🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 212*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/212.html
"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"
दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/212.html
यशाच्या मार्गावरून जात असताना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जी लोकं अडचणी बाजूला सारून पुढे जातात, केवळ तिच लोकं यशाच्या शिखरावर विराजमान होतात. "मी महिला आहे, माझं वय झालं आहे, मला हे जमणार नाही." यासारखी असंख्य कारणं देणाऱ्या महिला आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. वयाच्या पन्नाशीत लाखो रुपयांची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या आणि स्वकर्तुत्वावर भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची यादीत विराजमान झालेल्या एका "स्टार्टप्सची राणी" चा हा प्रेरणादायी प्रवास...!
तिचा जन्म 19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबईमधील एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. वडिलांचा बेअरिंगचा व्यवसाय होता. ती त्यांना व्यवसाय मदत करायची. वडिलांकडून व्यवसायाचे मिळाले ज्ञान, हाच तिचा वारसा हक्क.
तिने बी.कॉम. चे शिक्षण मुंबई येथून पूर्ण केले. तिने एएफ फर्ग्युसन कंपनीमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर 1993 मध्ये कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची सुरुवात केली. महिंद्रा कंपनीमध्ये अतिशय मन लावून, प्रामाणिकपणे काम करून, कंपनीत आर्थिक वाढ केली. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तिची बढती झाली.
नोकरी करत असताना तिने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए शिक्षण पूर्ण केले. एमबीए करत असतानाच तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना जेव्हा तिच्या मनात आली, तेव्हा तिचे वय फक्त 50 वर्ष होते. या वयात अनेक महिला सेवानिवृत्ती नंतर च्या आयुष्याचे नियोजन करत असतात. पुढे जाण्यासाठी आधीची पायरी सोडावी लागते, पुढच्या पायरीवर पाऊल ठेवावे लागते. म्हणजेच काय ? व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधीची नोकरी सोडावी लागेल.
भारतीय महिलांचे सौंदर्य वाढवण्याची तिला संधी दिसली आणि 2012 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी तिने धाडसी निर्णय घेतला. सन 2012 साली लाखो रुपयांची नोकरी सोडून,ब्युटी-वेलनेस उत्पादने विकण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म निर्माण करत स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला नवीन व्यवसायात तिने अनेक छोटे-मोठे धक्के खाल्ले. पण, खचून न जाता, संयमाने अन् जिद्दीने तिने यशाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. अथक मेहनतीच्या बळावर स्वबळावर ती भारतातल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड अब्जाधीश महिला बनली. ती महिला म्हणजेच फाल्गुनी नायर आणि त्यांच्या कंपनीचे नाव आहे Naykaa.
फाल्गुनी नायर या "सेल्फ मेड" महिला म्हणजे स्वबळावर बनलेल्या अब्जाधीश आहे. कोणत्याही वारशाने मिळालेली कंपनी किंवा आई-वडिलांच्या पैशाच्या जोरावर फाल्गुनी यांनी यश संपादन केले नाही, तर त्यांनी स्वतःची यशोगाथा स्वतःचं लिहिली आहे. म्हणून फाल्गुनी नायर यांना भारतीय " स्टार्टअप्सची राणी "असे म्हटले जाते. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
No comments:
Post a Comment