Saturday, November 10, 2018

यशवंत एक प्रेरणास्त्रोत भाग 20

डोक्यावर वडिलांचे छत्र असेल तर कोणत्याही मुलाला या जगात कशाचीच मुळी भीती वाटत नाही.पण,वडिलांचे छत्र हरपले की,काय अवस्था होते? हे ज्याचे त्यालाच माहिती.एक कलाकाराचा खतरनाक प्रवास. २७ वर्षे वडिलांच्या छायेत वाढला.सर्वकाही सुरळीत होते.पण,वडिलांच्या अचानक जाण्याने त्याची काय हालत झाली?त्याला काय कष्ट करावे लागले?त्या कलाकाराने आपले करियर कसे घडविले?पाहूया आजच्या भागात...

वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत त्याचा जन्म झाला.वडिलांची नोकरी बिपीटीत असल्याने त्यांच्याच क्वार्टर्समध्ये बालपण गेले.घरची जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असल्याने तो निर्धास्तपणे जगत होता.पण वडिलांच्या निधनानंतर अचानक परिस्थिती बदलली आणि आयुष्याने नवे रूप दाखविले. बीपीटी चा २७ वर्षाचा सहवास एका झटक्यात सुटला.वडाळ्याचे घर, तेथील जिवलग मित्र यांना सोडून जाणे म्हणजे एक दिव्यच होते.

घराची जबाबदारी आता त्याच्यावर आली. परिस्थिती कठीण होती.पण परिस्थितीसमोर हार मानणाऱ्यातला तो नव्हता.

त्याला नाटकाची खुप आवड.म्हणून,नाटकातच करिअर करण्याचे ठरविले.पण,केवळ यावर अवलंबून बसणे शक्य नव्हते. म्हणून काही कार्यालयांत कारकुनी,निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे.याबरोबरच त्याने पानाची टपरी सुरू केली.

जवळजवळ १५ वर्षे पानाच्या टपरीवर बसून तो एका संधीची वाट पाहत होता. पण,त्याने जिद्द सोडली नाही.एक दिवस ती संधी 'फू बाई फू' च्या रूपाने आली आणि त्या कलाकाराने संधीचे सोनं केलं.तो कलाकार म्हणजेच भाऊ कदम.

कुटुंबाची जबाबदारी उचलत,पानाची टपरी चालवत केवळ मेहनतीच्या जोरावर भाऊने आपल्या करियरला जो रंग आणलाय तो अभिमानास्पद आहे.म्हणून भाऊ कदम एक यशवंत आहेत.

भाऊच्या आत्तापर्यंतचा प्रवासावर नजर टाकली तर जिद्द,चिकाटी,प्रचंड मेहनत आणि संयम आदी गुण प्रकर्षाने दिसून येतात आणि यशवंत व्हायचे असेल तर या गुणांशिवाय पर्याय नाही याची जाणीव होते.

No comments: