Wednesday, May 5, 2021

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग 187

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 187*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2021/05/187.html

ऐंशीच्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडविणाऱ्या, स्वतःच्या स्पोटक खेळीने क्रिकेट प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारतीय संघाला 1983 चे विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या, एका निडर खेळाडूचा हा प्रेरणादायी प्रवास...

21 डिसेंबर 1959 रोजी चेन्नई येथे एका सधन कुटुंबात चिकाचा जन्म झाला. तो अभ्यासात हुशार. पण, क्रिकेट जीव की प्राण आसणारा खेळ. शालेय अभ्यास करता-करता क्रिकेटचाही अभ्यास त्याने सुरूच ठेवला. विविध स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन, आपल्या नावाचा डंका वाजविला. यामुळेच त्याची निवड तमिळनाडू क्रिकेट संघात झाली. 

चिकाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून निवडकर्त्यांचे त्यांचे लक्ष आपल्यावर केंद्रित केले. त्याच्या त्याची मेहनत फळाला आली. 19 वर्षाखालील क्रिकेट संघात त्याची निवड झाली. 1981 साली म्हणजेच वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्याची निवड भारताच्या मुख्य संघात झाली. चिकाने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याची फलंदाजी खूप आक्रमक होती. भारतीय संघातील सर्वात स्फोटक फलंदाज आणि एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावरच 1983 च्या विश्व चषकासाठी मुख्य संघात त्याची निवड झाली. 

1983 च्या विश्वचषक स्पर्धेत चिकाने दमदार खेळ केला. संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात त्याने सर्वाधिक 38 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ 183 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि अंतिम सामना जिंकू शकला. भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा चिका म्हणजेच कृष्णमाचारी श्रीकांत होय. 

के.श्रीकांत हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर. क्रिकेट त्यांचा आवडता खेळ. शिक्षण ? करियर ? की खेळ ? या त्रांगड्यात, त्यांनी क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले. पुढे त्यांनी शिक्षण ही पूर्ण केले. यशाच्या शिखरावर लवकर पोहचायचे असेल तर, प्रत्येकाने आपली आवड शोधली पाहिजे आणि त्यातच आपलं भवितव्य घडवलं पाहिजे. 

के. श्रीकांत यांनी आपली आवड शोधली आणि त्यातच भवितव्य घडवलं. म्हणूनच, ते आज यशाच्या शिखरावर विराजमान आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

🎯 *मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://sandeepbalgondapatil.blogspot.com

🎯 *कृपया ब्लॉग फॉलो करा....*


इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.

तोपर्यंत नमस्कार.


*धन्यवाद...*



No comments: