Sunday, April 7, 2024

भाग - 214

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 214*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/04/214.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/213.html



दृढनिश्चय आणि आत्मशक्तीच्या बळावर महिलांच्या वेटलिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेत पदक भारतासाठी सर्वप्रथम पदक जिंकणाऱ्या पहिल्या एका महिला खेळाडूचा हा प्रेरणादायी प्रवास...!


27 जानेवारी 1999 रोजी मणिपूर येथील इंफाळ पश्चिम येथे तिचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिचे वडील एक किराणा दुकान चालवायचे तर आई पुजारी काम करायची. तसेच, ती कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या घरी भांडी घासण्याचे काम देखील करायची. 


शालेय जीवनात वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत तिने तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण घेतले. पण, उंची कमी असल्याने, तिने वेटलिफ्टिंग या खेळ प्रकाराची निवड केली. 


2013 पासून तिने वेटलिफ्टिंग चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणासोबतच विविध स्पर्धांमध्ये तिने सहभागी होण्यास सुरुवात केली. 


2016 साली पेनांग, मलेशिया येथे झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि 10 व्या स्थानावर राहिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. म्हणून, ती नाराज झाली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 


उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने भारतासाठी महिलांच्या 55 किलो क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.


एप्रिल 2024 मध्ये थायलंडमधील फुकेत येथे झालेल्या IWF विश्वचषक 2024 मध्ये तिने दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 55 किलो वजनी गटात पदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. ती महिला म्हणजेच बिंद्याराणी सोरखाईबाम होय. 


बिंद्याराणीचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला असला, तरीही दृढनिश्चय आणि आत्मशक्तीच्या बळावर तिने यशाचे शिखर गाठले आहे. यशाच्या प्रवासात कौटुंबिक पार्श्वभूमी आडवी येत नाही. हे बिंद्याराणी यांनी सिद्ध केले आहे. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत. 


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/03/213.html


धन्यवाद...!

No comments: