Sunday, May 5, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 218

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *भाग - 218*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*



https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/218.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/218.html



तुम्हांला जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स माहीतच असतील. ते दोघेही एक काल्पनिक पात्र असून ब्रिटिश गुप्तहेर आहेत. या किंवा यांसारख्या अनेक गुप्तहेरांबद्दल आपण खूप पाहिलं असेल आणि वाचलंही असेल. पण, भारताची पहिली महिला गुप्तहेर तुम्हाला माहिती आहे ? नसेल माहिती तर काळजी करू नका. आजच्या भागात आपण भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेरांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग.


तिचा जन्म 1962 साली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झाला. तिचे वडील पोलिसात होते. त्यामुळे घरात नेहमी चोरी अन् खुनाची उकल यावर अधिक चर्चा व्हायची. गुन्हेगार कसा आणि का पकडला गेला ? यावर चर्चा व्हायची. तसेच, तिला वाचनाची खूप आवड होती. रहस्यमय कथा वाचण्यावर तिचा भर होता. गुप्तहेर यांच्या कथा वाचण्याची तिला आवड होती. यामुळे तिच्या गुप्तहेर होण्याच्या स्वप्नाला खतपाणी मिळत गेले. 


तिने मराठी साहित्यातून पदवी संपादन केली. 1983 साली कॉलेजमध्ये असताना, तिने सर्वात प्रथम हेरगिरी केली. तिच्या एका मैत्रिणीचे वागणे तिला हैराण करत होते. त्यामुळे तिने त्या मैत्रिणीची हेरगिरी केली. तिची मैत्रीण वेश्याव्यवसायात गुंतलेली असल्याचे, तिने अतिशय हुशारीने शोधून काढले. 


महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर, तिने कारकून पदाची नोकरी स्वीकारली. खरंतर तिच्यातला हेर तिला स्वस्थ बसू देत नव्हता. कार्यालयातील एका प्रसंगाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिच्या एका सहकारी महिलेच्या घरा चोरी झाली होती. तिला आपल्या सुनेवर संशय होता. तिने ते प्रकरण हेरगिरी करून सोडवले. खरा चोर सोडून शोधून काढल्याबद्दल तिला पैसेही मिळाले. त्यामुळे तिने पूर्ण वेळ हेरगिरी करण्याचे ठरवले आणि तिने स्वतःला यामध्ये झोकून सुद्धा दिले. 


वडिलांनी हेरगिरीच्या कामातील धोक्यांची कल्पना दिली. कदाचित "तिने हेर होऊ नये." असे वडिलांना वाटत होते. पण, आईने पाठबळ दिल्याने तिने 1986 साली माहीम, मुंबईमध्ये स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली आणि ती बनली भारताची पहिली महिला गुप्तहेर. ती भारताची पहिली महिला गुप्तहेर म्हणजेच रजनी पंडित होय.


हेरगिरी करणं हे अगदीच जोखमीचं काम आहे. यामुळे जीवावर अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले आहे. तरीही त्या डगमगल्या नाहीत, मागे हटल्या नाहीत, त्यांनी पळवाट शोधली नाही. 


रजनी पंडित यांच्या यशाचं गमक त्यांच्या आवडीमध्ये आहे. त्यांची आवड हेच त्यांचं स्वप्नं बनलं. "हेर होणं" हे त्यांचं स्वप्नं होतं. त्यामुळे यश मिळवणं, त्यांना फारसं कठीण गेलं नाही. लवकर यश संपादन करत असेल, तर "आवड आणि स्वप्नं" यामध्ये नेमकेपणा असायला हवा.  


रजनी पंडित यांना त्यांच्या कारकीर्दीत अनेक कठीण प्रकरणे हाताळावी लागली. ही प्रकरणे सोडवताना अनंत अडचणी तिच्यासमोर आल्या. पण तिने या अडचणींवर मात करत प्रकरणे निकाली काढली. 


आजवर रजनी यांनी लाखो प्रकरणे निकाली काढली आहेत. हेरगिरी संबंधित अनुभवांवर 'फेसेस बिहाइंड फेसेस' आणि 'मायाजाल' नावाची दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यानं सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शनकडून हिरकणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यांच्या उत्तम हेरगिरीमुळे त्यांना 'लेडी जेम्स बाँड' जेम्स बाँड म्हणून ओळखले जाते. म्हणूनच, त्या एक यशवंत आहेत.


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/05/218.html


धन्यवाद...!

No comments: