प्रबळ इच्छाशक्तीच्या
जोरावर आपलं स्वप्न साकार करणाऱ्या एका तरुणाची प्रेरणादायी कथा....
तो नाशिक जिल्हातील सिन्नर
तालुक्यातील ठाणगाव या छोट्याशा गावातला. तुटपुंज्या कोरडवाहू शेतीवर उदरनिर्वाह
करणाऱ्या कुटुंबातला. अभ्यासातही जेमतेमच असणारा.
दहावीला अवघे ५४ टक्के
गुण. दहावी पास झालेला हा घरातील पहिलाच.
कौटुंबिक परिस्थिती
जेमतेम असल्यामुळे, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, लवकरात लवकर नोकरी मिळावी,
यासाठी आयटीआय चा एक कोर्स केला आणि एका कंपनीत तो नोकरीला लागला.
नोकरी करत असताना, मनात
मात्र वेगळेच विचार सुरु होते. याच काळात त्याची एका पी.एस.आय. असलेल्या एका
तरुणाशी भेट झाली. त्या तरुणाशी हस्तांदोलन झाले आणि त्या तरुणाला त्या रात्री झोपच
लागली नाही.
त्या तरुणाला झोप का
लागली नाही ?
कारण, त्यानं स्वप्नं
पाहिलं.
स्वप्न पाहिलं काहीतरी
करून दाखविण्याचं.
स्वप्न पाहिलं सरकारी
नोकरीचं.
स्वप्न पाहिलं लाल
दिव्याच्या गाडीचं.
स्वप्न पाहिलं स्वतःला
सिध्द करण्याचं.
त्यानं निर्णय घेतला.नोकरी
सोडली.आणि तडक पुणे गाठलं.
इथून पुढचा प्रवास खूपच
कठीण होता. स्पर्धा परीक्षांची तयारी करायची. ते ही खिशात दमडी नसताना. घरच्यांचा
पाठिंबा नसताना.
सुरुवातीचे काही दिवस
शिवाजीनगरच्या बस स्थानकावर मुक्काम ठोकला. पुढे पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मित्राने
आसरा दिला.
एम.ए. ला प्रवेश घेतला.
पुणे विद्यापीठाच्या “कमवा आणि शिका” योजनेत नाव नोंदविले. रोज चार तास शारीरिक
कष्ट आणि पगार चाळीस रुपये. पहाटे साडेचार
ते साडेआठ विद्यापीठ परिसरातील झाडांना पाणी घालणे, झाडलोट करणे अशी कामे त्या
तरुणाने केली. उरलेल्या वेळी फक्त एक आणि
एकच ध्यास. “सनदी अधिकारी बनायचं.” आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आपली परिस्थिती
बदलायची.
एम.पी.एस.सी.,एल.आय.सी.,बँकिंग,
यासारख्या परीक्षेसाठी तो तयारी करू लागला. २००५ साली त्याच्या प्रयत्नांना पहिलं
यश मिळालं. तो पी.एस.आय. झाला. पण,समाधान नव्हते.
यु.पी.एस.सी.च उत्तीर्ण
व्हायचं. म्हणून,तो पी.एस.आय. पदाच्या ट्रेनिंग ला गेलाच नाही.
पुन्हा अभ्यास....
आलेल्या परिस्थितीशी दोन
हात करीत ज्ञानसाधना सुरुच ठेवली. यु.पी.एस.सी. चा फार प्रवास खडतर होता. पहिल्या प्रयत्नात तर तो पूर्व
परीक्षाही पास होऊ शकला नाही.
पण,हार
मानली नाही. गडी लढतच राहिला.
एकदा तर तो मुख्य परीक्षेपर्यंत, मुलाखतीपर्यंत पोहचलो. पण यशाने
त्याला हुलकावणी दिली. तो अपयशी झाला. पण, निराश न होता पुन्हा नव्या जोमाने, नव्या जिद्दीने तयारीला
लागला.
दिवस
चालले
होते. प्रयत्न सुरूच होते. लोकांचे टोमणे सुरूच होते. अशातच एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून निवड झाली. काही दिवस ही नोकरी केली.
पण, ती ही सोडली. कारण,
स्वप्न खुप मोठं होतं.
२००९ च्या परीक्षेसाठी
तो नव्या जोमाने पूर्ण जोशात मैदानात उतरला. यावेळी मात्र परिस्थितीला त्याच्यासमोर नतमस्तक व्हावेच
लागले. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीनही
टप्पे पार करत त्याने अंतिम यादीत आपले स्थान पक्के केले. त्याची निवड INTERNAL
REVENUE SERVICES (I.R.S.) मध्ये झाली.
एका दशकाच्या खडतर
परिश्रमाला यश आले.
लोकं
म्हणतात,"अपयश ही यशाची पहिली पायरी असते." पण, अपयशाचा
जिना
चढल्याशिवाय
ज्याला
यश
मिळाले
नाही
असा
तो
तरुण
म्हणजेच
मा. भरत
आंधळे (I.R.S.).
एका खासगी कंपनीत साधा
कामगार म्हणून राबणाऱ्या एका तरुणानं एक मोठं स्वप्न पाहिलं अन् आपल्या प्रबळ
इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाला सत्यात उतरवलं.
आपल्या स्वप्नांचा
पाठलाग जर भरत आंधळे यांनी केला नसता तर.......पण, त्यांनी
धाडस केलं. कष्ट केलं गरुडझेप घेतली आणि यशवंत बनला.
असेच काही होऊ घातलेले
भरत, परिस्थिती पुढे हार मानून, अजूनही खितपत
पडलेले आहेत. त्यांनी या भरत
यांच्याकडून नक्की प्रेरणा
घ्यावी....
2 comments:
Such a nice post sirji....
फारचं सुंदर उपक्रम आहे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Post a Comment