Thursday, July 21, 2022



1972 चा काळ. महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र पाण्याची टंचाई तर निर्माण झालीच होती शिवाय, लोकांच्या हाताला काम नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेला अनंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. जनतेचे दुःख कसे कमी करता येईल ? याच गूढ विचारात अडकलेल्या गृहस्थाने आपल्या पत्नीला विचारले, "प्रभा, घरात पैसे किती आहेत ?" 

"सातशे रुपये आहेत." पत्नीने सांगितले. 


"सातशे रुपयांत शेतावर किती गडी राबू शकतील?" गृहस्थाने विचारणा केली.


"वीस दिवस चौदा-पंधरा गडी सहज लावता येतील." पत्नीने सांगितले. 


पत्नीच्या या उत्तराने त्या गृहस्थाने तडक तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. 


माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी,


माझ्या शेतावर सातशे रुपयांत चौदा-पंधरा दिवस वीस गडी मजुरीला लावता आले. जर शंभर कोटी रुपये बाजूला काढलेत, तर किती मजुरांना काम देता येईल ?


पत्र मुख्यमंत्र्यांना मिळालं. त्यांनी तडक त्या गृहस्थालामुंबईला बोलावून घेतलं. त्यांचा विचार जाणून घेतला आणि जन्म झाला एका योजनेचा, ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण झाली. ती योजना म्हणजेच "रोजगार हमी योजना" आणि ज्या गृहस्थांनी या योजनेची मूळ कल्पना मांडली, ते या योजनेचे जनक म्हणजेच वि.स. अर्थात विठ्ठल सखाराम पागे. आज त्यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!!

धन्यवाद...!!!

No comments: