही 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' ला उत्तुंग प्रतिसाद मिळेल. अशी आशा आहे.


'नवी अर्थक्रांती'नं 'यशवंत - एक प्रेरणास्त्रोत' एक मोठं व्यासपीठ दिलं आहे. त्याबद्दल 'नवी अर्थक्रांती'चं मनस्वी आभार...!


'नवी अर्थक्रांती' ग्रुपसाठी लिंक

https://chat.whatsapp.com/FxXAe3s8zzBINhdYuoOVqR


धन्यवाद...!





No comments: