Saturday, August 17, 2024

यशवंत - एक प्रेरणास्रोत गुरूंचा महिमा - भाग - 5

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *गुरूंचा महिमा - भाग - 5*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*




https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/5.html


"परिस्थिती कशीही असली तरी, मनस्थिती बिघडू न देता, परिस्थितीवर मात केलेल्या जिद्दीचा प्रवास...*यशवंत - एक प्रेरणास्रोत*"


दर रविवारी प्रसारित होणारी एक प्रेरणादायी कथा मालिका...


https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/5.html



भारतीय बॅडमिंटनला अव्वल स्थानावर घेऊन जाणाऱ्या, भारतीय बॅडमिंटनचे जनक असणाऱ्या एका अव्वल बॅडमिंटनपटूची ही प्रेरणादायी कथा...


10 जून 1955 रोजी कर्नाटकातील कुंदपुरा येथे एका समृद्ध कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील मैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव होते. कित्येक वर्षे त्यांनी सचिव पद सांभाळाले होते. त्यामुळेच त्याला बॅडमिंटनविषयी नितांत आवड निर्माण झाली. त्याच्या वडिलांनी त्याला बॅडमिंटनचे प्राथमिक धडे शिकवले. 


1962 साली वयाच्या सातव्या वर्षी कर्नाटक राज्य ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला. ही त्याच्या जीवनातील पहिली स्पर्धा. पण, या स्पर्धेत तो सपशेल अपयशी ठरला. दोन वर्षे त्याने कसून सराव केला आणि 1964 साली झालेली राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून त्याने स्वतःला सिद्ध केले. 


1972 सालची ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा त्याने जिंकली. त्याच वर्षी झालेली सीनियर चॅम्पियनशिपवर देखील त्याने स्वतःचे नाव कोरत सर्वांना आवाक् केले. त्याने हा पराक्रम सलग सात वर्षे केला. त्याची आक्रमक खेळी हेच त्याच्या यशाचं गमक होते. 


1978 च्या कॅनडातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरी सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनून त्याने इतिहास घडवला. 1980 मध्ये त्याने डॅनिश ओपन व स्वीडिश ओपन स्पर्धा जिंकली. तसेच, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. जेव्हा त्याने ऑल इंग्लंड जिंकली, तेव्हा तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. हे स्थान मिळविणारा तो पहिला भारतीय होता. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला. भारतीय बॅडमिंटनला अव्वल स्थानावर घेऊन जाणारा, तो अव्वल बॅडमिंटनपट्टू म्हणजेच प्रकाश पदुकोन होय.


पदुकोन यांनी भारतीय बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष पद काही काळ स्वीकारले. तसेच, प्रशिक्षक पदावरील त्यांनी काही काळ काम केले. यासोबतच त्यांनी प्रकाश पदुकोन अकॅडमी ची स्थापना केली. या अकॅडमीतून सायना नेहवाल, पी. गोपीचंद, लक्ष सेन सारखे दर्जेदार खेळाडू घडले. 


नुकत्याच (2024 ) पार पडलेल्या पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत त्यांचा शिष्य लक्ष्य सेन अगदी थोडक्यात ऑलिंपिक पदक जिंकण्यात अपयशी ठरला. परंतु, इथपर्यंत पोहोचणं, हे देखील महत्त्वाचे आहे. शिष्य जितकी मेहनत करत असतो, तितकीच मेहनत प्रशिक्षक देखील घेत असतो. शिष्याच्या यशातील गुरुची भूमिका कोणीच नाही करू शकत नाही. पदुकोण यांनी प्रशिक्षक म्हणून केलेले कष्ट नजर अंदाज करता येणार नाही. 


भारतीय बॅडमिंटन मधील पदुकोन यांच्या योगदानाची दखल घेत, भारत सरकारने त्यांना अर्जुन आणि पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. भारतीय बॅडमिंटनला अव्वल स्थानावर घेऊन जाण्यात प्रकाश पदुकोन यांचा वाटा सिंहाचा आहे. म्हणूनच, त्यांना "भारतीय बॅडमिंटनचे जनक" म्हणून संबोधले जाते. म्हणूनच, ते एक यशवंत आहेत. 


यासारख्या आणखी प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...!

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2024/08/5.html


धन्यवाद...!

No comments: