Sunday, August 18, 2019

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 106

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *भाग - 106*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

तंत्रशिक्षणाची कोणतीही विशेष पदवी नसलेल्या आणि स्वतः च स्थापन केलेल्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या, एका तरुणाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर,पुन्हा त्याच कंपनीत मनाचे स्थान मिळवले, शिवाय आपल्या कर्तुत्वाने संपूर्ण जगावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या एका यशवंताची ही प्रेरणादायी कथा...

सिरीयाचा एक मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांच्या पोटी  24 फेब्रुवारी 1955 रोजी सॅनफ्रान्सिको येथे जन्माला आलेला तो म्हणजे  विवाहाआधी जन्माला आलेलं  मूल. म्हणून, त्या दोघांनी त्याला अनाथालयाला दिले.

पण, अनाथालयाला देताना एक गोष्ट चांगली केली की, त्याला कॅलिफोर्नियातील एका सुशिक्षत अशा पॉल व क्लरा यांच्या कुटुंबात दत्तक दिले. पॉल व क्लरा यांनी त्याचे नाव ठेवले स्टीव्ह. 

70 च्या दशकाचा काळ. कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत स्टीव्ह ने 1976 मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. 1976 साली एका गॅरेज मध्ये एका कंपनीची स्थापना केली. 

कंपनीने बाळसे धरले. स्टीव्ह आणि व्होज्नियाक च्या परिश्रमाने केवळ चारच वर्षात कंपनी नावारूपास आली. पण, घडलं वेगळंच कंपनीने तयार केलेले दोन कॉम्पुटर बाजारपेठेत अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. या सर्वाचे खापर स्टीव्ह वर फोडण्यात आले. एव्हढेच नाहीतर त्याची त्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली. 

या घटनेने स्टीव्ह नाराज झाला नाही. कारण, त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता. त्याने एकट्याने एका नव्या कंपनीची स्थापना केली. तिला नाव दिले NEXT. आपल्या बुद्धी चातुर्याच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर स्टीव्ह ने नेक्स्ट कंपनी नावारूपास आणली. अगदी आपल्या पहिल्या कंपनी इतकीच.

इकडे स्टीव्ह च्या अगोदरच्या कंपनीत प्रचंड तोटा होत होता. पहिल्या कंपनीने नमते घेऊन स्टीव्ह ला परत कंपनीमध्ये बोलाविण्यात आले. त्याची नेक्स्ट कंपनी 40 कोटी डॉलर्स ला विकत घेण्यात आली. 2000 साली स्टीव्ह त्या कंपनीचा सीईओ बनला. 

2007 साली स्टीव्ह ने मोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवले. तो काळ नोकिया, ब्लॅकबेरी सारख्या कीबोर्ड किंवा बटन वाल्या फोन चा होता. पण, स्टीव्ह च्या कंपनीने सर्वप्रथम टचस्क्रीन असणारा मोबाईल तयार केला. जगभरात खळबळ उडाली. मोबाईल घेण्यासाठी स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. या रांगा ज्या मोबाईल साठी लागल्या तो मोबाईल म्हणजे आयफोन,ती कंपनी म्हणजे अॅपल आणि तो स्टीव्ह म्हणजेच स्टीव्ह जॉब्स.

नेतृत्व करण्याची क्षमता, दूरदर्शीपणा, बाजारपेठेची नस ओळखणे, भविष्याचा वेध घेणे या साऱ्या क्षमतांच्या जोरावर स्टीव जॉब्स कंपनीला नावारूपास आणले.  अॅपल कंपनीतून हकालपट्टी केल्यानंतर नाराज न होता, निराश न होता धैर्याने एका नवीन कंपनीची सुरुवात केली. ती कंपनीदेखील नावारूपास आणली. हे शक्य झाले ते केवळ स्वतःवर असलेल्या विश्‍वासाने. 

सर्वसामान्य व्यक्तीला एखाद्या समस्येला तोंड देण्यापूर्वी एक प्रश्न पडतो मला हे जमेल का ? या पहिल्या प्रश्नातच त्याचे अर्धे अवसान गळून जाते. पण, अॅपल कंपनीची स्थापना करताना, " मला तंत्रज्ञानाची ओळखलं नाही, मी या व्यवसायात यशस्वी होऊ शकणार नाही, मला हे जमणार नाही, माझ्याकडे कमी भांडवल आहे, माझा जन्म गरीब कुटुंबात झाला आहे." या व यासारख्या असंख्य प्रश्नांना बाजूला सारून स्टीव्ह जॉब्स नीं ॲपल कंपनी नावारूपास आणली. ते केवळ आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आणि हे सामर्थ्य जर स्वतःवर स्वतःचा ठाम विश्वास असेल तरच निर्माण होते. स्टीव्ह जॉब्स कडे ते सामर्थ्य आणि विश्वास होता.म्हणून तो यशस्वी होऊ शकला. म्हणूनच, तो एक यशवंत आहे.

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!!!


भुकेले रहा; असमाधानी रहा.

- तुमचं काम हेच तुमच्या आयुष्यातील सर्वाय मोठा भाग असते. त्यावर तुमचा विश्वास असेल, आवड असेल तर तुम्ही ते चांगले करु शकता आणि खऱ्या अर्थाने त्यातून समाधान मिळेल.  तुम्हाला अजुनही वाटत नसेल की तुम्ही समाधानी नाही आहात तर काम शोधत रहा एकच न आवडणारी गोष्ट करु नका.

- आपल्या मनाचे ऐकून त्यानुसार वाटचार करण्याचे धाडस असायला हवे. तुमच्याकडे वेळ मर्यादीत आहे त्याचा अपव्यय दुसऱ्यासाठी करु नका. इतर लोक काय म्हणतात याचा विचार करुन जगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आतला आवाज त्यासाठी दाबून ठेवलात तर कधीच यशापर्यंत पोहचता येणार नाही.
- व्यवसाय हा एकट्याने करणे शक्य नाही. त्यासाठी एका टीमची गरज असते.

- जर तुमच्याकडे नवनिर्मितीचा ध्यास असेल तरी तुमच्याकडे प्रत्येकाप्रमाणे अनुभवाची शिदोरी असायालाच पाहिजे असे काही नाही.

- कोणालाही मृत्युला सामोरे जायची इच्छा नाही. स्वर्गात जायचं आहे म्हणणाऱ्यांना देखील मृत्यू नको आहे तरीही सर्वांना मृत्यू अटळ आहे. असं म्हणतात की, मृत्यूनंतर आत्मा शरीर बदलतो यातून आपण जुनं सोडून नव्याचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे.

- तुम्हाला जे करायला आवडतं तेच करा.

- नवीन उपक्रम एक नेता आणि एक अनुयायी यांच्या दरम्यान फरक ओळखतो

- गुणवत्तेचे एक मापदंड व्हा, काही लोकांचे असे वातावरण नसते जिथे उत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते.

- काहीवेळा जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. तेव्हा तुमचा स्वतर:वरील विश्वास गमावू नका.

- माझ्या आवडत्या गोष्टींची किंमत पैशात करत येत नाही. आपल्या सर्वांजवळ असणारी वेळ सर्वात मैल्यवान आहे हेच स्पष्ट आहे.

- डिझाईन म्हणजे केवळ बाह्यरूप नसून ते अंतर्गतही असते. एखाद्या वस्तू अथवा गोष्टीचे डिझाईन कसे आहे व ते कसे वाटते यावर अवलंबून नसून ती वस्तू कसे काम करते म्हणजेच डिझाईन होय.
हा तंत्रज्ञानातील विश्वास नसून लोकांवरील विश्वास आहे.


- ज्यांना जगातील सर्वात चांगल्या गोष्टी बनवायच्या आहेत त्यांनाच आम्ही काम देतो.



No comments: